नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मणीपाल , उडुपी येथील बीचेस , मंगलोर येथील काही लोकेशन्स याचा अप्रतिम वापर करून त्यांनी कथानकाला एक वेगळं अवकाश प्राप्त करून दिलं आहे .

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.
त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती.
सगळी पानं एकदम गोलम गोल होती.
सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती.
सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं.
तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं.
झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल.
त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल.
झाडाखालचं गवत सुध्दा लहान लहान गोल.
तर मैदानातलं गवत मात्र मोठे मोठे गोल.
पण,
काही झाडं डुलणारी.
काही झाडं सळसळणारी.
काही झाडं लठ्ठं होती.
काही झाडं रोड होती.
काही झाडं जरा ऊंच होती.
काही झाडं जरा बुटकी होती.
काही झाडं फारच लहान होती.
काही झाडं ऊंचंच ऊंच होती.
काही झाडं एकदम सरळसोट.
काही झाडं विचित्र वेडीवाकडी.
झाडांना वाटे,
आपले आकार निरनिराळे.. ..
पण आपल्या पानांचा मात्र एकच एक आकार!
का बरं असं?
आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे आकार हवेत.
आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे प्रकार हवेत.
प्रत्येक झाडावरची पानंसुद्दा वेगवेगळी हवीत.
प्रत्येक रंगीत पानाची रंगत वेगळी हवी.
प्रत्येक पानाची स्टाइल वेगळी हवी.
आणि खरंच,
दसऱ्या दिवशी. . . . . . .
गाई म्हशी आल्या.
ढकलाढकली करत.. गोल गवत चराचरा चरू लागल्या.
शेळ्या बकऱ्या आल्या..
झाडावरती दोन पाय ठेवून, जवळची पानं बचाबचा ओरबाडू लागल्या.
जिराफ आले..
ऊंचावरची कोवळी पानं खुडून खुडून चघळू लागले.
हत्तींचे कळप आले..
झाडावरची पानं, मैदानातलं गवत मन मानेल तसं रपारप उपटू लागले.
माकडांच्या टोळ्या आल्या..
झाडावरची पानं तोडत आरडाओरड करू लागल्या.
पक्ष्यांचे थवे आले..
घरटं बांधण्यासाठी चोचीने पानं,गवत टुकूटुकू खुडू लागले.
छटेमोठे रंगीबेरंगी किडे आले..
मचामचा पानं खाऊ लागले. कुटूर कुटूर कुरतडू लागले.
कुणी पानं अर्धवट खाई..
तर कुणी मधलं मधलं गवतच तोडी.
कुणी चोचीनं पानं कातरी..
तर कुणी भराभरा पानं ओरबाडी.
कुणी नखानं पानं चिरी..
तर कुणी पंजाने पानं खुडी.
कुणी अर्धवटच पानं खाई..
तर कुणी उगाचंच पानं फाडी.
पण काही पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही.
आणि त्यामुळे. . .
काही पानं सरळ,
तर काही पानं लांबुडकी झाली.
काही पानं टोकेरी,
तर काही पानं पसरट झाली.
काही पानं कातरलेली,
तर काही पानं नक्षीदार झाली.
काही पानं विचित्र झाली,
तर काही पानं चित्रविचित्रच झाली.
काही पानं उभी झाली,
तर काही पानं लोंबकळू लागली.
काही पानं अगदी एकसंध राहिली,
तर काही पानं पार फाटून गेली.
पण,
ज्या पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही,
ती पानं मात्र गोलम गोलच राहीली.
तेव्हापासूनच...
सगळ्या पानांचे आकार वेगवेगळे झाले.
प्रत्येक झाडाची पानंसुध्दा वेगवेगळी झाली.
झाडं आनंदाने फुलली
तर
पानं मजेत सळसळली.
-- राजीव तांबे.
सदाशिव पेठेत माझं बालपण गेलं. रस्त्यावरच घर असल्याने जाता येता रस्त्यावरील माणसांचं निरीक्षण करण्याचा मला त्यावेळी छंदच लागलेला होता. कळायला लागल्यापासून केशव कुलकर्णीला मी पहात होतो.

वेदांग शिरोडकर अन्य कोणत्याही सुशिक्षित, सुसंपन्न, सुसंस्कारित मराठी मुंबईकराप्रमाणे एक खेळकर, आत्मविश्वासू, मनमिळावू, शहरी, सभ्य, शिष्टाचार माहीत असलेला, स्वच्छ, परिपक्वता आलेला, सामान्य ज्ञान नि वाचन असलेला, इत्यादि, इत्यादि प्राणी होता. अशा अनेक परिमाणांत आम्हा दोघांत अत्यंत शार्प काँट्रास्ट होता.

तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’

त्या व्यक्तीचे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे रवींद्रच्या कानात घुसले आणि त्याचा चेहरा पांढरा फिकट पडला. “काय…….”, रवींद्र जोरात किंचाळला ” तो मी होतो……. म्हणजे …….. तो मी होतो की आहे?” रवींद्रने आता काही झालं तरी याच्या तळाशी जायचेच असा निर्धार केला होता.
गणेशोत्सव मंडळांमध्ये असलेल्या स्पर्धेचे स्वरुप नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सुध्दा बघायला मिळते आहे. गरबा नाच करणाऱ्यांसाठी विविध व आकर्षक बक्षिसे, रंगीबेरंगी साड्या, पैठण्या , फॅन्सी ड्रेस आणि मग बक्षीस समारंभ आणि पुरस्कार सोहळे. नऊ दिवस कार्यक्रमांची नुसती रेलचेल सुरू असते.

टीव्हीवर एकामागून एक चॅनलची सुरू असलेली ढकलगाडी एकदम मुन्नाभाई एम बी बी एस वर येऊन थांबली .. त्यात “जादू की झप्पी” चा प्रसंग सूरु होता . यानी त्या शाळेच्या पुस्तकातून नजर वर करत टीव्हीकडे बघितलं आणि गालातल्या गालात थोडा हसला . बायकोनी हेरलं ते .

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं.
सचिनला स्वतःची चूक कळली होती. तो बाबांची माफी मागून सारिकाला म्हणाला, ‘आज तू एका फुटक्या नशीबाला, फेव्हिकाॅलने जोडलं आहेस.. यापुढे मी कधीही असं बोलणार नाही! प्राॅमिस!!’
Copyright © 2025 | Marathisrushti