साहित्य - ललित

गंगा दशहरा

Category:

 

जेष्ठ शुक्ल प्रतिपदा गंगादशहरा सुरू होत आहे. फार पूर्वी पासून ही प्रथा आहे पण स्वरूप बदलून गेले आहे. या दिवशी गावाजवळील नदीवर तिला गंगा नदी समजून अंघोळ करत असत. बायका आणि नदीची पुजा करुन खणानारळाने तिची ओटी भरत असत. आणि बहुतेक नदीकिनारी एखादे मंदिर असायचेच. तिथेही दर्शन एखादे फळ म्हणजे आंबा समोर ठेवून प्रार्थना केली जायची.. तेथील पुजारी. पुरोहित जे कोणी असत त्यांनाही दहा आंबे. एखाद्या नवीन ताटात. तबकात. गहू व दक्षिणा देत असत. पुढे हे सगळे घरी बोलावून केले जायचे. आजही काही ठिकाणी अशीच प्रथा आहे.

  June 18, 2022


साहित्य - ललित

आईचा जोगवा जोगवा

Category:

 

काळी सावळी. कपाळावर रुपया एवढे मोठे ठसठशीत कुंकू. नाकात लोंबणारी नथ, गळ्यात मंगळसूत्र. हातभार बांगड्या आणि कडव्याची माळ घालून एक आराधीण यायची. ढळजेत बसून हातातील परडी खाली ठेवून हातात तुणतुणे (एक तारी) आणि खणखणीत आवाजात म्हणायची. मला पहिल्या ओळी आठवत नाहीत. आराधी आल्याति दारात. मागते जोगवा मंगळवारात शुकीरवारात. असे म्हणायला सुरुवात केली की वाड्यातील कुणी तरी एक जोगवा वाढत असत.

  June 17, 2022


साहित्य - ललित

सूप

Category:

 

धान्याला सूप… धान्य निवडणे. फटके मारून फोलपट दूर करणे म्हणजे प्रत्येक वेळी स्वच्छता महत्वाची असते. हे काम तिलाच करायचे आहे. चांगली गोष्ट निवडावी पारखावी खडे रुपी दुर्गुण अलवार पणे दूर करावेत. मनातील वाईट विचार फटकारुन सगळ्यांची मनं स्वच्छ करायला लागतात…

  June 14, 2022


साहित्य - ललित

साठवणीतील एक आठवण

Category:

 

आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती.

  June 12, 2022


साहित्य - ललित

घडलय बिघडलंय

Category:

 

कपड्या बद्दल तर एवढी मोठी क्रांती झाली आहे की एक स्वतंत्र ग्रंथ होईल. वारेमाप कपडे. पण धुण्याचा अजिबात त्रास नाही. वॉशिंगमशिन तयार आहेच. डाग काढायला सोयीचे झाले आहे. त्यामुळे दाग अच्छे है असे म्हणत आई हसतमुखाने लेकराचे कपडे धुते. शिवाय हे लेस ते लेस सगळेच यूजलेस असलेले तोकडे कपडे पाहून वाटते की मूलभूत गरज आहे की मूलभूत सुविधा आहे. आणि एक फायदा म्हणजे जीन्स. टिशर्टस कुणीही कुणाचे घालू शकतात. म्हणजे हे मला नक्की माहीत नाही पण ऐकले आहे म्हणून लिहिण्याचे धाडस केले आहे.

  June 10, 2022


साहित्य - ललित

धुणे

Category:

 

एक नूर आदमी दस नूर कपडा. किंवा कपड्यासाठी नाटक करीशी तीन प्रवेशाचे असो. वस्र ही मूलभूत गरज आहे हे मात्र खरं आहे. आणि कपडे धुणे हे एक घरातील बायकांचेच काम आहे असा अलिखित नियम आहे. पूर्वी घरात माणसं खूप आणि वेगवेगळ्या वयोगटातील. त्यामुळे कपड्यांचे वर्गीकरण असे होते. एक अंगावर एक दोरीवर एवढेच कपडे असायचे तरीही जशी भांडी ढिगभर तसेच धुणे मोटभर….‌

  June 7, 2022


साहित्य - ललित

धुणी भांडी

Category:

 

हल्ली फक्त भांडी आणि घरातील लादी पुसण्यासाठीच बाई कामाला लावतात. पण पूर्वी घरात लेकीसुना ही कामे करत असत. आणि काही प्रमाणात भांडी घासायला बाई यायची. भांडी घासणे ही सुद्धा एक कलाच आहे. याचे वर्गीकरण असे व्हायचे.मला वाटते की ही भांडी घासताना मनाचे चित्रण त्यात दिसून येते कदाचित यात काही तरी संबंध असावेत. ….

  June 5, 2022