(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • प्रोजेक्ट – ‘मय्यत’ !

    हि माझी कथा -विदूषक १९९९च्या दिवाळी अंकात सु र आळंदकर या नावाने ‘भोवनीच मयत ‘ या शीर्षका खाली लिहली होती.

  • मानसकोंड-मासा

    त्यांना मदत करणाऱ्या वाहन चालकांना हे ठाऊक नव्हतं , की हाही एक धंदा आहे . कारण ते पाणी पैसे देऊन निघून जात होते .
    मनातून सुखावत होते . आपण माणुसकी दाखवली या आनंदात ते जात होते . लोकांच्या भावनेचा धंदा करता येतो आणि लोक फसत राहतात , हे पुन्हा पुन्हा जाणवत होतं .

  • जानेमाने मॅनेजर

    १९८१ पासून जाहिराती व डिझाईनचे काम करीत असताना प्रत्यक्ष ग्राहक व आम्ही काम करुन देणारे, यांच्यामध्ये ‘मॅनेजर’ उर्फ मध्यस्थी म्हणून काम करणारी एखादी व्यक्ती असायचीच. काम करवून घेणे, त्या कामासाठी वारंवार आठवण करणे अशी त्या व्यक्तीची जबाबदारी असायची.

  • संक्रांत

    तीळगूळ घ्या मधूर बोला विनवीत येई संक्रांत
    परंतु जाई पुन्हा वर्ष ते नियमित ओरड आक्रांत।

    संक्रांतीच्या आक्रांतीतही काळोखाचा अवशेष
    पुन्हा पुन्हा संक्रांती देती सौहार्दाचे संदेश ।।

    --- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य

  • कशासाठी? ‘धाका’साठी!

    एकाच छताखाली सर्वांना एकोप्याने बांधून ठेवणारं, टीव्ही बंद करुन खेळीमेळीने जेवण करायला लावणारं, घराबाहेर पडताना देवघरातील अंगारा कपाळावर लावायला सांगणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं व संकटाच्या वेळी देवांना पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं कुणीतरी मोठं माणूस घरात असायलाच हवं..

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २३)

    या साऱ्या वातावरणामुळे आणि आवडीमुळे, डीएसके विश्वमध्येही माझी बरीच ज्येष्ठ मित्र मंडळी असल्यामुळे गुरुवर्य द.भी. कुलकर्णी सरांचेकडे माझे नित्य जाणे होत असे. अनेक ज्येष्ठ मान्यवर त्यांच्याकडे येण्यास उत्सुक असत.

  • डोळे – एक छोटी कथा

    एकदा डोळे म्हणाले, ‘या समोरच्या दरीपलीकडे एक डोंगर आहे. किती सुंदर दिसतोय तो. पाहा तर, आत्ता त्याला चारही बाजूंनी दाट धुक्यानं वेढलंय. पण एकूण दृश्य फारच सुरेख दिसतंय.’

    डोळ्यांचं बोलणं ऐकून कान म्हणाले, ‘डोंगर? कुठे आहे डोंगर? मला कोणताही डोंगर ऐकू येत नाहीए!’

  • माध्यम

    महानगरातली रात्र. लखलखणाऱ्या दिव्यांची दिवाळी असल्यासारखी सजलेली. पण त्या सर्व गजबजाटापासून दूर असलेला, समुद्र किनाऱ्यालगत असलेला, श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वस्तीतला एक बंगला. या बंगल्याला असलेली अखंड सोबत समुद्राच्या गाजेची.

  • वाहतो ही ‘शब्दां’ची जुडी

    १९६४ रोजी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचा शुभारंभ झाला व आशाजींच्या ‘ताई’ने शेकडो प्रयोगांतून लाखों नाट्यरसिकांच्या मनात कायमचं ‘घर’ केले.

  • कोंडी

    इथला निसर्ग चारी बाजूने पोखरला जात आहे आणि भयभीत जनावरांची कोंडी झाली आहे. चारी बाजूनी माती आणि दगडांच्या शोधातील मंडळी ट्रक लावून लूट करत आहेत. किंचित आत झुडपात हात भट्टयांची मालिकाच तयार झाली आहे. त्याबरोबरच हौशी शिकारी मंडळीनीही हैदोस मांडला आहे.