नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
May 12, 2017
साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील . इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं.
November 17, 2023

अंधार दाटून आला होता, आणि रवींद्र त्या अंधारात चालत जात होता. आजूबाजूला किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता तर पायाखालची माती काटे, गवत, लहान खडे यांनी चालायला अडथळा आणत होती. पण रवींद्रचे लक्ष पुढे काळोखात जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या व्यक्तीवर खिळले होते आणि पुसट दिसत असणाऱ्या त्या व्यक्तीच्या मागे तो भान हरपल्या सारखं चालत जात होता. ना त्याच्या हातात टॉर्च किंवा काही दिवा नव्हता, ना त्या पुढे चालत असलेल्या व्यक्तीच्या हातात काही होते, केवळ चंद्राच्या प्रकाशात दिसेल एवढ्याच प्रकाशात ती व्यक्ती चालत होती पण, पायाखालची वाट, ती जागा, त्या व्यक्तीला अगदी तोंडपाठ असल्यासारखी वाटत होती. उलट रवींद्रचे लक्ष त्याच व्यक्ती कडे असल्याने तोच मधे मधे अडखळत होता, त्या व्यक्तीच्या हातात काहीसं असल्यासारखं त्याला दिसलं होत.
October 26, 2021
आटपाट नगर होते.
“त्याला राजा नव्हता. एक मुख्य मंत्री होता आणि अनेक मंत्री होते. आधी सुरुवातीला एक मुख्य मंत्री आणि पाच दहा मंत्री असे छोटेसे मंत्रीमंडळ होते. सगळे चांगले चालले होते. हळू हळू मंत्र्यांना कळले की आपण मंत्री आहोत ते लोकांनी निवडून दिलेले असलो तरी त्यांची कामे केलीच पाहिजे असे नाही. एकदा निवडून आलो की लोकांना विसरले तरी चालते. आपली आणि आपल्या सात पिढयांची कमाई करून घ्यायची ही संधी आहे.
December 22, 2023
अंधश्रध्देवर प्रहार करून जळजळीत सत्य उलगडणारी लघुकथा
April 1, 2017
३१ डिसेंबर ही तारीख जवळ येऊ लागली की सर्वजण वर्षाची अखेरची रात्र आनंदात कशी घालवता येईल याचे बेत आखू लागतात. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय असे वेगवेगळे ग्रुप्स आपापल्या पसंतीनुसार कुठे जमायचं, काय खायचं आणि काय प्यायचं याचे मनसुबे आखू लागतात. या पाटर्यांसाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला फुटवायचं यावरही चर्चा सुरु होते. अमका कसा बोअर आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच तमकीचं दर्शन नको रे बाबा अशा कॉमेंटस्ची रंगत खुलू लागते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सिद्ध होतात. ३१ डिसेंबरची प्रतिक्षा सुरु होते.
वर्षभर कामाच्या रगाडयात सापडलेल्या मनाला कधी ना कधी विरंगुळा हवाच असतो. हा विरंगुळा या ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या निमित्ताने सर्वांना लाभतो. असे आनंदाचे क्षण आपल्या मित्रमंडळींसमवेत अथवा प्रियजनांसमवेत घालविणे हा माणसाचा स्थायीभाव. साहजिकच अशा मौजमजेच्या प्रसंगी आपल्या सोबत कोण असावं याचेही ठोकताळे ठरलेले असतात. समान आवडीनिवडी असलेली मंडळी एकत्र जमतात. हास्यविनोदाला उधाण येतं. मनात साचलेलं मळभ दूर करण्याची संधी चालून येते. ३१ डिसेंबरची रात्र या घडीला वेगळं महत्त्व प्राप्त होतं.
३१ डिसेंबर हा दिवस वर्षभरात घडलेल्या घटनांचीही उजळणी करुन जातो. वर्षभरात आपले कोणकोणते आडाखे चुकले, अपेक्षेप्रमाणे कायकाय घडलं नाही आणि कोणते प्रसंग जीवावर घाव घालून गेले याच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. वर्षभरात घडलेल्या सुखद घटनांच्या स्मृती सोबत असतातच. मात्र काय गवसलं यापेक्षा काय हरवलं याची जंत्री मोठी असते. या निराशेवर मात करण्यासाठी उपाय एकच असतो. ३१ डिसेंबरच्या रात्री एकत्र जमून कटू आठवणींचं ओझं दूर सारायचं. मनाला उभारी देत नव्या वर्षाच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. मरगळ झटकून पुन्हा ताजं तवानं व्हायचं.
थोडक्यात आप्त जनांबरोबरची पार्टी हे एक निमित्त असतं. या निमित्ताचा आधार घेत स्वतःचं स्वतःला सावरायचं असतं. हे सावरताना समविचारांच्या मंडळींचा, त्यांच्या सोबत रंगणाऱ्या गप्पांचा आधार मोठा असतो. म्हणूनच कदाचित अशा पाटर्यांना साऱ्या जगभर मान्यता लाभली असावी. ३१ डिसेंबरच्या रात्रीला खऱ्या अर्थाने रंगत दिली जाते ती पंचतारांकित अथवा मोठ्या हॉटेलमध्ये. अशा हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरसाठी जय्यत तयारी करण्यात येते. सरत्या वर्षांचं प्रतीक म्हणून ओल्ड मॅनचा पुतळा उभा करण्यात येतो. फुलांच्या आणि दीपमाळांच्या सजावटीने सारा परिसर सुशोभित केला जातो. वाद्य संगीताचा शिडकावा मन प्रफुल्लीत करण्यास सिद्ध असतो. सारा माहौल आनंद आणि उत्साहामध्ये आकंठ बुडून जातो.
