(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • इंदिरा चिटणीस

    तब्बल ११२ चित्रपटांमधून तसंच १५ नाट्यप्रयोगातून इंदिरा चिटणीस यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या कजाग, खाष्ट सासुच्या भुमिकांची दखल ही नोंद घेण्यासारखी आहे.भालजीं पेंढारकरांच्या “थोरातांची कमळा” या
    चित्रपटातील भूमिकेसाठी इंदिरा चिटणीस यांना राज्य शासनाच्या “सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री” तर गरिबाघरची लेक या चित्रपटासाठी “सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री”च्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

      July 18, 2014


  • राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर

    चांदनी बार, पेज थ्री, कॉर्पोरेट, फॅशन अशा अनेक रियलिस्टिक सिनेमांचं दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. ग्लॅमरस जगाचं वास्तव त्यानं जगापुढे आणलं. गुरुदत्त, विमलदा, श्याम बेनेगल, व्ही शांताराम हे मधुर भांडारकर यांचे आवडते दिग्दर्शक. मधुर एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा.

    घरात फिल्म इंडस्ट्रीची बॅकग्राउंड नाही. पण तरीही लहानपणापासूनच त्याला सिनेमात प्रचंड इंटरेस्ट होता. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणं परवडत नसल्याने त्याने रस्त्यावर, मेळ्यांमध्ये, सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत असे साधारण १५०० चित्रपट त्यानं पाहिले. ज्या वयात मुलं अमर चित्रकथा, चांदोबा वाचायचे, त्या वयापासून तो स्टारडस्ट, फिल्म फेअर अशी मॅगेझीन्स वाचायचा.अशोक गायकवाडांकडे इंटर्नशिप केली. नंतर रंगिला, रात, रेवती अशा चित्रपटांत राम गोपाल वर्मांना असिस्टही केलं.

    त्रिशक्ती हा मधुरचा पहिला सिनेमा. त्याच्या इतर सिनेमांपेक्षा हा पूर्णपणे वेगळा होता. चांदनी बार या चित्रपटानं मधुरला खरी ओळख मिळवून दिली. त्याविषयी बोलताना मधुर भांडारकर म्हणतात 'स्ट्रगलिंगच्या काळात माझा मित्र मला एका बारमध्ये घेऊन गेला. तो लेडिज बार होता. म्हणजे एकदम वेगळच वातावरण. शिफॉन साडीतल्या बायका, लाउड म्युझिक सगळं वातावरणच वेगळं होतं. मी मित्राला म्हटलं अरे कुठे घेऊन येतोस मला… लोक म्हणतील फिल्म फ्लॉप झाली म्हणून मधुर आता इकडे दिसायला लागला. मी लवकरात लवकर तिथून बाहेर पडलो. पण घरी आल्यावर मला जाणवलं की त्यातलं ते जे गाणं होतं मुंगळा मुंगळा ते गाणं माझ्या डोक्यात बसलं होतं. दुसर्याल दिवशी मी मित्राला म्हटलं मला बारमध्ये जायचय. मग आम्ही तीन-चार बार फिरलो.

    शेवटी सायन-कोळीवाड्यातल्या एका जुनाट बारमध्ये मी निर्णय घेतला की आपण बारवर फिल्म बनवायची. मग मी त्यावर रिसर्च केला. ४-५ महिने मी वेगवेगळ्या बारमध्ये जाऊन बसायचो. कनेक्शन्स काढली. कॉन्टॅक्ट्स मिळवले आणि मग पिक्चर बनवला. मधुर भांडारकर यांना तीन वेळा नॅशनल अॅववॉर्ड् मिळाले आहे. मधुर भांडारकर यांचे प्रमुख चित्रपट:- चांदनी बार, सत्ता, पेज थ्री, कॉर्पोरेट, ट्राफीक सिग्नल.

    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :-इंटरनेट

      August 26, 2017


  • गोविंद त्र्यंबक दरेकर (कवी गोविंद)

    अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेच्या कार्यात सावरकरांना जे सहकारी मिळाले त्यात आणि पुढील काळात सावरकरांनी ज्यांना ‘स्वातंत्र्यशाहीर’ या बिरूदाने गौरविले ते म्हणजे कवी गोविद त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे स्वातंत्र्य हा विषय केंद्रीभूत मानून काव्य करणे, स्वातंत्र्य प्रेमाची सुक्ते आणि वीरतेची सुभाषिते गाणारे कवी गोविद यांचा उल्लेख स्वातंत्र्य शाहरी म्हणून यथार्थ वाटतो.

      February 4, 2010


  • ज्येष्ठ ऑर्गनवादक व मराठी नाट्य-अभिनेते हरिभाऊ देशपांडे

    मुकेश खन्ना यांना त्यांच्या शक्तीमान च्या रोलसाठी तसेच बी.आर.चोप्राच्या ‘महाभारता’तील भीष्म पितामहच्या रोलसाठी आजही ओळखले जाते. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच शक्तिमानचे चाहते होते. ‘शक्तिमान’ ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकात एवढी प्रसिद्ध होती की, ‘शक्तिमान’ ज्या पद्धतीने उडतो अगदी तसंच उडण्याचा प्रयत्न अनेक मुलं करायची.

