(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • गुरूवंदना गायन गृप (आठवणींची मिसळ १४)

    माझ्या साडूंनी (कै.रमेश वैद्य) निवृत्तीनंतर एक छान उपक्रम सुरू केला होता. ते स्वतः उत्तम गायक होते. ते गीतकारही होते. त्यांच्या अनेक रचना रेडीओच्या सुगम संगीतात अनेकदा चांगल्या चांगल्या गायक-गायिकांनी गायल्या. गायनावर त्यांचे खूप प्रेम होते. निवृत्तीनंतर ते इच्छूकांना गायन शिकवत असत. पण मी म्हणतो तो उपक्रम आगळावेगळा होता. दर गुरूवारी त्यांच्या घरी गाण्याची एक खास बैठक होई. त्यांत भाग घेणारे बहुतेक सर्वच जण निवृत्त झालेले होते. कांहीनी नोकरी पूर्ण केली होती तर कांही जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पण सर्वांच गायनावर प्रेम होतं. ह्या दोन-अडीच तासांच्या बैठकीत सर्वजण वीस वीस मिनिटे गात असत. जे थोडे कच्चे होते, तेही हळूहळू चांगले गाऊ लागत. कारण इतर सदस्य त्यांना उत्तेजन देत. ह्या बैठकींना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनांतखूप महत्त्वाचं स्थान मिळालं त्यांच्या या गृपला अकरा वर्षे पूर्ण झाली तेव्हां सर्वांनी मिळून एक गाण्याचा कार्यक्रमच सादर केला. दोनशेहून अधिक श्रोते त्या कार्यक्रमाला हजर होते. मला त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. काल कांही कागद चाळतांना मी त्या कार्यक्रमाच्या वेळी जे भाषण केले होते ते हाती आले. मी कांही मोठा वक्ता नाही की माझी भाषणे नोंदली जावीत. परंतु निदान तुम्हांला ते सादर करावं असं मनात आलं म्हणून इथे देत आहे.

  • गोलम गोल पाने.

    फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.
    त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती.
    सगळी पानं एकदम गोलम गोल होती.
    सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती.

    सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं.
    तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं.
    झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल.
    त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल.
    झाडाखालचं गवत सुध्दा लहान लहान गोल.
    तर मैदानातलं गवत मात्र मोठे मोठे गोल.

    पण,

    काही झाडं डुलणारी.
    काही झाडं सळसळणारी.
    काही झाडं लठ्ठं होती.
    काही झाडं रोड होती.
    काही झाडं जरा ऊंच होती.
    काही झाडं जरा बुटकी होती.
    काही झाडं फारच लहान होती.
    काही झाडं ऊंचंच ऊंच होती.
    काही झाडं एकदम सरळसोट.
    काही झाडं विचित्र वेडीवाकडी.

    झाडांना वाटे,
    आपले आकार निरनिराळे.. ..
    पण आपल्या पानांचा मात्र एकच एक आकार!
    का बरं असं?
    आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे आकार हवेत.
    आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे प्रकार हवेत.
    प्रत्येक झाडावरची पानंसुद्दा वेगवेगळी हवीत.

    प्रत्येक रंगीत पानाची रंगत वेगळी हवी.
    प्रत्येक पानाची स्टाइल वेगळी हवी.

    आणि खरंच,
    दसऱ्या दिवशी. . . . . . .

    गाई म्हशी आल्या.
    ढकलाढकली करत.. गोल गवत चराचरा चरू लागल्या.
    शेळ्या बकऱ्या आल्या..
    झाडावरती दोन पाय ठेवून, जवळची पानं बचाबचा ओरबाडू लागल्या.
    जिराफ आले..
    ऊंचावरची कोवळी पानं खुडून खुडून चघळू लागले.
    हत्तींचे कळप आले..
    झाडावरची पानं, मैदानातलं गवत मन मानेल तसं रपारप उपटू लागले.
    माकडांच्या टोळ्या आल्या..
    झाडावरची पानं तोडत आरडाओरड करू लागल्या.
    पक्ष्यांचे थवे आले..
    घरटं बांधण्यासाठी चोचीने पानं,गवत टुकूटुकू खुडू लागले.
    छटेमोठे रंगीबेरंगी किडे आले..
    मचामचा पानं खाऊ लागले. कुटूर कुटूर कुरतडू लागले.

