(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’

    उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा १४ जानेवारी १९१९ रोजी जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. मा.कैफी आझमी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’.

    कैफी आझमी यांचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या कम्युनिस्टांसोबत त्यांनी काम केले. ते एकदा असेच हैदराबादला गेले असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते’ असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले. ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती मुलगी म्हणजेच उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत.

    शौकत यांनी कैफींना पसंत करण्याचे कारण म्हणजे कैफी विख्यात शायर होते. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न लागले होते. १९४६ मध्ये क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडिलांसोबत औरंगाबादहून मुंबईला येऊन कैफी यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी काझीने शौकतजींना विचारले, ‘‘तुला हे लग्न कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परिस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसर्या् काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, ‘‘मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ या युक्तीवादाच्या जोरावर लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी ब-याच खस्ता खाल्ल्या. ते गावी गेले. तिथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला. नंतर ते मुंबईला गेले.

    सुरुवातीलाही ते लखनऊला राहिले होते. धार्मिक शिक्षण घेण्यासाठी ते गेले होते; पण न्यायासाठी लढा सुरू केल्याने त्यांना हाकलून देण्यात आले. त्यांची मुलगी शबाना पोटात होती तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने आदेश दिला की, गर्भपात करा. कैफी भूमिगत होते आणि पक्षाला मुलाबाळांच्या खर्चाची चिंता होती. शौकत कैफी आपल्या आईकडे हैदराबादला गेल्या. तेथेच मुलगी शबाना आझमी यांचा जन्म झाला. नंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव अहमद ऊर्फ बाबा.

    शबाना आझमी यांच्या यशात कैफींचा फार मोठा वाटा आहे.
    शबाना आझमीने आपले वडील कैफी आझमी यांच्या कवितांना समर्पित एका वेबसाइटची निर्मिती केली आहे.
    http://www.azmikaifi.com
    या वेबसाइटवर कैफी आझमी यांनी लिहिलेली गाणी आणि कविता ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याशिवाय येथे व्हिडिओ, त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांबरोबरच त्यांच्या विषयीची माहितीदेखील पुरविण्यात आली आहे. विसाव्या शतकातील अनेक उत्कृष्ट चित्रपट कैफींच्या नावाने ओळखले जातात. ‘हीर रांझा’मध्ये चेतन आनंदने सर्व संवाद कवितेच्या रूपात सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कैफी यांनी ते संवाद लिहिले. प्रियाऐवजी कुणी दुसरी नायिका असती तर राजकुमारला हा चित्रपट कुठवर घेऊन गेला असता सांगता येत नाही. सर्वोत्कृष्ट युद्धपट ‘हकीकत’ हाही कैफींचा चित्रपट. ‘गर्म हवा’, ‘कागज के फूल’, ‘मंथन’, ‘कोहरा’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘बावर्ची’, ‘पाकीजा’, ‘हंसते जख्म’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’, असे चित्रपट कैफींमुळे अजरामर झाले.

    कैफी यांनी जास्ती गाणी लिहीली नाहीत पण जी लिहीली ती काळजाचा ठाव घेणारी ठरली. त्यातला अर्थपूर्ण आशय रसिकांच्या मनाला अलगद स्पर्श करणारा होता. 'चलते-चलते यूँ ही कोई मिल गया था' (पाकिजा), 'वक्त ने किया क्या हसीं सितम' (कागज के फूल), 'तुम बिन जीवन कैसा जीवन'(बावर्ची), 'तुम जो मिल गए हो तो ये लगता है...' (हंसते जख्म), 'कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं' (अनुपमा), 'इक जुर्म करके हमने चाहा था मुस्कुराना' (शमा), 'जीत ही लेंगे बाजी हम तुम' (शोला और शबनम), 'ये नयन डरे डरे' (कोहरा), 'सारा मोरा कजरा चुराया तूने'(दो दिल), 'बहारों...मेरा जीवन भी सँवारो'(आखिरी खत), 'धीरे-धीरे मचल ए दिल-ए-बेकरार' (अनुपमा), 'या दिल की सुनो दुनिया वालों' (अनुपमा), 'मिलो न तुम तो हम घबराए' (हीर-रांझा), 'ये दुनिया ये महफिल' (हीर-रांझा), 'जरा सी आहट होती है तो दिल पूछता है' (हकीकत) ही त्यांची काही लोकप्रिय चित्रपट गीते होत... १९८० च्या दशकात कैफी आझमींनी 'अर्थ' चित्रपटासाठी अतिशय आशयसंपन्न गीते लिहिली 'झुकी झुकी सी नजर करार है की नही, दबा दबा सा सही, दिल में प्यार है की नही' 'कोई ये कैसे बतायें की वो तनहा क्यों है' आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो'.

    भारत सरकार ने १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. मा.कैफी आझमी यांचे निधन १० मे २००२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 15, 2018


  • दिनू रणदिवे

    ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना “सिंहासन” कादंबरीसाठी सुचलेली दिघू टिपणीसांची व्यक्तीरेखा ही रणदिवेंवरुनच सुचल्याचं अनेकजण अगदी ठामपणे सांगतात. दिनू रणदिवे यांच्या व्यक्तीमत्त्वानं प्रेरित होऊन अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याविषयी आदरानं बोलतात व त्यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात.

      June 18, 2013


  • माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री

    १९६४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या शास्त्रींनी अल्पावधीतच भारतीय राजकारणावर आपला ठसा उमटविला. १९६५ च्या पाकशी झालेल्या युद्धात देशास खंबीर नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा उजळून टाकली. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या मंत्राने अवघा देश भारावून गेला.

      January 11, 2022


  • पांडुरंग शास्त्री आठवले

    दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय’ परिवाराची स्थापना केली. श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला.

      October 30, 2010


  • लेखक,राजकारी,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ

    काकासाहेब गाडगीळ हे राजकीय नेते म्हणून ओळख असणारे वैचारिक लेखक होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. ग्यानबाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रविचार अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. १९६२ साली साताऱ्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    देशासाठी काकासाहेब गाडगीळ यांनी खूप काम केले पण कामाची प्रसिद्धी कधीही केली नाही. गंमतीचा भाग म्हणजे 'प्रसिद्धीविना काम म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे आहे' हे काकासाहेब गाडगीळ यांचे वाक्य प्रा. रामकृष्ण मोरे काँग्रेसच्या अनेक शिबीरातून सांगायचे. पुण्यातील एन.डी.ए. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी ही सुरुवातीला दक्षिण भारतात उभारण्याची कल्पना होती. पण असे म्हणतात की, काकासाहेब गाडगीळ यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल पंडित नेहरूंपुढे हुशारीने मांडला व अखेरीस मंत्रिमंडळाने एन.डी.ए. पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुळे एन.डी.ए. पुण्यात आले, ही बाब अनेकांना ठाऊक नसेल.

    पिंपरीमध्ये हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक आणण्यामध्येही काकासाहेब गाडगीळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्रीय बांधकाम मंत्री या नात्याने काकासाहेब गाडगीळ यांनी उत्तर भारतातील सीमेवरच्या रस्त्यांचे जे बांधकाम केले ते ६२-६५च्या युद्धात फायदेशीर ठरल्याचे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनीही मान्य केले होते. भाकरा नांगल व कोयना धरण उभारण्यातही काकांचे योगदान मोठे आहे. गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार हाही काकांमुळेच घडला. लेखक या बरोबरच काकासाहेब गाडगीळ यांची राजकिय कारकिर्द मोठी होती. भारत सरकारने टपाल तिकीट प्रसिध्द केले होते. काकासाहेब गाडगीळ यांचे १२ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 12, 2019


  • नम्रता शिरोडकर

    नम्रता शिरोडकरने १९९८ साली “जब प्यार किसी से होता है”, या चित्रपटातील एका छोट्याश्या भुमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्याशिवाय ‘मेरे दो अनमोल रतन’, ‘हीरो हिन्दुस्तानी’, ‘कच्चे धागे’, ‘वास्तव’, ‘आगाज़’, ‘हेरा फेरी’, ‘अस्तित्व’, ‘पुकार’, ‘अलबेला’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘मसीहा’, ‘तहज़ीब’, ‘रोक सको तो रोक लो’, ‘चरस’, ‘ब्राइड एंड प्रीजुडिस’; यासह अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत

      March 13, 2014


  • बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ‘आगा’

    आगा ह्यांच्या विनोदी भूमिकांची वेगळी पद्धत म्हणा स्टाईल होती ती म्हणजे ‘ लेट ऍक्शन ‘ . एखादे वाक्य कानावर पडल्यावर ते हो म्हणत आणि लगेच चेहरा धक्का बसल्यासारखा करत , किंवा धक्का बसल्याचा अभिनय करत. त्यालाच ‘ लेट ऍक्शन ‘ म्हणतात. त्याची सुरवात त्यानेच केली असे म्हटले जाते. पुढे अनेक विनोदी नटांनी ही पद्धत उचलली असेही म्हटले जाते.

      June 23, 2021


  • डॉ. अरुण निगवेकर

    माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ‘फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया’ असा केला होता. युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली.

      June 28, 2022


  • बासरी वादक, लेखक पंडीत अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर

    बासरी वादक, लेखक पंडीत अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर

    तरुणपणी वाद्यसंगीताकडे आकृष्ट झालेल्या गजेंदगडकर यांनी प्रख्यात बासरीवादक पन्नालाल घोष आणि मुरलीधर शास्त्री यांच्याकडे बासरीवादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९२८ रोजी नाशिक येथे झाला. बासरीवादनाच्या पलिकडे संगीतकार आणि संगीत समीक्षक अशीही गजेंदगडकर यांची ओळख होती. स्वरमंडल या वाद्याचे वादन करणारे ते एकमेव कलाकार होते. सारंगी आणि व्हायोलिन वगळता सर्व प्रकारची वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता.

    ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करताना गजेंदगडकर यांना गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारख्या अनेक श्रेष्ठ गायकांचा सहवास लाभला. कल्पकता आणि सतत नव्याचा ध्यास घेतलेल्या गजेंदगडकर यांनी ७५व्या वाढदिवशी बासरीवर ७७ राग वाजवण्याचा कार्यक्रम दोन सत्रांत सादर केला होता. वादन आणि सादरीकरण यापुरतीच कला मर्यादित राहू नये असा त्यांचा आग्रह होता. नव्या पिढीचे कलाकार आणि वादक घडवण्यासाठी त्यांनी नेहमीच धडपड केली.

    अरविंद गजेंद्रगडकर हे बासरीवादना बरोबरच लेखन करत असत आणि त्यांनी प्रामुख्याने संगीतविषयक लेखन केलं आहे. अरविंद गजेंद्रगडकर हे एक जोतिषीही होते. असे सूर! अशी माणसं!, सूरसावल्या, स्वरसंगम, स्वरांची स्मरणयात्रा, स्वरांच्या बनात, आलाप विशारद, The Indian Flute, तबला विशारद, ५० राग - आलाप, गती, बासरी वादन, वाद्यवादनाचे संपूर्ण गाइड, संगीतशास्त्राचे गाइड, हार्मोनियम गाइड आणि मोरू परतुनी आला ही कादंबरी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. पत्रकार निखिल गजेंदगडकर हे त्यांचे चिरंजीव.

    पं.अरविंद गजेंद्रगडकर यांचे ३० मे २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://youtu.be/x4mu6KkXm4o

      January 11, 2018


  • प्रभाकर भावे

    नाटकात रंगभूषेला महत्त्वाचे स्थान मिळवून देणार्‍या ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईमध्ये रंगभूषेविषयी जागृती करत त्यांनी रंगभाषा विकसित केली आहे.

    रंगभाषाकार

      July 14, 2017