नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

आज ती भेटणार होती दोन अडीच महिन्यानंतर मध्येच बरेच काही घडून गेले होते, त्या कोरोनाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते,

परवाच एके ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला “या Stupid ला काही कळत नाही” असं म्हणताना ऐकलं . आता त्या “स्वारी” पासून या “स्टुपिड” पर्यंतचा हा प्रवास काही एका दिवसात झालेला नाही . या मध्ये बरेच टप्पे आले .

दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती.

आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे.

पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..”

अनघा दिवाळी अंक २०२१ मधील सुभाष सुंठणकर यांची कथा.

मित्रानो, इंटरनेटवर काही कथाबीजे सापडलीत. मी त्याना, माझ्या कुवती प्रमाणे, मायबोलीचा पेहराव चढवून स्वैर अनुवाद, मराठी वाचकांसाठी केलाय. मला आवडलेल्या काही कथा – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’तुन – आपल्या भेटीस येतील. स्वागत कराल हि आशा. अजून एकवार सांगतो या कल्पना माझ्या नाहीत.

चार्लस डीकन्स हा व्हीक्टोरीयन काळांतील सर्वांत सुप्रसिध्द लेखक. त्याचे लिखाण आजही वाचले जाते. आजही शालेय/महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्याच्या वाङमयाचा समावेश असतोच. त्याला स्वतःला मात्र जास्त शिक्षण घेतां आलं नव्हतं. त्याच्या अनेक कादंबऱ्या, कथा आणि एखाद-दोन नाटके प्रसिध्द झाली. त्याचे बरेच लिखाण प्रथम साप्ताहिक किंवा इतर नियतकालिकांमधून मालिका स्वरूपांत प्रसिध्द झालं. सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून तो गाजला. अनेक कृतींचे चित्रपटांत रूपांतर झाले. पिकवीक पेपर्स, टेल आॕफ टू सिटीज, डेव्हिड कॉपरफील्ड, आॕलीव्हर ट्वीस्ट, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स आणि वरील कादंबरी ख्रिसमस कॕरोल ह्या कांही त्याच्या प्रसिध्द साहित्यकृती. ख्रिसमस कॕरोल ही कादंबरी सर्वांत प्रसिध्द कृती म्हणावी लागेल. त्यांत स्क्रूजच्या माध्यमातून दिलेला संदेश फारच महत्त्वाचा आहे. कादंबरी अर्थातच मोठी आहे. परंतु ख्रिसमस आलेला असल्यामुळे ती कथेच्या स्वरूपांत मी आपल्यापुढे सादर केली आहे.

एक
प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे.
आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते.
दोन
हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार गुट्ट. बाईंच्या मनात विचार आला 15 मिनिटात 25 माणसांना गरमगरम चहा पाजून कपबश्या विसळून जाग्यावर ठेवल्या असत्या.

चेकॉव्हच्या कथांत दिसून येणाऱ्या बंडखोरीचा उगम आईला व मुलांना त्यांच्याकडून मिळणारी हिंसक वागणूक यामधे असावा, असा एक तर्क कांही समीक्षक लावतात. चेकॉव्ह डॉक्टर होता व तो मजेत म्हणत असे, “वैद्यकी ही माझी कायदेशीर पत्नी आहे तर साहित्य हे माझे बाहेरचे “प्रकरण” आहे.”
Copyright © 2025 | Marathisrushti