जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासी समाजास मुख्य प्रवाहात आणणे. समाजाचा सर्वांगीण विकास साधतानाच त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना जपणे. त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्यातूनच नेतृत्व उभे राहील हे पाहणे. एकूणच आदिवासी समाज आणि अन्य समाज यातील दरी बुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मुख्यतः करत आहे.
December 26, 2020
२०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा राजदूत व २०१९ मध्ये उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काउन्सिल चा अध्यक्ष होण्याचा बहुमान राजू भाईंना मिळाला.
September 29, 2022
कोकणातील एका छोट्या खेड्यात जन्म घेतलेल्या एका युवकाने पुण्यात येऊन स्त्री शिक्षणाचे जे महान कार्य केले ते सगळ्यांनाच आदर्शवत ठरावे असेच होते. धोंडे केशव कर्वे हे त्या तरुणाचे नाव. ज्या काळात स्त्री शिक्षण, विधवा विवाह यांसारख्या गोष्टींना समाजातून तीव्र विरोध होता, अशा काळात धोंडो केशव कर्वे यांनी एक व्रत म्हणून समाजसेवेचे हे कार्य आरंभिले. शारीरिक कष्टाची कसलीही तमा न बाळगता त्यांनी हे कार्य केले. ऊन असो, पाऊस असो की कडाक्याची थंडी असो ते कोठेही पायी जात आणि आपल्या कार्यासाठी मदत म्हणून कोणाकडूनही फक्त एक रुपयाची देणगी घेत असत. अर्थात त्याची रीतसर पावती घेऊनच. त्या काळी एक रुपयापेक्षा जास्त देणगी देणारे लोक होते. परंतु अण्णासाहेब कर्वे यांचा देणगी म्हणा एक रुपयाच घेण्याचा आग्रह असे. एकदा ते असेच गोरे नावाच्या सरकारी वकिलाकडे भल्या सकाळीच गेले. त्यांच्यामुळे अर्थातच गोरेसाहेबांची झोप मोडली होती. परंतु तरीही त्यांनी अण्णांचे स्वागत केले. अण्णांनी जेव्हा एक रुपया देणगीचा प्रस्ताव मांडला, तेव्हा ते म्हणाले,''एक रुपया कशाला? मी तुमच्या कार्याला एकरकमीच देणगी देतो. '' त्यावर अण्णासाहेब कर्वे त्यांना नम्रतेने म्हणाले, की ' 'गोरेसाहेब मला माझ्या कार्यात प्रत्येकाचा सहभाग करून घ्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडून अथवा एका कुटुंबाकडून फक्त एकच रुपया देणगी घेण्याचे मी ठरविले आहे. त्यासाठी माझी कितीही पायपीट झाली तरी चालेल मी ती आनंदाने करीन. '' गोरे साहेबांना त्यांच्या या प्रांजळ निवेदनाचे खूप कौतुक वाटले. त्यांनी त्यांना एक रुपयाची देणगी दिली. त्यासरशी अण्णासाहेब दुसऱ्या घरी जायला निघाले. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी अतिशय प्रतिकूल काळात लावलेल्या स्त्री-शिक्षणाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
February 9, 2017
उपेक्षित स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार आणि अनिष्ठ रूढी विरोधात अखंड संघर्ष करणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या धर्मपत्नी. १८४० साली त्यांच्या वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचा ज्योतिबांशी विवाह झाला.
February 2, 2010
गोविंदराव टेंबे अगदी बालवयातच ते संगीताकडे आकर्षित झाले. ते बहुतांशी स्व:शिक्षित पेटी वादक होते. गोविंदराव देवल क्लबला स्व:ताच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचे श्रेय देत असत. त्यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी कोल्हापूर येथे झाला. गोविंदरावांनी भास्करबुवा बखले यांच्याकडून कला आत्मसात केली. जयपूर घराण्याचे अल्लादिया ख़ाँ यांच्याकडून वास्तविक त्यांनी कधीच शिक्षा घेतली नाही पण तरीही गोविंदराव ख़ाँसाहेबांना आपला गुरु मानत. गोविंदराव भास्करबुवा बखले यांना साथ द्यायचे आणि बहुतांशी पेटीचा एकपात्री प्रयोग ही करायचे. गोविंदरावांनी संगीत दिलेल्या संगीत मानापमान नाटकातील पदे आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटालासुद्धा संगीत दिले. काही वर्षांनी त्यांनी स्वत:ची शिवराज नाटक मंडळी सुरु केली. त्यांनी स्वत: नाटके आणि त्यातील पदे लिहिली. मा.गोविंदराव टेंबे उत्कृष्ठ टेनिसपटु होते व त्यानी सर्कसचे मॅनेजर म्हणूनहि काम केले होते! त्यानी बावीस श्रुति वाजवता येतील अशी पेटीहि बनवली होती. ’पटवर्धन’ हे त्यांच्या एका नाटकाचे नाव. त्यातील ’तारिणी नववसनधारिणी’ हे पद अजूनहि लोकप्रिय आहे. चंद्रिका हि जणू, शूर मी वंदिले सारख्या उत्तमोत्तम गाण्यांना त्यांनी संगीत दिले. ना.सी. फडके यांनी तर त्यांना मराठी नाट्यसंगीताचा शिल्पकार म्हटले होते. बालगंधर्व मा.गोविंदराव टेंबे यांना गुरु मानायचे. गोविंदरावांनी ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटात हरिश्चन्द्राची भूमिका केली होती. गोविंदराव टेंबे यांनी खूप लिखाण केले होते. माझा संगीत व्यासंग हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील एक उत्कृष्ठ पुस्तक आहे. ‘माझा जीवन विहार’ या आपल्या पुस्तकात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतलेला आहे.
” मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असतांना मला असे दिसून येत आहे की लाभ, हानि, सुख, दुःख, यशापयश इत्यादी महत्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीने शिखरावर आणून बसवायचे, अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचे ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही, या विषयीची मी पंचाईत करत नाही. पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूल झालेली आहे, आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधीनिषेध मानीत आलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचे; त्याच्या परिणामाचा विचार करावयाचा नाही — मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचेही बरे केले हा अहंभाव नाही व कोणाचे वाईट व्हावे व माझे बरे व्हावे ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची; मग ती बरी असो के वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वरेच्छेने आपोआप मुक्तता होईलच; तोपर्यंत ती मला मानवतेच. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची; आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे, तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणा-या बेपर्वा व बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचे क्वचितच कारण पडेल. गोविंदराव टेंबे यांचे ९ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 5, 2017
सुभाष शहा यांनी 1965 मध्ये आपले बंधु विमलकुमार यांच्या समवेत चेतन फौंड्रीची स्थापना करून उद्योगाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांना वालचंद समुह, कुपर, एस्कॉर्ट, एच. एम. टी. सारखे ग्राहक मिळाले. शहा यांचे सुपुत्र यतिन यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर 1992 साली प्रिसिजन उद्योग समुहाचा श्रीगणेशा केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या प्रिसिजनने सन 2007 मध्ये ब्रिटनची व्हल्वट्रेन कंपनी ताब्यात घेतली.
August 16, 2011
हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले.
March 5, 2018
त्यांच्या कथालेखनास ‘ अभिरुची ‘ मासिकांमधून सुरवात झाली. त्यांनी ‘ ‘सात सक्कं त्रेचाळीस ‘ लिहिली आणि त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीवरून त्याच्याकडे एक गंभीर लेखक म्ह्णून वाचक बघू लागले.
August 4, 2021
अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा ---क्षणभर उघड नयन देवा ---तुझा नि माझा एक पणा ---निघाले आज तिकडच्या घरी--झुलवू नको हिंदोळा ---
अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी पुण्यात झाला. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं नेहमीच कानांवर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं.
सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई. पण मा.माणिक वर्मा यांच्या आई हिराबाई दादरकर ''यांनी त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि नंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. त्यातून मग गणेशोत्सवातून सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले. पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला जगन्नाथबुवा पुरोहित, नंतर इनायत खाँसाहेब, ‘भारत गायन समाज’चे अप्पासाहेब भोंपे यांसारख्या दिग्गजांकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर सुरेशबाबू माने यांनी माणिकताईंचा किराणा घराण्याशी परिचय करून दिला.
दरम्यान पुण्यासारख्या चोखंदळ रसिकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे तर सुरतलाही त्यांनी आपली कला पेश केली. यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रम, मैफिली यांची मालिकाच सुरू झाली. लांबलांबचे दौरे आखले जाऊ लागले आणि माणिक वर्मा हे नाव संगीतविश्वात गाजू लागले. गाण्यांच्या मैफिलींसाठी हिराबाई बडोदेकर तर चित्रपट संगीतासाठी सुधीर फडके त्यांचे आदर्श होते. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली.
किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला. ग. दि. मांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत लाभलेल्या 'गीत रामायण'चे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवर सुरू झाले, तेव्हा त्यात माणिक वर्मांनी अनेक गीते गायली. ती लोकप्रियही झाली. मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. चेहऱ्यावर मंद स्मित असे आकर्षक व घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मांनी अनेक कठीण चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका ती गाऊ लागल्या. 'घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा', हे 'ळ'चा प्रास असलेले तशाच नागमोडी वळणाचे गाणे गदिमांनी रचले व फडकेंनी स्वरबद्ध केले. ते तितक्याच लडिवाळ आवाजात माणिक वर्मा यांनी गायलेलुद्धा.
भक्ति व भावगीतांमध्ये रमलेल्या माणिक वर्मा यांनी एकच लावणी गायली. गदिमांची 'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी 'पुढचं पाऊल' या चित्रपटात हंसा वाडकर यांच्या अदाकारीसह चित्रित झाली. बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकातील त्यांनी गायलेले 'आली दिवाळी दिवाळी' हे ह्रदयस्पर्शी गीत खूपच गाजले होत. माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.च्या एका वाक्याने फुलांची चादर पसरली. ‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’ असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल.
पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की..’ आणि मग माणिक दादरकर-अमर वर्मा यांच्या लग्नाच्या पत्रिका निघाल्या. त्या पत्रिकांवर त्या काळाला अनुसरून त्या काळातील समाजाची दैवते असलेले महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचे फोटो होते. माणिक वर्मा यांची चार रत्न म्हणजे राणी वर्मा, भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश...राणी वर्मा यांनी आईचा म्हणजे माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.
१९७४ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला. माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आला. माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि रसिकांच्या हृदयात चिरंतन राहील. दर वर्षी रंगशारदा महोत्सव योजने अंतर्गत १९९८ सालापासून तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांचे ‘किती रंगला खेळ’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकेच आनंद देते. माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.
माणिक वर्मा यांची वेबसाईट
http://www.manikvarma.com/about_marathi.html
माणिक वर्मा यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=EfM1M0SW-DA
'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी
https://www.youtube.com/watch?v=C4x27eCejpQ
हसले मनी चांदणे
https://www.youtube.com/watch?v=0cRSC3AAdHU
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 16, 2017
श्रीमती शुभा टोळे यांनी कॅलिफोर्निया प्रांतात कलटेक विद्यापीठात पी. एच. डी. केले.
October 4, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti