इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
https://www.youtube.com/watch?v=g2fMBQrWN8g
पक्के 'काँग्रेसवाले' असणारे गदिमा 'कोणे एके काळी' गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते?
https://www.youtube.com/watch?v=Y6FuYf7r46Y
मराठी संगीत रंगभूमीला संजीवनी देणारे नाटककार, साक्षेपी संपादक, प्रभावी वक्ते आणि पत्रकार, बहुभाषाकोविद हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर आज 26 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन.
राज ठाकरे यांनी मुंबईतील हिंसक घटनांनंतर ११ ऑगस्ट रोजी केलेले आझाद मैदानावरील भाषण.
पंडित राम नारायण म्हणजेच सारंगी आणि सारंगी म्हणजेच पंडित राम नारायण इतकं अद्वैत या दोघांमध्ये निर्माण झालं होतं. ज्याप्रमाणे उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेब यांच्या जाण्याने शहनाई पोरकी झाली, त्याचप्रमाणे पंडित रामनारायण यांच्या जाण्याने आज सारंगी पोरगी झाली आहे.
https://www.youtube.com/watch?v=A4bayFMDuZc
गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?
दिनांक 6 डिसेंबर ….
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.
गदिमांची रचना ऐकून आनंद बक्षींनी कान पकडले आणि ते पटकथालेखक ग.रा. कामतांना म्हणाले “कामत..सा….ब!! ये लिखना तो ह्मारे बस की बात नही”!!
भगतसिंगाचे हौतात्म्यवेड तर पराकोटीला गेलेलं होतं! संसदभवनात बॉम्ब फेकून स्वतःहून साखळदंड पेहेरून घेतले होते त्याने! कारागृहात जगन्मातेशी स्वरचित कवितेतून त्याने अहोरात्र आळवणी चालवली होती ’मेरा रंग दे बसंती चोला…..भगतसिंग तसा इतर क्रांतिवीरांच्या तुलनेत सुदैवी ठरला. कारण त्याचं नाव माहीत नाही असा कोणी भारतीय आज सापडणार नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti