(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • कठोर शिक्षा- भाग ३

    “तुम्ही हे जहाल वीष कुठून आणि कसं मिळवत?” यशवंतने प्रशन केला.
    “मी ते माझ्या शाळेतून घेतलं. म्हणजे, मी ज्या शाळेत केमिस्ट्री हा विषय शिकवते, तिथून” रजनीने उत्तर दिलं.
    “मला नी़ट खुलासेवार सांगा. ” यशवंत.

  • इस दुनिया में जीना है तो

    शोले’ चित्रपटानं इतिहास रचला.. त्यातील ‘मेहबुबा, मेहबुबाऽ..’ हे नृत्यगीत खास आकर्षण होतं.. ‘इन्कार’ चित्रपटातील ‘तु मुंगळाऽ..’ या देशी बारमधील गाण्याने सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत कहर केला…

  • झुंडशाही (कथा नंबर १)

    बस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच.

     

  • योद्धा (कथा)

    अजित हा एकदम हुशार मुलगा ! एकपाठी असला तरी फक्त  घोकमपट्टी न करणारा ! सतत नवे प्रश्न विचारून शिक्षकांना सतावणारा.शाळेच्या वेळेत अभ्यासपूर्ण करून इतर वेळात वर्तमानपत्रे, मिळतील ती पुस्तके वाचणारा. रोज न चुकता प्रादेशिक व राष्ट्रीय बातम्या रेडिओवर ऐकणारा.कसलीही सभा असली तरी तिथे जाऊन वक्त्यांची व्याख्यानं ऐकणारा.

  • वास्तुविशेषांक

    आप्पा महाशब्दे यांच्या बोटांना लाभलेले वरदान केवळ बोर्डाच्या अक्षरांपाशीच घोटाळत राहिले नाही. तर कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या विविध अंगांनी ते बहरून आले. विविध संस्थांच्या अनेकविध कार्यक्रमांसाठी गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे. आतापर्यंत अशी हजारो स्मृतिचिन्हे त्यांच्या हातून बनली आहेत. याशिवाय बॅनर्स, बॅचेस, साइन बोर्ड्स, मानपत्रे अशा कितीतरी बाबीत आप्पांची मुशाफिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

  • दगडाखाली हात असलेले लोकप्रतिनिधी

    बरेच जण हेच रडगाणं रडत असतात की आमच्या गावातले रस्ते, पिण्याचे पाणी, आणि अतिक्रमणे याच्यावर कोणी काहीच करत नाही. सगळे जण ग्रामपंचायत, पंचायत समिती, ज़िल्हा परिषद यांच्या सदस्यांना नावं ठेवत होते.

  • नवरात्र …माळ आठवी

    आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता … सगळीकडे थंडगार झालंय … बाहेर फक्त पावसाचा आवाज … त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड !
    सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही … आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला !
    हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं .. सगळीकडे धूसर धूसर ! . आणि त्याचा एका लयीतला आवाज ! काहीच करु नये … त्याच्या समोर शांत बसावं .. त्याचं म्हणणं ऐकावं .. मग जणू त्यालाही बरं वाटतं आणि तो द्रुत लयीत बरसायला लागतो …
    अशा पावसाळी हवेत कवितेची सोबत मला फार हवीहवीशी वाटते … काचांवर ओघळणारे थेंब पाहिले अन् शांताबाईच्या ओळी आठवल्या ..
    “आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे “

  • माध्यम

    महानगरातली रात्र. लखलखणाऱ्या दिव्यांची दिवाळी असल्यासारखी सजलेली. पण त्या सर्व गजबजाटापासून दूर असलेला, समुद्र किनाऱ्यालगत असलेला, श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वस्तीतला एक बंगला. या बंगल्याला असलेली अखंड सोबत समुद्राच्या गाजेची.

  • मुडदा (कथा)

    आपल्यापैकीच एक जण मरण पावला. तो कसा मरण पावला हे बघवत नाही. मग कुणीतरी सहन न होऊन चादर पांघरतो. जिवंतपणी बिचाऱ्याला पांघरायला काही नव्हत. थंडी-जी काय थोडीफार वाजते तिच्यामुळे अर्धमेला झाला. गेल्यावरती पांघरुण मिळालं बिचाऱ्याला. मग त्या प्रेतावर डोळा ठेवून, त्यावर मयतासाठी पडणाऱ्या पैशांवर नजर ठेवून बसणारे महाभागही असतात. त्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ ? त्यांनाही थंडी वाजतच असते.

  • फ्युज उडालेले बल्ब

    शहरातील पाॅश एरियातील हाउसिंग सोसायटीमध्ये, रहायला येऊन मला पाच वर्षे झाली होती. मी भारतीय नौदलात पस्तीस वर्षे सेवा करुन निवृत्त झालो होतो. रोज सायंकाळी आम्ही आठ दहाजणं ज्येष्ठ नागरिक, सोसायटीच्या बागेत गप्पा मारत बसायचो. त्यामुळे वेळ मजेत जात असे.

    गेल्या महिन्यापासून आमच्याच वयाची एक नवीन व्यक्ती आम्हाला बागेत दिसू लागली होती. ते गृहस्थ उंचेपुरे व धिप्पाड शरीरयष्टीचे होते. ते आमच्या समोरुन जाताना, आमच्याकडे तुच्छतेने पहात असत. बागेत दोन चकरा मारुन झाल्यावर कोपऱ्यातील बाकड्यावर, ते एकटेच बसत. कधी कुणाशी बोलणे नाही, कुणाला पाहून हसणं नाही.. आम्हा सर्वांना त्यांचं वागणं हे चमत्कारिकच वाटायचं..