(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • करायचे ते करून झाले अता

    प्रदीप निफाडकरांची गझल

  • रिवर्सल मंत्र

    ज्यांनी मधुमेहाचे जीवघेणे अनुभव सोसले, वडिलांच्या मधुमेहाचा दीर्घ लढा पाहिला असे गोल्ड मेडलिस्ट डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अनुभवातून जाणले की मधुमेह हा केवळ औषध व इंजेक्शन घेऊन बरा करता येत नाही, तो जीवन शैलीशी निगडित आहे. युट्युब वरील त्यांच्या अनेक व्याख्यानामधून व इतरत्र झालेल्या अनेक व्याख्यानांमधून ते सडेतोडपणे काय करायला पाहिजे ते सांगतात. सगळं संपलं आहे असं वाटणाऱ्यांना व नैराश्य आलेल्यांना हे पुस्तक मधुमेहातून नक्कीच बाहेर काढेल.

  • आई जगदंबे

    तुझ्या सहस्रावधी रुपांच्या दर्शनाची आस आहे . तुझ्या अस्तित्वाचा ध्यास आहे. माऊली , तुझ्या प्रसन्न आशीर्वादाचा वरदहस्त नित्य लाभावा आणि मायेचा ओलावा आमच्या हृदयात पाझरत रहावा , यासाठी जगदंबे , दोन्ही कर जोडून ही विनवणी करतो आहे .

  • प्रायश्चित्त – जितका अपराध मोठा, तितके प्रायश्चित्तही मोठेच !

    आपल्याला “शिक्षा ” होणार नसली तरीही “प्रायश्चित्त ” तरी आपण घ्यायला हवे. आणि ते सोपे आहे- हात जोडून त्यांची साऱ्यांच्या वतीने माफी मागायची. मगच आपण आपल्या दैनंदिन जीवनात परतू शकू. जितका अपराध मोठा,तितके प्रायश्चित्तही मोठेच !

  • डायरीतील विस्कटलेली पाने – भाग तीन

    डायरी अस्ताव्यस्त होती, पण फार जुनी नव्हती. अतिशय रेखीव, सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या डायरीत, प्रत्येक पानावर एक ओळ आवर्जून लिहिलेली होती. माझ्याच नजरेतून मी उतरत चाललो आहे! डायरी चाळताना प्रत्येक पानावरच्या त्या वाक्याकडे लक्ष जात होतं. मी पानं उलगडू लागलो.

  • एक परीस स्पर्श (भाग – २३)

    आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता.

  • आदर्श

    थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा)

  • नाना !

    खरं तर, या ‘सकाळच्या अलार्म’ला मीच जवाबदार आहे! एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांचे झाड जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक? त्यांच्यावर उखडलो.

  • आमची इडली

    सुमती मावशी अन् माझा संपर्क सहवास अवघ्या दहा वर्षांचा; पण त्या दहा वर्षांत मला त्यांनी खूप काही दिलं. खरं म्हणजे माझ्या मनात येईल ते अन् येईल तसं मांडण्याची जागा म्हणजे सुमती मावशी. त्यांना मी मावशी म्हणत असलो, तरी त्या माझ्या मावशी नव्हत्या. व्यवहारिक अर्थानं सांगायचं, तर त्यांचं नि माझं नातं असं काहीच नव्हतं. माझ्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मीनाच्या लग्नात आमची ओळख झाली. त्या मीनाच्या मावशी. त्यावेळी माझं वय असेल तिशीच्या आत आणि त्या होत्या पन्नाशीच्या आसपास. खडकीच्या एका शाळेत हिंदी शिकवायच्या. घरात ती दोघंच. पती आणि त्या. त्यांना मूलबाळ झालंच नाही असं नव्हे; पण टिकलं नाही. व्यक्तिमत्त्व थेट पुणेरी वळणाचं. लग्नसमारंभ आटोपल्यावर `या हं, एकदा आमच्याकडे,’ असं आमंत्रण त्यांनी दिलं.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ११

    संगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले.