(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती (आठवणींची मिसळ १२)

    “”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते.

  • कट प्रॅक्टिस

    रात्री दीड वाजता मोबाईलची रिंग वाजायला लागल्यावर डॉक्टर फोन करणाऱ्याला बडबडत उठला. कोणाला पोटदुखी झाली यावेळी असा विचार करत मोबाईलवर दिसणारा अननोन नंबर चा कॉल रिसिव्ह केला.

  • छोटी अशी बाहुली, मोठी तिची सावली

    नृत्यदिग्दर्शिका म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक म्हणजे आठ वेळा फिल्मफेअर ॲ‍वाॅर्ड मिळविणारी ही एकमेव ‘डान्समास्टर’ होती. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी व नंदी ॲ‍वाॅर्ड विजेती सरोजने सुमारे दोन हजार गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केलेले आहे.

  • जोडवी – भाग १

    विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती…

  • नाईट ड्रेस

    काही वेळानी गाडी चालवता चालवता बाबांनी आरशातून मागे बघितलं … तर दोन्ही मुलं कंटाळून झोपलेली … आईस्क्रीममुळे चिकट झालेली दोघांची तोंडं , खेळून मळलेले कपडे , हातात धरून ठेवलेली नाईट ड्रेसची पिशवी आणि चेहऱ्यावर निरागस भाव … ते बघून कसल्याश्या विचारानी तो गालातल्या गालात हसला.

  • आम्ही लग्न मोडतोय

    आलेल्या पाहुण्यांवर मोठी काकू कडाडली,आता बोलणी बस झाली, उठा आणि निघा, आम्ही लग्न मोडतोय.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २०

    तोंगशे एकटेच ऑफीस मध्ये मौशूच्या जीवनात घडलेल्या प्रचंड उलथा पालथीच्या घटनांचा मेळ लावण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी पाहून त्यांचे मन हेलावून गेले होते.

  • अजब न्याय नियतीचा – भाग १६

    आरू आपल्याच नादात वर्णन करत होती, नील तिच्या चेहेऱ्याकडे पहात होता. आरुच्या तोंडून राजची माहिती ऐकताना त्याच्या चेहेऱ्यावर कधी आनंदाचे, कधी कौतुकाचे तर कधी दुःखाचे भाव झरझर बदलत होते. पण दोघेही नदीच्या पात्रात पाय ठेवून शेजारी बसले होते आणि बोलताना आरू नदीपात्राकडे पहात एक एक गोष्ट आठवत सांगत होती. त्यामुळे नीलच्या चेहेऱ्यावर तिचे अजिबातच लक्ष नव्हते.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ९

    संगीताला आपल्या जीवनाचे चक्र कसे चालू करायचे हेच उमगत नव्हते. विचारांचा गुंता वाढतच चालला होता, डोळ्यासमोरून मौशु जाता जात नव्हती. एका नराधमाने त्या दोघीना खोल समुद्रात ढकलून दिले होते, आशेचा एखादा किरणही डोकविण्याची सुतराम शक्यता नव्हती.

  • वैभव संपन्न आपलं घर

    नावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.