साहित्य - ललित

कोण असेल?

Category:

 

पूर्वीचा जन्म आताचे वागणे याचा काही संबंध असतो की नाही यावर चर्चा नको. पण जेंव्हा कधी असे प्रसंग डोळ्यासमोर घडतात तेंव्हा विचार करणे भाग पडते. मागे एकदा मी एका राममंदिरात एक माकड येऊन असेच कार्यक्रमात बसून राहिले होते असे वाचले व फोटोत पाहिले होते. तर महादेवाच्या मंदिरात नागराज आले होते. याचीही माहिती वाचली होती.

  May 30, 2022


साहित्य - ललित

हळवा कोपरा

Category:

 

मातृदिनाच्या दिवशी अनेकांनी लिहिलेल्या आठवणी वाचून मी खूपच अस्वस्थ झाले होते. आई होती पण तिची माया प्रेम मिळाले नाही. बाकीच्या गोष्टी नाहीच. असो मला लिहायला जमले नाही म्हणून आईचे उपकार कधीच विसरणार नाही. उलट मीच तिला समजून घेतले नाही. याचेच खूप खूप वाईट वाटते. तिला व्यक्त होता आले नाही म्हणून तिची माया प्रेम कमी होती असे नाही. परिस्थितीने ती हतबल होती. पण तिचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी आयुष्यात खूप काही करु शकले.

  May 28, 2022


साहित्य - ललित

मनस्वी शिक्षक

Category:

 

न. प. शा. क्रमांक अकरा समतानगर उस्मानाबाद येथील शाळेत मी मुख्याध्यापिका म्हणून रुजु झाल्या पासून त्यांना अगदी जवळून पाहिले. नवीन शाळा सुरू करण्यात आली होती म्हणून मैदानात काही रोपे लावली होती आणि कुंभार सर शाळेत लवकर येऊन झाडांना पाणी घालणे. आळे करणे कामे करीत असत. अगदी याच अपेक्षेने मुलांना घडवत असत. गणित विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. पण दुसरे कोणतेही विषय दिले तरी नाही म्हणणार नाहीत. तिथेही मुलांना कमी पडू दिले नाही. कधीही घरगुती कारण सांगून काम टाळले नाही. साधा राहणी आणि उच्च विचारसरणी.

  May 26, 2022


लेखसंग्रह

चालक

Category:

 

कधीही कुठेही जायचे झाले की बस मधून जावे लागत असे. तिकीट काढून सगळे जागेवर बसले आणि खात्री करून वाहक दोरी ओढून चला असा संकेत देतात. प्रवासी आपापल्या परीने जेवण. झोप. गप्पा. वाचन. आणि आता मोबाईल फोन वगैरे मध्ये गुंगतात. पण त्याला मात्र एकाच जागी बसून लक्ष केंद्रित करुन अगदी जागरूक पणे जबाबदारी पार पाडावी लागते. आपल्या इच्छित स्थळी प्रवासी उतरतात चढतात. त्यामुळे इथेही तो जागरूक असतो.

  May 25, 2022


साहित्य - ललित

रंगीबेरंगी

Category:

 

श्रावणात येणारी नागपंचमी. पावसाळ्यात सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत असतो. आणि लेकींना माहेरची ओढ लागते. पंचमीचा सण येईपर्यंत खूपच वाट पहात असते. माहेरी गेल्यावर तिचे अल्लड वय. झाडांना बांधलेले झोके. त्यावर बसून गाणी म्हणते उंच माझा झोका.

  February 25, 2022


साहित्य - ललित

गुरुदक्षिणा

Category:

 

गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुंच्या आज्ञेनुसार विद्यार्थी स्वगृही जायचे. तिथे अध्यापनात सर्वांगीण विकास होण्याचे संस्कार केले जात असे. अशी ही एक पद्धत होती की गुरुकुल सोडून जातांना गुरुदक्षिणा दिली जायची. ती पण ऐच्छिक व ऐपतीप्रमाणे.

  February 24, 2022


साहित्य - ललित

थेंब

Category:

 

सकाळच्या प्रहरी प्रसन्न होऊन अनवाणी पायांनी गवतावर चालताना दवबिंदू पायाला गुदगुल्या करतात आणि दिवसभर त्या जाणिवेचे हसु येतं. आळवावरचा थेंब पाहून बरेच जण बरेच काही अर्थ काढतात. शेवटी थेंबच आहे तो रुप लहान पण अर्थ महान.

  February 23, 2022


साहित्य - ललित

एक घास चिऊचा एक घास काऊचा

Category:

 

तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान.. किती वास्तव सांगितले आहे ना. एरवी साधी चौकशी न करता मजेत जेवणारे पिंडदानच्या वेळी कावळ्याची वाट बघत बसतात. नाहीच आला कावळा तर दर्भाचा कावळा असतोच. चिऊ काऊचा घास खाऊन मोठी झालेली हे सगळे विसरून जातात.

  February 21, 2022