नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

विजयच्या आयुष्यात काय ? कोणाच्याच आयुष्यात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही ! यावर विजयचा ठाम विश्वास होता. विजयचा पाय दुखणे ! तो ही सलग चार महिने ! कोणत्याच उपचारालाही प्रतिसाद न मिळणे . ही विजयला एक सामान्य घटना नक्कीच वाटत नव्हती… या चार महिन्यात विजयासह अनेकांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्या चार महिन्यांमुळे अनेक घटना घडणार होत्या. विजयला सध्या तो जी नोकरी करत होता ती नोकरी त्याला सोडायचीच होती पण ती सोडायला काही ठोस कारण मिळत नव्हते.

अंधश्रध्देवर प्रहार करून जळजळीत सत्य उलगडणारी लघुकथा
शाळेत असताना देहू-आळंदीला आमची सहल गेली होती. तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबा-तुकारामांचं दर्शन घडलं. काही वर्षांनंतर आमच्या गावाहून आजीसह दहा बारा वारकरी मंडळी आली होती. त्यांना घेऊन मी दोन दिवस देहू-आळंदी केले. त्यांच्या समवेत पिठलं भाकरीचं जेवण केलं. रात्री वाळवंटातील कीर्तनाचा सोहळा अनुभवला..
ताजमहल’ हा बीना राय सोबतचा चित्रपट त्यातील सुमधुर गीतांइतकाच, अप्रतिम होता. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चित्रलेखा’चा रिमेक १९६४ साली झाला. हा चित्रपट भव्य सेट्स व मातब्बर कलाकारांमुळे नेत्रदीपक ठरला. नर्गिस सोबतचा ‘रात और दिन’ हा नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या..
सकाळी सव्वा सात वाजता एजंट सैफुल हॉटेलच्या लॉबी मध्ये येऊन थांबला होता. अर्ध्या तासात हॉस्पिटल असलेल्या भागात पोचलो, पण माझे मेडिकल चेक अप नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये नसल्याने सैफुल ला थोडं शोधावं लागलं. जकार्ता मधील लिप्पो व्हिलेज या पॉश एरिया मध्ये सिलोम हॉस्पिटल ची मोठी शाखा होती.

प्राचीन काळातील गोष्ट. विंध्यच्या एका गावात चार चोर राहात होते. त्या गावाबाहेरच्या जंगलात एक साधू राहात होता. साधू गावाजवळच्या शिवालयात पूजा करायला जात असे व तेथील प्रसादावर आपली उपजीविका करीत असे. चोर साधुकडे जात असत आणि आपल्या कुकर्माबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून गरिबीमुळेच आपण चोरी करतो असे साधूला सांगत असत.
हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो.

“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले.

सध्या तुफान व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल… लाकडी खाटेवर बसलेला एक पाच वर्षांचा लहानगा विडी ओढत आहे , असा ती व्हिडीओ आहे. बघायला गमतीशीर आहे तो. अगदी मोठ्या माणसासारखा बसलाय पायावर पाय टाकून. दोन बोटांत विडी. मधूनच तो झुरके मारतोय. धूर सोडतोय. दोन झुरक्यांच्या मधल्या काळात , विश्वाची चिंता लागावी आणि ती डोळ्यातून व्यक्त व्हावी , तसे हावभाव.
एकाच छताखाली सर्वांना एकोप्याने बांधून ठेवणारं, टीव्ही बंद करुन खेळीमेळीने जेवण करायला लावणारं, घराबाहेर पडताना देवघरातील अंगारा कपाळावर लावायला सांगणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं व संकटाच्या वेळी देवांना पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं कुणीतरी मोठं माणूस घरात असायलाच हवं..
Copyright © 2025 | Marathisrushti