नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

१९५५/५६ सालची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा…. साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते. आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं.
वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.
वेश्या जीवनातील जगणाऱ्या स्त्रियांची विदरक्ता लेखातून रेखाटली आहे . ही कहाणीही त्याचं उर्मिलेची आहे … ती उर्मिलाही सामान्य स्त्री सारखीच एक आहे पण ह्या समाजमान्य खोट्या चेहऱ्याने तिला वेशेचा एक कलकचं लावला ती सामान्य स्त्री सारखी जगू पाह्यला खूप धडपडली पण शेवटी तिचं ह्या समाजात जगनच त्यांना अमान्य होतं ..
जीवनात कोणतेही आव्हान स्वीकारायचे असेल, तर त्यासाठी जिद्द व चिकाटी हवी. शिवाय समोर आलेले कोणतेही आव्हान आपण स्वीकारूच व त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास असला तर कोणतेही असाध्य काम साध्य व्हायला वेळ लागत नाही.
एकदा एका राजाला एका विशेष कामासाठी चांगल्या कर्तबगार अधिकार्याची गरज होती. असा अधिकारी परीक्षा घेऊनच त्याला निवडायचा होता. त्यासाठी त्याने राजवाड्यासमोरील भव्य पटांगणावर एक मोठा डोंगर तयार केला व हा डोंगर दुसर्या बाजूला जो नेऊन ठेवेल त्याला ते मुख्य पद मिळेल,
अशी अट त्याने घातली. प्रत्यक्ष राजवाड्यात नोकरी मिळणार म्हणून अनेक तरुण त्या स्पर्धेत उतरले. मात्र समोरचा डोंगर लांबूनच पाहून त्यातील जवळजवळ सर्वच तरुणांचे अवसान गळाले. हा डोंगर उचलून तो दुसर्या बाजूला नेणे सर्वस्वी अवघड आहे असे त्यांचे मत बनले. शिवाय नोकरीसाठी अशी विचित्र अट घातली म्हणून त्यातील अनेकांनी राजालाच वेड्यात काढले. परंतु त्यामधील एका तरुणाने मात्र हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. तो अतिशय आत्मविश्वासाने त्या डोंगराजवळ गेला त्याने बारकाईने त्या डोंगराचे निरीक्षण केले. त्या वेळी त्याच्या लक्षात आले की, हा डोंगर अगदीच कृत्रिम आहे. तो काड्या, कापूस, कागद आदी हलक्या वस्तूंनी तयार केलेला आहे. त्याने त्या डोंगराच्या
तळाशी हात घालून तो उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला सहज लक्षात आले की, हा डोंगर आपण डोक्यावर उचलून नेऊ शकतो. त्याप्रमाणे त्याने दोन्ही हातांनी डोंगर उचलला व डोक्यावर ठेवून तो दुसर्या बाजूला नेऊन ठेवला व राजाची अट पूर्ण केली. हा तरुण तो डोंगर डोक्यावरून घेऊन जात असता स्पर्धेतील इतर तरुण मात्र हे आम्हीही सहज केले असते, असे म्हणू लागले. त्यावर राजा त्यांना म्हणाला, ' 'मी तुम्हाला थोडेच अडवले होते? केवळ तुमच्यात आत्मविश्वास व आव्हान स्वीकारण्याची जिद्द नव्हती म्हणून तुम्ही या स्पर्धेतून पळ काढलात. '' राजाने नंतर त्या विजयी तरुणास प्रमुख पदावर नेमले व तरुणानेही राजाचा विश्वास सार्थ ठरवला.
रोज सकाळी सुगंधा बाईसाहेबांकडे जाण्याआधी टपरीवर भजी बनवून जाऊ लागली, तिकडचे काम संपल्यावर लगेच ती हॉटेलवर येत असे. किसन्या मन लावून ग्राहकांची सेवा करत होता, त्यांना काय हवं के नको ते जातीने पाहू लागला.
आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ठिकाणी , वेगवेगळ्या संदर्भातील आजुबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा अनेक अर्धवट,अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असतात मग त्या “चांगल्या किंवा कधीकधी वाईट” ही असतात पण त्यांना पूर्णत्वास न्यायला लावावंच लागतं ……..असंच एखादं ….”ठिगळ”
काही वेळानी गाडी चालवता चालवता बाबांनी आरशातून मागे बघितलं … तर दोन्ही मुलं कंटाळून झोपलेली … आईस्क्रीममुळे चिकट झालेली दोघांची तोंडं , खेळून मळलेले कपडे , हातात धरून ठेवलेली नाईट ड्रेसची पिशवी आणि चेहऱ्यावर निरागस भाव … ते बघून कसल्याश्या विचारानी तो गालातल्या गालात हसला.
मी घातलेला सदरा कुणीतरी माझ्या शरीरावरून अलगदच वेगळा केला होता, इतका की मलाही कळले नव्हते. बसमध्ये माझ्या मागच्या सीटवर बसलेल्या कुणीतरी कात्रीने हे कृत्य फारच सावधगिरीने आणि कलाकारीने केले होते. मी बसमध्ये डुलक्या घेत होतो.

तो रस्ता काढत काढत त्या माडीच्या दरवाज्यापर्यत पोहचतो तो दरवाज्यात पोहचताच आपोआप माडीचा दरवाजा उघडतो…तो आत जातो तर आत अतिशय सुंदर खोली असते…त्या खोलीत मस्त अत्तराचा सुगंध दरवळत असतो… पण त्या खोलीत कोणी नसते म्हणून तो जिना चढून पहिल्या मजल्यावर जातो तर तिथे सुंदर स्वयंपाक घर असते…तेथेही कोणी नसते…दुसऱ्या मजल्यावर देवघर असते, तिसऱ्या मजल्यावर शयन कक्ष असते. चौथ्या मजल्यावर बैठकीची खोली असते…पाचव्या मजल्यावर वाचनालय असते…सहाव्या मजल्यावर…मोकल्या जागेत फक्त सतरंजी अंथरलेली असे पण तेथेही कोणीच नसते शेवटी तो सातव्या मजल्यावर पोहचतो तर तेथे एक दाढी वाढलेले साधू महाराज ध्यानाला बसलेले असतात. तो राजकुमार जाऊन त्यांच्या पाया पडतो…
Copyright © 2025 | Marathisrushti