नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

बिपीनच्या मनात पुढचे आराखडे पक्के होते, आपला प्रवास जितका गुप्त राहील तितके त्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते. यामुळेच त्याने विमान प्रवास टाळून ५० तासाचा गाडीचा कंटाळा येणारा प्रवास पत्करला होता.

फोल्डिंगच्या खुर्च्या बघितल्या होत्या. पण भिंतीत घडी होणाऱ्या खुर्च्या सरळ भिंतीत उभ्या राहतात आणि छोटेखानी दिवाणाची जागा मोकळी होते. भिंतील खेटून उभ असलेल पुस्तकाच कपाट रात्र झाली की आडव होत

सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .

पूर्वीच्या काळी गावागावात, चोपेवर, देवळाच्या पारावर, किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत चौथऱ्यावर त्याचप्रमाणे शहरातील मुख्य चौकात, एखाद्या पानठेल्यावर किंवा नाक्यावर लोक समूहाने एकत्र यायचे. उशिरापर्यंत त्यांचे रात्री गप्पांचे फड बसायचे. त्याच पद्धतीने हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून, व्हाट्सअप किंवा फेसबुक यांच्या ओट्यावर बसून म्हणू या हवं तर आपण. तर समूहानेच एकत्र येऊन गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत भरलेले दिसून येतात.

नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल.

प्रसिद्ध लेखक मंगेश कदम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये एसी फुल्ल असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. चेहरा सुद्धा आक्रसल्यासारखा दिसत होता. मेजावरच्या ऍश ट्रे मध्ये तीन मोठ्या गोल्डफ्लेक लाइट्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत होत्या. चौथी सिगरेट अर्धवट पिऊन झालेली त्यांच्या बोटाच्या चिमटीत होती.

न रडणारं, बुटांचा आवाज ऐकत स्तंभित झालेल, नुकतंच जन्मलेलं बालक इतकं बोलकं असू शकतं? कुणास ठाऊक, कॅमेऱ्याची करामतअसावी. टोपलीत ठेवून ते मूल अलगद छोट्या ओहोळात सोडलं जातं. वाहत वाहत पुढे पुढे जात राहतं. अजूबाजूचा प्रदेश बदलत जातो.

नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता बोलत बसले होते , बाबुला बसून बसून पाठीला रग लागली म्हणून तो उठला त्याने त्याचे दोन्ही हात वर ताणून धरले आणि त्याच वरच शरीर उजव्या बाजूला ताणल आणि अचानक त्याच लक्ष अशोक आणि सरिता कडे गेल , आणि पाहतो तर काय अशोक आणि सरिता एकमेकांना मिठी मारून बसले होते , त्याने लगेच त्याची नजर फिरवली , का जाणे त्याला आपण काहीतरी चुकीच पाहिलं म्हणून अपराध्या सारख वाटायला लागल , तो तसाच सुन्न अवस्थेत बसून राहिला , आणि काही वेळातच अशोक ची पाठीवर पडलेली थाप पडताच भानावर आला.

“ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली. रजनीने कथा संपवली खरी, पण कथा संपली नाहीं !

आता तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता. त्याचे केसही पिकले होते आणि दाढी मिश्याही पिकल्या आहेत. पण विजय हल्ली रोज चकाचक दाढी करतो. आणि केसही काळे करतो कधी कधी ! खरं तर विजयला केस काळे करायला आवडत नाही पण याला कारणीभूत होती आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती !
Copyright © 2025 | Marathisrushti