नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

सौरभ शाळेतून घरी आला तोचमुळी आनंदात आणि का येऊ नये? गायन स्पर्धेत पहिला आला होता तो. सौरभ गिरकी घेत घरात शिरला. शाळेचे दप्तर कोचावर धाडकन फेकले. अंगातला युनिफॉर्म तसाच भिरकावला आणि तो मोठ्याने गाणे बडबडू लागला. “सौरभ, अरे काय चालले आहे?” आईने विचारले. “तू काय आता लहान आहेस? काय हा पसारा मांडून ठेवला आहेस. अरे, नववीत आहेस. जरा नीट वाग.” सौरभ म्हणाला, “अगं आई, मी आज शाळेत गायन परीक्षेत पहिला आलो.” ‘अरे वा! उत्तम! अभिनंदन! म्हणून तुला कसंही वागायला परवानगी नाही मिळाली.” आई म्हणाली. ‘आधी बूट जाग्यावर ठेव, दप्तर कपाटात जाऊ दे आणि युनिफॉर्म धुवायला जाऊ देत. आधी हातपाय धुवून घे. आधी खाऊन घे आणि खाऊन झाल्यावर खेळायला जा.’ “हो. तु टीचरसारखी छडी घेऊन मागे लाग माझ्या. नाहीतरी तु टीचर आहेसच.” “हो. आहेच मी शिक्षिका.” आई म्हणाली. “आणि मी जे काही सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच सांगते आहे.” “हो कळलं.’ सौरभ म्हणाला, “सारखे लेक्चर नकोय मला. मी गायनाच्या परीक्षेत पहिला आलो त्याचे कौतुक राहिले दूर.” “तसं नाही रे राजा,” आई म्हणाली, “कौतुक तर आहेच पण तू चांगलं वागावंस हीच माझी इच्छा आहे रे. मी कोणी तुझी शत्रू का आहे?” हे चालू असताना सौरभची आजी बेडरूममधून बाहेर आली. ती सगळे “आत ऐकत होती. ती म्हणाली, “अगं, राहू देत. आज तो इतक्या खुशीत आहे तर त्याच्या आनंदात विरजण घालू नकोस.’ अलका म्हणाली, “अहो आई, पण म्हणून त्याने बेशिस्तीने वागावे असे नव्हे ना. मी काय त्याची वैरीण आहे का? त्याने स्वत:चे स्वत: आवरावे, खाऊन घ्यावे आणि खेळायला जावे यात कसले आले विरजण! अहो, आजकालची मुले मैदानी खेळ खेळत नाहीत त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होत नाही. शारीरिक हालचालींमुळे त्यांचे शरीर सुदृढ राहते मानसिक विकास होतो आणि मुख्य म्हणजे सांघिक खेळामुळे हार पचविण्याची मानसिक ताकद मिळते. मी सुद्धा शाळेत खेळाची शिक्षिका असल्यामुळे मला हे जास्त ठाऊक आहे.” आजी म्हणाली, “असू दे. आजचा दिवस त्याला जास्त काही बोलू नकोस. एवढा आनंदात आहे तर आजच्या दिवस नाही खेळायला गेला तर काही बिघडत नाही.’

वैधानिक इशारा : या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही !

शेरलॉक होम्स ह्या खाजगी गुप्त हेराच नांव ऐकलं नाही असा वाचक नसेल. तो इतका प्रसिध्द झाला की लंडनमधे बेकर स्ट्रीटवर त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. खरं तर शेरलॉक होम्स हे ॲार्थर कॉनन डायल ह्या लेखकाने निर्माण केलेलं एक पात्र आहे, जे लेखकापेक्षा प्रसिध्द झालं. आजची कथा ही ॲार्थर कॉनन डायल यांनीच सुरूवातीला लिहिलेली कथा आहे. संपूर्ण कथा हे एका आरोपीने ज्यूरीला केलेलं बचावाचं निवेदन आहे. कृपया वाचकांनी स्वत:ला ज्यूरीचा सदस्य समजून कथा वाचावी व निर्णय द्यावा.

1978 पासून रेल्वे मध्ये काम करीत असताना अनेक गमतीजमती झाल्या होत्या. खरंतर जवळून पाहिलेली रेल्वे या विषयावर काही कथा लिहिल्या आहेत. काही जण म्हणतातवाचलयशिवायलिहीतायेतनाही. हे अगदी खरे आहे परंतु रेल्वे मध्ये काम करीत असताना समोर घडलेली गोष्ट.

कदाचित माझा प्रवास हिंसेकडून अहिंसेकडून सुरु झालेला आहे कदाचित तो तेंव्हाच सुरु झाला होता जेंव्हा वीस वर्षापुर्वी मी मांसाहार सोडून शाकाहारी झालो होतो…

आरूने गेल्या दोन दिवसांत नीलला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडले होते. पण ‘आज तुला डॉ. जोशींकडून योग्य ती सर्व उत्तरे मिळतील’ असे नीलने तिला सांगितले. अर्धा तासाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले.

पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले..

पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं. पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला.

मी सहज आईस्क्रीम पार्लर मधल्या आमच्या सकट इतर काही टेबलांवर नजर फिरवली . कुठे मित्रांच्या गप्पा , कुठे लहान मुलांचे गोंगाट , काही परिवार , वयस्कर व्यक्ती , कुणी सेल्फी काढतायत कुणी आईस्क्रीम चे फोटो काढतायत आणि बरंच काही …

ती माझ्या लाइफ मध्ये आली ती एक ऍक्सीडेन्ट म्हणून. ती दिसायला मस्त होतीच पण तिचा मूळ गुण म्हणा , अवगुण म्हणा.. एन्जॉय लाईफ…
Copyright © 2025 | Marathisrushti