नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.

गेल्या ५/६ दिवसात मौशुनी भूतान देशातील विविधता पाहिली, रीन्पोंची बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास, आदराची भावना या सर्व गोष्टींचा खोल परिणाम तिच्या मनावर झाला होता. तिला एक वेगळेच जग पाहण्यास मिळाले होते, पण मनाच्या दुसऱ्या कप्प्यातून तिचा भूतकाळ उलगडू लागला होता.

चांदणी चौकातल्या हॉरीबल ट्रॅफिकमध्ये प्रचंड बेफिकिरीने निंजा घुसवत तो माझ्या बाजूला केव्हा आला ते कळलच नाही .
ना हेल्मेट . ना ट्रॅफिक जॅमचं टेन्शन .
ना ट्रॅफिक हवालदाराची भीती . चेहऱ्यावर जस्ट बेफिकिरी …
मी पहात राहिले .
तो माझ्या जुन्या गाडीकडे भयंकर नजरेनं पहात होता .
” या नंबरवर मेसेज टाक , उद्या तुला सोडायला येतो आयटी पार्क मध्ये .”
त्यानं त्याचा नंबर त्याच्याच रुमालावर लिहून माझ्या अंगावर फेकला .आणि न बघता स्पिडमध्ये निघून सुध्दा गेला .
मी रुमाल हाती घेतला आणि नकळत तो हुंगला .
कुठल्या तरी उंची सिगारचा वास येत होता .
ट्रॅफिक सरकेल तशी मी हळूहळू पुढं होत होते .
मात्र डोक्यात ‘ तो ‘ होता .

कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्याचीवाडी….चलो भुर्याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि रम्याही त्याच्यापाठोपाठच एस.टी.तून खाली उतरले.भुऱ्याचीवाडी फाट्यावर उतरणारे ते तिघचं पॅसेंजर होते.रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले असतील.अमावस्येची रात्र असल्याने काळा निबीड अंधार पडलेला होता.तसं पाहिलं तर त्यावेळी त्या रस्त्यावरून कुणीही जायचं नाही.त्यातही अमावस्येच्या रात्रीला तर बिलकुलच नाही.त्याला कारणही तसंच होतं ते म्हणजे भुऱ्याचं….! होय…. भुऱ्याचच…! भुऱ्याच्या नावावरूनच त्या गावाचं नाव भुऱ्याचीवाडी असं पडलं होतं.गावातली वाडवडील माणसं नेहमी भुऱ्याच्या वेगवेगळ्या अन् रंजक कहाण्या सांगायचे,म्हणुनच सहसा अमावस्येच्या रात्रीला त्या रस्त्यावर सामसुम असायची.त्या काळरातीला त्या रस्त्यावर भुऱ्याचं साम्राज्य असतयं असं गावकरी म्हणायचे.अमावस्येच्या रात्रीला बारा वाजल्यापासून ते सव्वा एक या कालावधीत भुर्या त्या रस्त्यावरील साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट असायचा असही म्हणतात.रात्रीच्या त्या प्रहरी जो कुणी भुर्याच्या त्या मायावी साम्राज्यात प्रवेश करायचा त्याचा खात्माच व्हायचा.भुऱ्या वेगवेगळ्या रूपात येऊन हे सर्व करतो असही गावातले म्हातारे -कोथारे लोकं सांगायचे.
आज तुला आमच्यातून जाऊन सात वर्षे झाली.. सहज मागे वळून पाहिलं तर ते मनाला पटतही नाही.. असं वाटतं तू अजूनही आमच्यातच आहेस..

वैधानिक इशारा : या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही !

जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर, ती ‘कुटुंब’ हे व्यवस्था आहे. तिला वाचावा! जमले तर एखाद पासबुक तुम्हीही उघडून घ्या!
आत्माराम नीलकंठ अर्थात आनंद साधले यांची ‘ मातीच्या चुली ‘ (आत्मचरित्र ) आणि ‘ हा जय नावाचा इतिहास आहे ‘(महाभारतावरील ) हि पुस्तके चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीत, तुम्हीही ती वाचली असतीलच. पंचाहत्तर वर्ष्याच्या आयुष्यात त्यांनी साठ पुस्तक लिहिली आहेत ! त्यांच्या लेखनाबद्दल लेखक / वाचक मंडळीत खूप प्रवाद आहेत.आपण त्या प्रवादांत न पडता आता फक्त त्यांच्या ‘ हटके ‘ कथान बद्दल बोलू.

संगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले.
‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti