नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
व्यक्ती आणि समाज परस्परपूरक असायला हवेत कारण ही राष्ट्राची दोन तोंडे आहेत. व्यक्तीने समाजासाठी, समाजाने राष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. दोघांपैकी एकानेही आततायीपणा केला की राष्ट्राचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात भारुड पक्ष्याचे उदाहरण देता येईल. एका मोठ्या सरोवरामध्ये भारुड पक्षी राहतात. त्याला दोन तोंडे होती, मात्र शरीर एकच होते. एकदा भारुड पक्षी सरोवराच्या काठावर आला असता, जवळच्या झाडावरून एक फळ खाली पडले. एका तोंडाने ते लगेच उचलले व ते तो खाऊ लागला. ते फळ फारच मधुर होते, त्यामुळे फळ खाताना ते पहिले तोंड म्हणाले, '' मी आजपर्यंत एवढे सुमधुर फळ खाल्ले नाही. '' ते ऐकून दुसऱ्या तोंडालाही ते फळ खाण्याची इच्छा झाली. त्याने पहिल्या तोंडाला ते फळ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की आपल्या दोघांचे पोट एकच आहे त्यामुळे मी खाल्ले तरी ते याच पोटात जाणार आहे, असे म्हणून त्याने ते संपूर्ण फळ एकट्यानेच खाऊन टाकले.पहिल्या तोंडाच्या अशा वागण्यामुळे दुसऱ्या तोंडाला फार राग आला. त्याने पहिल्या तोंडाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी भारुड पक्षी फिरत असताना दुसऱ्या तोंडाला एक फळ सापडले. ते फळ फारच विषारी होते. दुसऱ्या तोंडाने ते खाण्यास सुरुवात केली, त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की, अरे हे फळ विषारी आहे ते पोटात गेल्यास आपण दोघेही मरून जाऊ. मात्र दुसऱ्या तोंडाने त्याचे म्हणणे मुळीच ऐकले नाही. त्याला पहिल्या तोंडाला धडा शिकवायचा होता. तो म्हणाला, ' 'मी हे फळ खाणारच. तू मला सांगणारा कोण?'' असे म्हणून त्याने ते संपूर्ण विषारी फळ खाल्ले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व थोड्याच वेळात भारुड पक्षी मरून पडला. एका तोंडाने वाईट हेतूने आततायीपणा केल्याचे फळ त्याला मिळाले होते.

आता तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता. त्याचे केसही पिकले होते आणि दाढी मिश्याही पिकल्या आहेत. पण विजय हल्ली रोज चकाचक दाढी करतो. आणि केसही काळे करतो कधी कधी ! खरं तर विजयला केस काळे करायला आवडत नाही पण याला कारणीभूत होती आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती !
माझेही बरे चालले होते माझी चित्रे खपत होती.परंतु त्या दाढीवाल्याने मात्र पार मार्केट हलवून ठेवले होते.तो दाढीवाला आणि मी दोस्त होतो , परंतु दाढीवाला जबरदस्तच होता. अर्थात तिचाही तो मित्र होता.
सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.!
आटपाट नगर होतं तिथं एक गरीब कुटुंबातील पाच जण कसे बसे दिवस काढत होते. पौरोहित्य आणि चार पाच ठिकाणी देवपूजा यातून जे मिळायचे ते समजून घेऊन आनंदात रहात होते. मोठय़ा मुलीला असेच खातेपिते घर बघून लग्न करून दिले. गावातील लोकांनी थोडा हातभार लावला होता. एक जबाबदारी आणि खायचे तोंड कमी झाले. नतंरचे दोन मुलगे सरकारी शाळेत शिकत होती. अचानक वडिलांना आजार झाला आणि त्यातच ते देवाघरी गेले. मोठा यंदा दहावीत होता. म्हणून कशी बशी परीक्षा दिली. पास झाला. मग पौरोहित्य करु लागला पण आता पहिल्या सारखे वातावरण राहिले नाही. त्यामुळे दुकानात हिशेब लिहिण्याची नोकरी करु लागला. अशीच एक गरीब घरातील मुलगी सांगून आली. सणवार. आणि सवाष्ण म्हणून काही बाही मिळायचे याची सोय होईल म्हणून लग्न करणे आवश्यक होते ते झाले. उमा नावाप्रमाणेच सगळे काही निमूटपणे समाधानाने करत होती. आणि आता आजुबाजुला असलेल्या ग्रामीण भागातील लोक सदाशिवला पौरोहित्य करण्यासाठी बोलावू लागले होते. आणि बायकोला घेऊन या शिधा घेऊन जायला सांगत. एकदा श्रावणात सूनबाईनी पाटलांच्या घरी पुरणवरणाचा स्वयंपाक करुन पाचपंचवीस लोकांना जेऊ घालून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. पाटील व पाटलोण बाई एकदम खुष. जातांना भरपूर शिधा. साडी चोळी ओटी भरली. सासूबाई म्हणाल्या तुझ्या या स्वयंपाकानेच एक दिवस तुझ्या घरी लक्ष्मी चालत येईल….
थंडी खूपच पडली होती. संध्याकाळच्या वेळेस तर बाहेर पडणे शक्यच नव्हते. घरांतील बाहेरची कामे सकाळीच उरकून टाकण्याची आता सवयच झाली होती. गेले दोन महिने थंडीने कहरच केला होता. भाजी आणण्यासाठी सुद्धा उन्हाच्या वेळेत जाणे भाग पडत होते.
अनघा दिवाळी अंक २०२१ मधील सुभाष सुंठणकर यांची कथा.
(जपानची पुराणकथा)
फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे
घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता.
‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या.
तो एक वाईट मुलगा होता . ‘आदर्श कथा ‘ मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच . गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते ,पण याचे नाव शाम होते . गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती . म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई , म्हातारी , थकलेली , अंथरुणाला खिळलेली . ‘ आता माझ मरण जवळ आलंय ! माझ्या माघारी तुझं कस होणार ?तुला कोण पहाणार ? तुझे लाड कोण करणार ? तू शाळेतून आल्यावर तुला -गाजर का हलवा -कोण करून देणार ? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार ? ‘असं म्हणून घळाघळा रडणारी असते . ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा ! )
कुठलाही प्रसंग किंवा परिस्थिती असली तरी याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं हसू असायचं . मध्येच वेगवेगळे आवाज काय काढेल ,लिहिता लिहिता एकटाच वाकुल्या करेल , साध्या विनोदावर सुद्धा उगाच हसेल , शिक्षकांनी उभं करून प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसेल तर चित्रविचित्र तोंडं करेल असा खुssशालचेंडू होता तो … आपल्या अश्या वागण्यामुळे इतरांनाही हसायला भाग पाडायचा. .. म्हणूनच तर शाळकरी मित्रांनी त्याचं नामकरण “जोकर” केलं होतं.
Copyright © 2025 | Marathisrushti