नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

आम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले. सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही.
मार्च महिन्यापासून ‘कोरोना’मुळे लाॅकडाऊन सुरु झालं आणि सर्व टाॅकीज ‘व्हेंटिलेटर’वर गेल्या. टाॅकीजमध्ये जळमटं वाढलीत. खुर्च्यांवरती धुळीची पुटं चढलीत. मनोरंजनाच्या क्षेत्रावर झालेला हा दुष्परिणाम जागतिक चित्रपटसृष्टीचं सर्वात मोठं नुकसान आहे.
दादाचा विश्वासच बसेना. ती त्याला संशोधनाची माहिती सांगितली. आता मी प्राणी किंवा माणूस एक दिवसापासून एक वर्षापर्यंत जिवंत ठेवू शकतो इतकी प्रगती केली आहे हेही सांगितलं. त्याला हे पण स्पष्ट केलं की हे अत्यंत गुप्त संशोधन आहे आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस. नंतर घरातल्या देवासमोर बेलभंडारा उचलून मी त्याच्याकडून गुप्ततेची शपथ वाहून घेतली.
या नांवाचा आग्रह केलेला नगरसेवक आज हयात नाही. त्या रस्त्यावरच्या एकाही नागरिकाला ही व्यक्ती कोण माहित नाही. महापालिकेच्या कचेरीत काम करणाऱ्या कुणालाही या रस्त्याच्या या व्यक्तीचं नाव का दिलं माहित नाही. ज्यावेळी हा ठराव झाला त्यावेळची कागदपत्र काढून बघण्यात आली, पण त्यातही त्या व्यक्तीविषयी काहीच माहिती नाही.

मी आधी सही करणार ., ती म्हणाली .. नाही मी आधी सही करणार मी म्हणालो.. दोघेही हसत म्हणालो.
कल्पनाला चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.. तशी संधी तिला, बलराज साहनी यांच्यामुळे मिळाली. ती मुंबईत आली..

खरं तर नील तिच्या बाबतीत जे खरं घडलं तेच बोलत होता. त्यामुळे आता लताला त्याचा राग यायला सुरूवात झाली होती. तिला बघायचं होतं की, नीलला आपल्या बद्दल नक्की किती माहिती आहे? ती राग आवरून धरून त्याला पुढे बोल असे म्हणाली. ’गो अहेड नील.’
नशिबाची परीक्षा घ्यायला कोल्हापूरांत आले. ते धर्मशाळेत रहात असतांना योगायोगाने त्यांना शाहू महाराजांनी पाहिले. त्यांची चौकशी केली. पणजोबांनी आपण कुठून आलो, काय उद्देश आहे ते सांगितले. शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरांत वकिली करायची परवानगी दिली. त्यांची वकिली उत्तम चालली. कोल्हापूरांत राजकृपा आणि लक्ष्मीकृपा दोन्ही त्यांना लाभली. शाहू महाराजांच्या घरांतील कोणत्याही समारंभासाठी काव्य करण्याचे काम पणजोबांकडे होते. ते शीघ्रकवी होते. नातेवाईक-मित्र यांच्याकडील विवाहासाठी मंगलाष्टकेही ते रचत. शाहू महाराजांचा सुधारणावादी दृष्टीकोन त्यांनी लगेचच स्विकारला आणि अंमलातही आणला. त्यांनी आपल्या घरीच सर्व जातीच्या लोकांसाठी सहभोजनं घालायला सुरूवात केली. भोजनाला दरबाऱ्यांनाही आमंत्रण असे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ही गोष्ट तितकी सोपी नव्हती. पण शाहूमहाराजांच्या कोल्हापूरांत ती शक्य झाली.
पण गीता ला मात्र अश्या प्रसंगांची अगदी लहानपणा पासूनच सवय होती , नीता आणि गीता या सुलभा ताई आणि श्रीधर राव यांच्या संसार वेलीवर दोन वर्षांच्या अंतराने उमललेल्या कळ्या..पण आत्ता पर्यंतच्या आयुष्यात नियतीचे फासे मात्र दोघींसाठी काही एकसारखे पडले नव्हते , नीता मोठी म्हणून लाडाची या न्यायाने प्रत्येक गोष्ट तिला न मागता विनासायास … मिळत गेली , नवीन सायकल असो वा कपडे किंवा वह्या पुस्तकं नीताला सगळं नवीन मिळायच , आणि ” चांगलेच तर आहेत की , कुठं खराब झालेत ? ” अश्या पालुपदांनी मात्र नीताचे वापरून झालेले कपडे व पुस्तकं गीताच्या वाट्याला यायची , आणि ती ही सगळं हसतमुखाने , विना तक्रार स्वीकारायची .
“देशपांडे साहेब, तुमची बॅग माझ्याकडे आलीय. त्यात तुमचा जेवणाचा डबा होता. त्यावर तुमचं नाव आहे किशोर देशपांडे म्हणून. त्यावरून मी हा टेलिफोन नंबर शोधला. ती बॅग आणि डबा घेऊन तुम्हाला भेटायला येतो साहेब!”
Copyright © 2025 | Marathisrushti