नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

सातपुड्याच्या पायथ्याशी येळकोटवाडी नावाचं गाव व्हतं. साधारण दीड दोन हजार वस्तीचं गाव.. गाव तसं लहानच… गावाला खंडूबा प्रसन्न व्हता… गावात शिरताच म्होहर च खंडूबाचं देवुळ व्हतं …या खंडूबाच्या देवळाच्या रावळात एक माणूस बशेल असायचा… दिसा तो नसायचा पण रातीला तो तिथंच गवसायचा… त्याचं नाव पांडबा…

नारायण भंडारी या नावासह पूर्णतः काल्पनिक . यातील घटना प्रसंगाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही , तसा कुणाला आढळला तर तो योगायोग समजावा.

खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती झिंटा. हात पायाच्या कड्या, पुढे आलेले पोट. खोल गेलेले डोळे, डोक्यावर हातात पाण्याची भांडी, खाच खळग्याची जमीन तुडवत एका डबक्याकडे चालल्या होत्या, भांडी कपडे धुवायचे आणी तेच पाणी पिण्यासाठी घेऊन यायचे, रोज ५ किमी चालणे तर कायमचे पुजलेले, पाण्याचे कायमच दुर्भिक्ष, पिण्या करता वेगळे पाणी असू शकते हे माहीतच नाही, विजेचा दीवा कधी पाहिलेलाच नाही, जेवणात भाताची पेज, व सुकी चवळी शिजवलेली, बटाटा कधी पाहिलेलाच नाही.

दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती.

चायनीजच वेड किती आहे सांगायलाच नको. प्रत्येकाला वाटत, एकदा तरी चायनीज जेवण जेवाव. पण अस्सल चायनीज लोक मुंबईत भरपूर आहेत. पण ते शोधायला हवेत. गेली तीन-चार पिढया ही चायनीज मंडळी मुंबईत स्थायिक आहेत आणि उत्कृष्ट बम्बय्या हिंदी बोलतांत. शोधा म्हणजे सापडतील.

या ग्रामीण भागामध्ये 1969सालि करमणुकीची साधने अतिशय कमी होती. आमच्या लक्ष्मीच्या देवळामध्ये प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यावेळी एकतारी भजन किर्तन पोवाडे भेदिक असे कार्यक्रम असायचे. आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या शेतामध्ये किंवा दुसऱ्याच्या बांधावर रोजंदारी करीत होती.

मी ऐकलं होतं की स्मार्टफोनवर बरीच ॲप्स डाऊनलोड करून घ्यावी लागतात. मग ती वापरतां येतात. पण त्यासाठी मला फोनवर कुठेच इंटरनेट सांपडेना. खूप खटपट केली. पण फोनवर ठराविक तीच चित्रं वगैरे दिसायची. टच फोन होता. पण वारंवार टचटच करूनही कांही त्या मोबाईलला दया येत नव्हती.

वरात एकाएकी थांबली . गाणं वाजवण्यात दंग झालेला बँड बंद झाला . भल्या मोठ्या स्पीकर्सच्या प्रचंड भिंती अचानक अबोल झाल्या . रस्त्यावर बेभान होऊन नाचणारे , लोळण घेवून नागीण डान्स करायला अधीर झालेले , मान खाली घालून एक हात उंचावत , वाद्यांच्या ठेक्यावर डोलणारे इकडे तिकडे बघू लागले .

तो रस्ता काढत काढत त्या माडीच्या दरवाज्यापर्यत पोहचतो तो दरवाज्यात पोहचताच आपोआप माडीचा दरवाजा उघडतो…तो आत जातो तर आत अतिशय सुंदर खोली असते…त्या खोलीत मस्त अत्तराचा सुगंध दरवळत असतो… पण त्या खोलीत कोणी नसते म्हणून तो जिना चढून पहिल्या मजल्यावर जातो तर तिथे सुंदर स्वयंपाक घर असते…तेथेही कोणी नसते…दुसऱ्या मजल्यावर देवघर असते, तिसऱ्या मजल्यावर शयन कक्ष असते. चौथ्या मजल्यावर बैठकीची खोली असते…पाचव्या मजल्यावर वाचनालय असते…सहाव्या मजल्यावर…मोकल्या जागेत फक्त सतरंजी अंथरलेली असे पण तेथेही कोणीच नसते शेवटी तो सातव्या मजल्यावर पोहचतो तर तेथे एक दाढी वाढलेले साधू महाराज ध्यानाला बसलेले असतात. तो राजकुमार जाऊन त्यांच्या पाया पडतो…

आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता … सगळीकडे थंडगार झालंय … बाहेर फक्त पावसाचा आवाज … त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड !
सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही … आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला !
हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं .. सगळीकडे धूसर धूसर ! . आणि त्याचा एका लयीतला आवाज ! काहीच करु नये … त्याच्या समोर शांत बसावं .. त्याचं म्हणणं ऐकावं .. मग जणू त्यालाही बरं वाटतं आणि तो द्रुत लयीत बरसायला लागतो …
अशा पावसाळी हवेत कवितेची सोबत मला फार हवीहवीशी वाटते … काचांवर ओघळणारे थेंब पाहिले अन् शांताबाईच्या ओळी आठवल्या ..
“आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे “
Copyright © 2025 | Marathisrushti