(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • जसच्या तसं

    आमच्या पिढीने हे सर्व थिएटरमधील भव्य पडद्यावर पाहिलंय. त्यामुळे आम्ही चित्रपट संपल्यानंतर बाहेर पडताना आमच्या डोक्यात हिरोच असायचा. त्याचं चालणं, बोलणं नकळत आमच्यामध्ये भिनलेलं असायचं. आता पडद्याचा जमाना गेला. आता चाळीस इंची टीव्हीवर तुम्ही जे पाहता त्याची नक्कल व अनुकरण केले जाते.

  • औदुंबर

    मी मधेच तुला सांगितल्या प्रमाणे मी आता कायमची लंडनला जात आहे .आईला बरोबर घेऊन .

    कायमचे घर सोडायचे म्हणून सगळी आवराआवर करत असताना जुन्या फोटोत तू , शिरीष आणि तुमचे भाटे सर ( माझे आजोबा ती .आप्पा ) अशा फोटोच्या २ कॉपी मिळाल्या . त्या तुझ्या घरी वहीनी कडे दिल्या आहेत….एक शिरीष साठी आणि दुसरी अर्थात तुझ्यासाठी . तुम्ही दोघे आप्पांचे अत्यंत लाडके विद्यार्थी ना ! ….नंतरच्या काळातले त्यांचे तरुण मित्र .

    …हे फोटो वहिनीला दिले तेंव्हा तिला इतके भरून आले होते ना …आणि मलाही …एक तर आमच्या दोघींचे माहेरचे आडनाव एक …आणि दुसरे म्हणजे तू आणि शिरीष चे आप्पांशी असलेले भावबंध ! ! !

  • तबला आणि मी

    तबला हे खरेच एक तालेवार प्रकरण असते . हे महाराज कधी खाली भुईवर बसत नाहीत . याना स्वतंत्र बैठक लागते ! तबल्याला आणि डग्ग्याला वेगवेगळी ! गिटारी सारखे हे गळ्यात पडत नाहीत कि लाडे – लाडे त्या गिटारी सारखे खांद्यावर चढत नाहीत , कि ‘माऊथ ऑर्गन ‘सारखा मुका घेत नाहीत ! तबला म्हणजे एकदम खानदानी काम हो !

  • नक्षत्रांची वेल

    आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली, कोरोना काळातील माझी एक कथा.

  • फरिश्ता !

    रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें.

  • उद्यान एक्सप्रेसचा थरार

    इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील,  तिकडे  बघ,  कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता.

  • श्री शिल्लक

    तिला कळत नव्हतं ,त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय . कालपासून त्यांचं वागणं काहीसं अनाकलनीय वाटत होतं . पंचेचाळीस वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास ती कालपासून धुंडाळत होती . थोडंसं काही हाती लागत
    होतं , काही हातातून निसटून जात होतं . पण कालपासूनच्या वागण्याचा बोध तिला होत नव्हता .

  • खीर आणि बासुंदी

    सर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!!

  • पारवा

    पारवा म्हणजे कबूतर. घराच्या कौलारावर अथवा वळचणीला काहीही हालचाल न करता तासन्तास शांतपणे बसून राहिलेले कबूतर अनेकांनी पाहिले असेल. एखाद्या योग्याप्रमाणे जणू काही ध्यान लावल्यासारखे ते स्थितप्रज्ञ बसलेले असते. कबुतराचा आवाजदेखील घुमल्यासारखा धीरगंभीर असतो. अशा स्थितप्रज्ञ पारव्याचे चित्र बालकवी कसे रेखाटतात पहा

  • भिंत

    आगरी भाषेत (भिवंडी भागातील) ग ऐवजी ज, ग किंवा घ ऐवजी झ, ण ऐवजी न, ड ऐवजी र, ळ ऐवजी ल तसेच काय ला क, आहे ला ह आणि मी व मला ऐवजी मना असे शब्द वापरले जातात, आगरी बोलीभाषेतील शब्द वापरून कथा लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

    हॅलो, वंसा, मी मंगल बोलताव, तुमी कई पन करा ना एखाद दोन दिसान तुमचे बारके भावासला भेटाला या. काल पाश्श्या त्यावी निस्ती हाय खाल्ले, “माजी बाय मना भेटाला कला येइ नाय मीनी क केले आवरा?” असाच बोलतान. कुंदा ताईने तिच्या भावजयीला, मंगल ला सांगितले की, उद्या सकाळीच ती दोन दिवसांसाठी राहायला येतेय. तसं रमेशला म्हणजेच तिच्या सगळ्यात लहान भावाला सांगायला सांगितले.