शिक्षा कशाची?
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनप्रकाशन दिनांक :- 09/05/2004
हिंदू संस्कृतीत पुनर्जन्माच्या सिद्धांताला मान्यता आहे. या जन्मातील बऱ्यावाईट कर्मानुसार मनुष्याला पुढील जन्म प्राप्त होत असतो. मागील जन्मात केलेली पापं फेडायची आणि शक्य झाल्यास काही पुण्य संचय करून पुढील जन्मातील जीवन अधिक सुखदायक व्हावे याची तरतूद करायची, असा ढोबळ हिशोब या सिद्धांतामागे आहे.