    कुणी पानं अर्धवट खाई..
    तर कुणी मधलं मधलं गवतच तोडी.
    कुणी चोचीनं पानं कातरी..
    तर कुणी भराभरा पानं ओरबाडी.
    कुणी नखानं पानं चिरी..
    तर कुणी पंजाने पानं खुडी.
    कुणी अर्धवटच पानं खाई..
    तर कुणी उगाचंच पानं फाडी.
    पण काही पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही.

    आणि त्यामुळे. . .

    काही पानं सरळ,
    तर काही पानं लांबुडकी झाली.
    काही पानं टोकेरी,
    तर काही पानं पसरट झाली.
    काही पानं कातरलेली,
    तर काही पानं नक्षीदार झाली.
    काही पानं विचित्र झाली,
    तर काही पानं चित्रविचित्रच झाली.
    काही पानं उभी झाली,
    तर काही पानं लोंबकळू लागली.
    काही पानं अगदी एकसंध राहिली,
    तर काही पानं पार फाटून गेली.

    पण,
    ज्या पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही,
    ती पानं मात्र गोलम गोलच राहीली.

    तेव्हापासूनच...
    सगळ्या पानांचे आकार वेगवेगळे झाले.
    प्रत्येक झाडाची पानंसुध्दा वेगवेगळी झाली.

    झाडं आनंदाने फुलली
    तर
    पानं मजेत सळसळली.

    -- राजीव तांबे.

  • तिला काय आवडतं?

    कॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे! पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस! किती वर्षाची झाली बरं आई? तिला जन्मवर्ष काही आठवेना. विचार करताना एकदम लक्षात आले, आई एकदा म्हणाली होती ‘ तू जन्माला आली तेव्हा मला नुकतंच विसावं वर्ष लागलं होतं.’

  • खडूचे अभंग

    येता जाता दंश करायला , समाजातील चिल्लरातील चिल्लर माणसाला शिक्षकच सापडतो . इतर कर्मचारी त्याला दिसत नाहीत वा त्यांच्या उपद्रव क्षमतेमुळे कुणीही त्यांच्या वाट्याला जात नाही . शिक्षक बरा , त्याला झोडताही येतो आणि फोडताही येतो …

  • शरीफ’ बदमाश

    तेव्हा ग्रेगरी पेकच्या घोड्यावरती सोनं भरलेल्या पिशव्या असतात व ओमर शरीफच्या पिशव्यांत असतात फक्त दगडं.. या चित्रपटात ओमर शरीफनं ‘बदमाश’ खलनायक रंगवला होता…

  • शिक्षण कोहिनूर (कथा)

    “साहेब ते कोहिनूर वेगळे आणि हे शिक्षण कोहिनूर वेगळे. या वर्षापासून सरकारने शिक्षण क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या शिक्षकास हा सन्मान देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अण्णागुरुजी यांची निवड झाली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही मूलभूत प्रयोग केले आहेत. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळत आहे.’

  • कुणात जीव रंगला

    एक खेडूत आईची भाबड प्रेमाची गोष्ट.

  • आणि पारिजातक हसला !

    त्याचं स्मितहास्य तुम्हालाही जाणवेल. पण त्या वेड्या पारिजातकाला हे माहीत नाही की , लॉक डाऊन मुळे त्याचं हे रूप त्याला पुन्हा प्राप्त झालंय. लॉक डाऊन संपल्यावर … बाप रे ! नकोच तो विचार …

  • जोडे

    जोडे म्हणजे आपल्या दोन पायांसाठी वापरलेल्या जाणाऱ्या लेदरच्या चपला.

  • अमेरिकन गाठुडं – ५

    आपल्या कडे कंपाउंड हे भक्कम विटा सिमिटाच्या भिंतीत असते. येथे बहुतेक कंपाउंड हा प्रकार नसतोच. असला तरी लाकडी फळकुटाचे असते, किंवा मग लोखंडी. आमच्या कम्युनिटीला लोखंडाचे आहे. संपूर्ण सेक्युरिटी इलेक्ट्रॉनिक डिव्हिसेसवर. कार गेटजवळ आली कि गेट उघडते. नाही उघडले तर गेटच्या  पोलवरल्या पॅनलवर कोड नंबर प्रेस करावा लागतो. किंवा बहुतेकांच्या घराच्या किल्ल्या सोबत गेटचा रिमोट असतो. कोठेही सेक्युरिटी गार्ड नाही.