मोठ्या हॉटेल्सचा भव्य थाटमाट दिमतीला नसला तरी घराघरातील छोटया पाटयांचा माहौल बहुतांशी तसाच असतो. इथेही खाण्यापिण्याची जय्यत तयारी सज्ज असते. डीव्हीडीतील संगीताचे सूर आसमंतात निनादत असतात. मन प्रफुल्लीत करणारं वातावरण इथेही थोडया फार फरकानं सिद्ध होतं. साधारण दहाच्या सुमारास अशा पाटर्यांना आकार येऊ लागतो. अकरा साडे अकरा पर्यंत रंगत वाढत जाते आणि ठीक बाराच्या ठोक्याला आनंदाचा परमोच्च बिंदू साधला जातो. 'हॅप्पी न्यू इअर'च्या शुभेच्छांनी वातावरण दुमदूमून जाते. मोबाईल्स, फोनच्या रिंगटोन्स निनादू लागतात. बाहेर कुठेतरी फटाक्यांची आतिषबाजी सुरु होते. प्रियजनांचे हात हस्तांदोलनासाठी जुळून येतात. नव्या वर्षाचं प्रफुल्लीत चेहऱ्यानं आणि उत्साहाची परिसिमा गाठलेल्या मनानं स्वागत केलं जातं.
१ जानेवारीची सकाळ उजाडते ती शुभेच्छांच्या सोबतीने. कार्यालयातील सहकाऱ्यांना, नातेवाईकांना फोन जाऊ लागतात. काल रात्री आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं याची देवाणघेवाण सुरु होते. थोडं उजाडल्यानंतर एस.एम.एस. पाठविण्याचे सोपस्कार सुरु होतात. मनापासून नाही तरी उपचार म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा काहींना पाठविणं अपरिहार्य असतं. अशा मंडळींची एस.एम.एस.वर बोळवण केली जाते. अर्थात आपल्याला आलेले एस.एम.एस.याच स्वरुपाचे असणार याचीही जाणीव मनाला चटका लावून जाते. अमक्याने आपल्याला साधा फोन न करता एस.एम.एस.वर भागवलं याची चुटपूट जीवाला लागूनच जाते. पण आज नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो. अशा छोटयामोठया कुरबुरींसाठी आज अवसर नसतो. नव्या वर्षाच्या नव्या दिवशी आपण नव्या दमानं घराबाहेर पडतो.
१ जानेवारीच्या रात्रीही क्वचित एखादी पार्टी अथवा आऊटिंग पार पडतं. त्यानंतर उगवतो तो २ जानेवारीचा दिवस. दोन दिवस आनंदात न्हाऊन निघालेलं मन आता रोजच्या वास्तवाला सामोरं जाण्यास सिद्ध होतं. सहजगत्या रोजचे व्यवहार सुरु होतात. दैनंदिन कामकाजात आपण बुडून जातो. कामांचे ताण, पैशांचे हिशेब, आपापसातले हेवेदावे, सर्व कसं पुन्हा सुरळीत सुरु होतं. अगदी दोन दिवसांपूर्वी आपण वेगळं काही अनुभवलं होतं याचा विसर पडतो. धकाधकीच्या आयुष्यात आपण सामावून जातो. काळाच्या ओघात आणखी एका नव्या वर्षांची संथ वाटचाल सुरु होते.
- सुनील रेगे
July 3, 2022
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.
November 25, 2025
रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता. त्याने आपला धाकटा भाऊ ‘सुग्रीव’ याच्यावर फार अन्याय केला होता. रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरिता वालीला ठार मारले आणि सुग्रीवाला राज्यावर बसविले. या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचे कबूल केले. त्याने आपले आणि इतर वानर राजांचे सारे सैन्य गोळा केले. लाखो वानर वीर गोळा झाले.
October 15, 2024

शेरलॉक होम्स ह्या खाजगी गुप्त हेराच नांव ऐकलं नाही असा वाचक नसेल. तो इतका प्रसिध्द झाला की लंडनमधे बेकर स्ट्रीटवर त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. खरं तर शेरलॉक होम्स हे ॲार्थर कॉनन डायल ह्या लेखकाने निर्माण केलेलं एक पात्र आहे, जे लेखकापेक्षा प्रसिध्द झालं. आजची कथा ही ॲार्थर कॉनन डायल यांनीच सुरूवातीला लिहिलेली कथा आहे. संपूर्ण कथा हे एका आरोपीने ज्यूरीला केलेलं बचावाचं निवेदन आहे. कृपया वाचकांनी स्वत:ला ज्यूरीचा सदस्य समजून कथा वाचावी व निर्णय द्यावा.
July 27, 2022

सुरूवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण या गोष्टी सतत माझ्या कानावर येवू लागल्या आणि माझ्या लक्षात आलं की, आपली आरूपण आता मोठी झालीय. मी तिला माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल कधीच बोलले नव्हते.
October 10, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti