(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • समोरच्या खिडकीतला तो..

    सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो.

  • डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक

    डायरी तशी साधीच होती. पण जाडजूड होती. खादीच्या कापडाचं कव्हर होतं. वरवर सुस्थितीत असावी असं वाटत होतं. पण उघडल्यावर मात्र डायरीची पानं विस्कटल्यासारखी दिसत होती. डायरी चाळताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. सुरुवातीच्या पानांवरचं अक्षर चांगलं होतं. काहीसं मोडी लिपीच्या वळणावर गेलेलं आणि शेवटी शेवट मात्र अक्षरात बदल होत गेलेला दिसत होता.

  • तिसरा’ डोळा

    एक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची.

  • ब्युटीपार्लरमध्ये अनोळखी मृतदेह

    यशवंत सकाळच्या न्याहरीसाठी आले, तोच सदू निरोप घेऊन आला की क्राईम ब्रॅंचचे इन्स्पेक्टर हिरवे त्यांना भेटायला आले आहेत.
    यशवंत मनाशीच हंसले आणि म्हणाले, ‘त्यांना आतच पाठव न्याहरीला.”
    इन्स्पेक्टर हिरवे आपल्याला भेटायला येणार, हे यशवंताना अपेक्षितच होतं.

  • प्रारब्ध – भाग 3

    आजोबांनी करसनकडे फक्त एकदाच पण रोखून पाहिले. काही बोलले नाहीत. पण त्या एका नजरेनेच करसनला जणू कोणी कानफटात मारल्यासारखे वाटले असावे. तो लगेच तिथून पसार झाला.

    मिस्त्रीशेटही पहात राहिले, म्हणाले, “अरे आजोबा, मला माफ करा. हे आमचा डिकरा हाये ने करसन, लय खराब हाये. माझ्या मरणाची वाट पहाते साला.

    माझा लोखंडनो मोठा धंदा हाये. लय इस्टेट हाय. ते समदे तर याचेच हाय. पन पैसा उडवायचे अने पोरी लोक फिरवायचे ये परीस साला दुसरा काय कामधंदा नाय करीत. नाय तर नाय पन माला, मालाबी काय वाट्टेल ते बोलते. ते पन ठीक हाय पन साला तुमाला बोलते ते माला नाय आवरले. साला मेहमानाला असा बोलते काय? मला माफ करा.’

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १९)

    अनेक ठिकाणी संपादक म्हणूनही मी जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे अनेक कथालेखक , व्यंगचित्रकार , व्याख्याते , कवी , या लोकांचाही परिचय झाला होता .ज्येष्ठ ख्यातनाम चित्रकार वारंगे हे पौराणिक काल्पनिक चित्रे खुपच सुंदर काढीत असत. मीही हौशी चित्रकार असल्यामुळे त्यांचेही मला खुप मार्गदर्शन झाले , या प्रवासात खुप काही शिकलो …खुप माणसे जोडली हे मात्र खरे ..!

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ३

    ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्‍या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्‍या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि …..

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ७ )

    कै. आनंद यादव सरांना मी ओळखत होतो पण त्यांची प्रत्यक्षात कॉलेज संपल्यावर कधी भेट झाली नव्हती. पुण्यात मराठी साहित्य परिषदेत एका कार्यक्रमात मी मुद्दाम कै. प्रा.आनंद यादव सरांची आवर्जून भेट घेतली. सातारच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली.

  • वरची ब

    गावातले आमचे जुने कौलारू घर दोन माळ्याचे आहे. आमच्या त्या घरात माझ्या दोन काकांचे आणि आमचे असे तीन कुटुंब एकत्र राहायचे. शेतावरच्या घरात मोठा काका तर गावात अजुन एका घरात आणखीन एका काकाचे कुटुंब. आम्ही ज्या घरात राहायचो त्या घराच्या तळमजल्यावर आम्ही आणि दोन नंबर काकाचे कुटुंब तर वरच्या माळ्यावर तीन नंबर काकाचे कुटुंब.
  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १६)

    माझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत .