नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

ती जणू बोलायचं म्हणून बोलत होती. खूप क्षीण आवाजात मिसेस तिवारीने मनोजला म्हटले, ‘कोमा ताले वू’ आणि आपला नाजूकसा उजवा हात त्याच्यासमोर केला. मनोज चकित झाला. त्याच्या एवढंही लक्षात आलं नाही की फ्रेच भाषेत ओळख करून देताना/घेताना ‘हाऊ डू यू डू’साठी वापरलेल्या वाक्याचं उत्तर त्या भाषेत द्यावं, कमीत कमी ती नाजुकसा, कृश हात हातात तरी घ्यावा. त्याच्या गप्प राहण्याचा वेगळाच अर्थ लावून यावेळी मिसेस तिवारींनी जर्मन भाषेत विचारलं, “आस्प्रेचे किन इंग्लिश. एस्ट एस ओ के इच ड्युश स्प्रेचे’ (मला इंग्रजी येत नाही. जर्मनमध्ये बोलू का?) मनोजचा लहानपणापासूनचा मित्र धीरज तिवारीने सांगितलं होतं की, त्याने खूप प्रयत्न करूनही त्याची पत्नी इंग्रजी शिकू शकली नाही. एवढंच काय तिला भोजपुरी सोडून खडी बोली हिंदीमध्ये बोलणंही अशक्य होतं. परंतु मिसेस तिवारी फ्रेंच आणि जर्मनमध्ये बोलतील, हे त्याला माहिती नव्हतं. आपल्या पत्नीला अतिशय कोमल स्वरात त्याने समजावून सांगितलं. “हा मनोज, माझा बालपणचा मित्र. याच्याशी आपल्या भाषेत (भोजपुरी) आरामात बोलू शकशील.’ आता मिसेस तिवारी मोठे मोठे डोळे करून त्याच्याशी बोलू लागली आणि बघतच राहिली. जणू एखाद्या अस्पष्ट चित्रात प्रवेश “करून आपली एखादी खूप आवडती गोष्ट ती शोधीत होती. जी कुठे तरी हरवली होती.

आत्तापर्यंतच्या एकंदरीत संवादानंतर नार्वेकरसर यांच्याही लक्षात आले की मुक्ताच्या कलेबद्दल घरात कोणालाच काही माहित नाही, यामागे काहीतरी ठोस कारण असेल. श्रीधरपंत खूप कडक स्वभावाचे आहेत… याची थोडीफार कल्पना त्यांना होतीच. इतक्या मोठ्या कलाकारावर स्वतच्या घरातच किती अन्याय झाला आहे, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
पूर्वी लहान मुलास भीती दाखवण्यासाठी त्याची आई म्हणायची, ‘तू जर माझं ऐकलं नाहीस तर, तुला ‘दाढीवाल्या बुवा’ला देऊन टाकेन.’ ते मूल लगेच चूप बसायचं.
भारत अमेरिकेची तुलना होऊ शकणार नाही. तो देश दोनशे वर्षा पासून स्वतंत्र आहे, आपण त्यामानाने खूप उशिरा स्वतंत्र झालोय. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत गेलो, तर कोणत्याही प्रगत देशा पेक्षा आपण मागे रहाणार नाही. अन एक दिवस, ‘सारे जहासे अच्छा हिंदूस्ता हमारा!’ आपणच अभिमानाने म्हणू. शेवटी एकच सांगावस वाटत, स्वर्ग काय अन अमेरिका काय? या गोष्टी फक्त पहायच्या असतात, राहायच्या नसतात. शेवटी ‘आपला गाव बरा!’ हेच सत्य असत!
पूर्वी साड्यांची दुकानं शहरात मोजकीच होती. आज नव्वद टक्के दुकानं, साड्यांचीच आहेत. असंख्य प्रकारच्या, प्रांताच्या, पेठांच्या साड्या, पैठणी तिथं मिळतात.

माझ्या एका कथेची ही जन्मकथा आहे . सन २००० च्या महाराष्ट्र टाइम्स च्या दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली होती .
“साहेब तो जवळ येत नाही आणि येऊ पण देत नाही ,आता तुम्हीच प्रयत्न करा .” असे म्हणत त्यांनी ती ‘खाऊ ‘ची पुडी मला दिली . त्यात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती . मी पुडी उघडली ,

शाळा सोडून दोन वर्ष पूर्ण झाली होती मी आई समवेत दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जात होतो. त्यावेळी एक दिवसाला पगार मला 75 पैसे व आईला सव्वा रुपया मिळत असे. वडील दुखण्यामध्ये गेलेले त्यांच्या वजना बरोबर दवाखान्यात पैसा घातला. देव देव उतारे खेतारे केले पण शेवटपर्यंत वडील दुखण्यातून उठले नाहीत.
प्रवीण देसाई. इंपोर्ट – एक्सपोर्ट व्यापारी. नुसताच व्यापारी नव्हे तर त्या व्यवसायातला बादशहा. आता बादशहा म्हटला म्हणजे धनदौलत मजबूतच असणार हो. तसा पैसा बक्कळ होता. अगदी ऐषआरामात लोळतच होता तो! तर अशी दौलतजादा झाली म्हणजे काही लोकांना ती सत्कार्याला लावावी, गोरगरिबांना दानधर्म करावा, शैक्षणिक संस्थांना मदत करावी, विधायक कामाला लावावी असे वाटते. पण असं वाटणारे फार थोडे असतात. बहुतेक वेळा लक्ष्मी आली की सद् विचार आणि सरस्वती पळ काढतात. सरस्वती आणि लक्ष्मीचे पटत नाही म्हणतात. फार पुण्याई लागते तेव्हाच त्यांचे पटते.

पोरगं बाहेर आलं. हातातल्या मळक्या कपड्याने त्याने टेबल साफ केलं आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है!’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला.
Copyright © 2025 | Marathisrushti