नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

दोन वर्षानी विजयने ती शाळा सोडली पण त्यांनंतरही त्या रस्त्याने जाताना त्याला ती बाई आठवायची ! आणि त्याच्या मनात एक अनोळखी भीतीची लहर निर्माण व्हायची.. विजय देव गणाचा असल्यामुळे फार घाबरला नव्हता.

ओढा जिथे चंद्रकोरीसारखा वळला होता, तिथूनच थोड्या अंतरावर खुळीचं खोपट होतं. खुळीचं खोपट आणि ओढा ह्यामध्ये मोठं मोकळं कुरण होतं. जेव्हां ओढा पाणी पुरवत असे तेव्हां कुरणात गुरं चरत. मागची झाडी आणि समोरचा ओढा ह्याभोवती खुळीने मनाने एक वर्तुळ आंखून घेतलं होतं. त्याबाहेर ती जात नसे.
हाच तिचा खुळेपणा होता.

मी मात्र सभ्य पांढरी कॉलरवाला, कोणता विचार करून बसलो होतो. त्या दिवशी माझी मलाच लाज वाटली.

आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले म्हणाली, “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी. माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.”

सकाळ झाली तशी सखू उठून लगबगीने कामाला लागली.आज सक्रातरचा सण,घरी काही तरी गोड-धोड करायचे व्हते. सणावाराला कधी तरी गोड-धोड लेकरांना मिळायचं,न्हायी तर एरी घरात आठरा विश्व दारिद्र्यच व्हते.कालच सखूने बाजारातून गुळ आणला व्हता.

बाहेर पाऊस वाढला होता हस्त नक्षत्राला सुरुवात झाली होती शिवाय दोन दिवसा मध्ये नवरात्राला सुरुवात होणार होती. या पावसाचे नक्षत्र मुळे शेतामध्ये भयंकर दलदल झाली होती. सफरातून बाहेर पडायची शिष्ट नव्हती इतका पाऊस वाढला होता त्यावेळी आम्ही सर्वजण आमच्या शेतामध्ये राहायला होतो. या पावसा मध्ये अधूनमधून वाऱ्याची झुळूक आली म्हणजे आंब्याच्या झाडाच्या डाळ्या एकमेकावर आदळत होत्या. सुनबाई च्या ओढ्याला भरपूर पाणी आले होते पूर्वेकडून वाहणारा सुनबाईचा ओढा पाण्याने भरभरून वहातहोता.

गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.

आरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते.

तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते , मुलगा चांगला होता . पण एक दिवशी स्कुटरचा अपघात झाला आणि तो गेला. फक्त लग्नाची तारीख ठरायची राहिली होती.

आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे.
Copyright © 2025 | Marathisrushti