      June 28, 2022


  • राजाराम चंद्राजी नाखवा

    ठाण्यामध्ये खेळांचा उत्कर्षा कसा होईल याचा पाया राजाराम नाखवा यांनी रोवला. त्यासोबतच शरीर सौष्ठत्व स्पर्धेला चालना मिळावी आणि याची आवड ठाण्यातील तरुणांमध्ये निर्माण करण्यात ही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे . ठाण्यामधील आद्य व्यायामशाळा म्हणून जिचा गौरव केला जातो, त्या चोंदणी कोळीवाडा येथील श्री.आनंद भारती व्यायामशाळेच्या स्थापनेत आर्थिकदृष्ट्या सहकार्य केले आहे . या व्यायामशाळेचे संस्थापक म्हणून देखील ते अनेक वर्षे कार्यरत होते.

      January 14, 2015


  • गायक महेश काळे

    शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.

    वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना "पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा" ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते. महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्या अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे.

    दहावीच्या सुट्टीमध्ये महेशने अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. पुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मैनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले.

    लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत.

    कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला.

    भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या "कट्यार काळजात घुसली"ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज 'सदाशिव'च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट (पुरुष) पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 12, 2018


  • बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेन

    कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला. 'इंदिरा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली 'एक जे अच्छे कन्या' या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी 'मिस्टर एंड मिसेस अय्यर' या चित्रपटामुळे मिळाली. याचे दिग्दर्शन तिची आई अपर्ण सेन शर्मानेच केले होते. ती सायन्स रायटर आणि जर्नलिस्ट मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिची आई अपर्णा सेन एक प्रसिध्द सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.

    'मिस्टर एंड मिसेस अय्यर'साठी कोंकणाला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा २००५ साली 'पेज थ्री' चित्रपटात चमकली. या चित्रपटामुळे तिची हिंदी चित्रपट वर्तुळात ओळख निर्माण झाली. यापूर्वी तिने अनेक भूमिका केल्या असल्या तरी ते चित्रपट कमर्शियली सक्सेस नव्हते. या दरम्यान तिने 'वेक अप सिड' चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणाने मिळवला आहे.

    २००६ साली 'ओंकारा 'आणि २००७ साली 'लाइफ इन ए मेट्रो' या चित्रपटांसाठी कोंकणाला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. सहाय्यक अभिनेत्रीचा कोंकणाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोंकणा सेन ही अतिशय सिलेक्टेड चित्रपटातून आपल्याला दिसली आहे. प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी सरसकट चित्रपटातून काम करण्याचा मोह तिने टाळला. आशयघन चित्रपटातूनच ती दिसली आणि छोट्या भूमिकातूनही ती उठून दिसली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 4, 2019


  • रघुनाथ पंडित

    मराठी पंडित कवी. त्याची चरित्रविषयक माहिती निश्चित स्वरुपात उपलब्ध नाही. तो कोण असावा, हयाबद्दल पाच मते आढळतात ः (1) तो कारवारकडील चंदावर गावचा सारस्वत ब्राम्हण असावा. (2) तो तंजावरचा असावा आणि मोरोपंतांचा समकालीन असावा. (3) तो मुळात रायगड जिल्हयातील चौलचा आणि त्याचे आडनाव मनोहर. तो पुढे कर्नाटकात स्थायिक झाला. त्याने वैद्यविलास, कविकौस्तुभ, छंदोरत्नावलि, चिकित्सामंजरी व नाडीज्ञानविधी ही साहित्यविषयक व वैद्यकविषयक प्रकरणे संस्कृतात लिहिली. प्रसिध्द दमयंतीस्वयंवरही त्यानेच लिहिले. (4) तो शिवाजी महाराजांचा अष्टप्रधानांपैकी एक असून `पंडितराव ` हया पदावर होता. (5) शिवकालातील राजव्यवहारकोश लिहिणारे रघुनाथ नारायण हणमंते हेच रघुनाथपंडित होत. दमयंतीस्वयंवर किंवा नलोपाख्यान हे त्यांनीच लिहिले. हया सर्व मतांचा विचार करुन , शं. गो. तुळपुळे हयांनी हा कवी तंजावरचा होता व तो राजकारणपटूही होता, असा निष्कर्ष काढला आहे.

      March 11, 2015


  • कवयित्री कविता महाजन

    कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.

      September 5, 2021


  • बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज

    अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली.

    मोहम्मद अझिज यांनी 'दूध का कर्ज', 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत' यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले. 'प्यार हमारा अमर रहे', 'ऐ मेरे दोस्त', 'तेरी बेवफाई का शिकवा', 'मितवा भूल ना जाना', 'फूल गुलाब का', 'दुनिया में कितना गम है', 'रब को याद करु', 'बहुत जताते हो', 'तू कल चला जायेगा', 'हम तुम्हें इतना', 'माय नेम इज लखन', 'तुने प्यार की बिन बजाई', 'तुमसे बना मेरा जीवन', यासारखी हिट गाणी गायली आहेत.

    २७ नोव्हेंबर २०१८ रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मोहम्मद अझिज यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=MNOjKA6vO-0
    https://www.youtube.com/watch?v=zczC3QjqArA

      November 27, 2018