(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • पथिकवा

    ” कुठे आहेस आत्ता ? ”

    ” Whatsapp चा असा दुरुपयोग नाही करायचा . ”

    ” दुरुपयोग कसला ? तू सेशन घ्यायला पुण्याला गेला आहेस आणि पाऊस खूप आहे म्हणून काळजीने विचारले . ”

    ” काळजीने की प्रेमाने ? ”

    ” प्रेम आहे म्हणून काळजी आहे , महाराज ” .

    ” वेडाबाई , मी इतका सतत फिरत असतो की आता खरंच अशी काही काळजी करावी असं काही उरलंय का ? आणि अशी इतकी माझी काळजी करायला लागलीस तर कसं व्हायचं ? ” .

  • उगवतीच्या कळा : १

    परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं?

  • जागेसाठी महाभारत

    मु्ंबईत जागा स्क्वेअर इंचांच्या भाषेत विकायची वेळ आली आहे. ऐंशी नव्वद वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय नांदत असलेल्या चाळी पडायला आल्यात. महानगरपालिका अशा धोकादायक चाळी रिकाम्या करायला लावते. तरीही पावसांत एखादी चाळ अचानक पडतेच आणि मृत्यूही होतात. चाळींच्या जागी मोठ्या इमारती उभ्या रहाता हेत.

  • वेगळा (कथा) भाग ६

    अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो.

  • स्टॅम्प आजोबा

    साधारण दर १५-२० दिवसांनी पत्र यायचं .. मन्या तर स्टॅम्प आजोबांची वाटच बघत असायचा .. कधी जरा उशीर झाला की जाता येता विचारायचा .. “स्टॅम्प आजोबा ss .. आलं का पत्र ???” .. साता समुद्रापार असलेल्या मुलाच्या आई वडिलांपेक्षा हाच पत्राची आतुरतेने वाट बघायचा … कारण तेवढेच नवनवीन स्टॅम्प त्याच्या कलेक्शन मध्ये यायचे आणि इतर मित्रांसामोर थोडा भाव सुद्धा खायला मिळायचा

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २४)

    कै. द.भी.कुलकर्णी सरांनी मला मानस पुत्र मानले होते. हा एकार्थी मोठा सन्मानच होता. त्यामुळे आमच्या परस्पर संबंधात एक वेगळं आत्मीयतेचं निखळ वातावरण निर्माण झालं होतं. साहित्य वर्तुळात याची मजेशीर चर्चाही होत असे.

  • युरोपायण – तिसरा दिवस – पँरीस- स्पर्श

    हीथ्रो, लंडन येथील अँट्रीयम हॉटेल मधला दोन रात्रींचा मुक्काम आटोपून तिस-यादिवशी सकाळी युरोस्टार, समुद्रातील बोगद्यातूत जाणा-या, ट्रेननी पँरीसमधे अंदाजे साडे अकरा वाचता दाखल झालो. युरोस्टारच्या शेवटच्या स्टेशनला उतरुन कोचनी तडक जेवणासाठी वेलकम इंडीया या हॉटेलमधे गेलो.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १९

    संगीता रात्री ९ नंतर कामावरून परतत असे. अखंड बॅंकेचा कामात वाहून घेणे हेच तिचे जीवन होते. त्यांच्या घरातील फोनची घंटा वाजू लागली, तिच्या आवाजा वरून ती ट्रंक कॉलची आहे हे आजींच्या लक्षात आले.

  • का ? हा प्रश्न (मी आणि ती)

    का ? हा प्रश्न आपण कुणालाच विचारू नये.असे माझे स्पष्ट मत आहे. तसा मी तिलाही कधीच विचारला नाही. कारण तिच्या ‘ अफाट बुद्धिमतेची’ मला आधीच कल्पना आली होती. खरे तर ती माठ होती माठ . मुख्य म्हणजे तिलाही त्याची कल्पना होती.

  • मृगजळ

    एका अर्थाने ते खरं ही होतं म्हणा, कारण रोज सकाळी सहा वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी दोन्ही मुलांच्या म्हणजे श्रुती आणि शिरीष यांच्या अनुक्रमे कॉलेज आणि शाळेच्या डब्या च्या तयारी ने, राकेश एम आय डी सी मध्ये एका ऑटोमोबाईल कंपनीत होता त्यामुळे त्याला वेग वेगळ्या शिफ्टस प्रमाणे जावं लागायचं, तेव्हा त्याचा डबा वेगळा, आर्थिक परिस्थिती यथा तथा च असल्याने सर्व घर काम तिच्यावरच होती,  त्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ टेके पर्यंत तिचा कामाचा सपाटा सुरूच असायचा .