नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

कंडक्टरने घंटा वाजवली आणि तेवढ्यात घंटेची दोरीच तुटली. “असंच आमचं आयुष्य आहे.” तो म्हणाला अन पुन्हा कसनुसा हसला.

सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.!

या साऱ्या वातावरणामुळे आणि आवडीमुळे, डीएसके विश्वमध्येही माझी बरीच ज्येष्ठ मित्र मंडळी असल्यामुळे गुरुवर्य द.भी. कुलकर्णी सरांचेकडे माझे नित्य जाणे होत असे. अनेक ज्येष्ठ मान्यवर त्यांच्याकडे येण्यास उत्सुक असत.

‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’
नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर मारून आणायचा. तेवढाच त्यांना विरंगुळा. बाकी सर्व बेडवरच होते. बाबू नावाचा माणूस खास सेवेसाठी ठेवलेला होता. सकाळी सात ते संध्याकाळी सात तो सेवा द्यायचा.
नाटकांतलं खरं खोटं ठरवणं मोठं मुष्किल. समजा नाटकामधे रंगमंचावर प्रणय प्रसंग चालू आहे. नायक-नायिका रंगात आली आहेत. प्रेक्षकांना त्या प्रणयाच्या दृष्याने भारून टाकलंय. ते मनाशी म्हणतायत, “किती छान अभिनय !” त्याचवेळी पहिल्याच रांगेत बसलेल्या नायकाच्या पत्नीला मात्र तो अभिनय “अभिनयच” आहे की खरेच रंगलेत? ह्या शंकेचं काहूर छळत असतं आणि नंतर नाटक संपल्यावर तोच नायक तिच्याशी लडिवाळपणे बोलून प्रेम व्यक्त करतो, तेव्हां तिच्या मनांत येतं “आता हा अभिनय तर नाही ना?” अभिनय तर आपण सर्वच करत असतो.

संध्याकाळी सूर्यास्ताचा समय….. समुद्रावरून वारा प्रचंड वेगाने वहात होता. समुद्रावरचे काठ म्हणजेच सुरुचं बन अक्षरशः त्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने हेलकावे खात होतं. थंडीचे दिवस असले तरी आभाळ भरून आलं होतं आणि आता अवकाळी पाऊस पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रवींद्र वाडीत फेरफटका मारत होता. ताई आणि तिचे मिस्टर दुपारी काही कामा निमित्त श्रीवर्धन ला गेले होते. गाडी होती त्यांची बरोबर, त्यामूळे प्रवासाची चिंता नव्हती. रात्रीच्या जेवणात धरू नकोस असे सांगून ताई गेली होती. श्रीवर्धन ला एका आश्रमाला भेट द्यायला ते गेले होते. रविंद्रने त्यांना का? कशासाठी? वगैरे प्रश्न विचारायची तसदी घेतली नव्हतीच, त्याला बरच होतं की ते. त्याला जे कार्य तडीस न्यायचे होते त्यासाठी एकांत गरजेचा होताच त्यामुळे त्याने नुसतं ठीक आहे म्हणत विषय सम्पवला. मी कदाचित मित्राकडे जाईन जेवून झाल्यावर असे कानावर घालून ठेवले. आणि ताईकडे घराची एक किल्ली देऊन ठेवली.

पिंट्या अन बाळ्या दोघं लय जिगरी दोस्त व्हते.दोघबी शेजारी शेजारीच राहायचे.एकाच वयाचे आसल्यानं ते शाळत बी संगमंगच व्हते.जिवणातल्या जवळपास सगळ्याच उन्हाळ्या पावसाळ्यात ते साथीलं व्हते.नेहमी एकमेकांचे सुख दुख वाटुन घेयाचे.तेह्यचे लग्न बी दहा पंधरा दिवसांच्या अंतरानच झाले व्हते.

त्या वेळी एसएससीला होतो मी. 1966-67 चा तो कालावधी. अलीकडच्या काळात 10वी 12वी नंतर काय, याची माहिती देणाऱया अनेक संस्था, व्यक्ती आहेत. त्या वेळी ते प्रमाण फारसं नव्हतं. माझ्या घरात तर एसएससी होणारा मीच पहिला ठरणार होतो. पुढे काय, हा प्रश्न इतरांना सतावत असला तरी मला त्याचा त्रास नव्हता. कारण नववी इयत्तेत असल्यापासून काही तरी उद्योग मी करीत आलेलो होतो. त्यामुळं आता काही नवं, भव्य-दिव्य करण्याचं मनात होतं. त्या वेळी मी कोपरगावला राहत होतो. त्याच वर्षी पालिकेनं भाजी मंडईच्या बाजूनं काही गाळे काढले होते. इथं काही तरी करायला हवं.
संपूर्ण पुरावे आणि प्रत्यक्ष खून करतानाच व्हिडीओ असून सुद्धा रुद्रा फाशीवर जाईल याची खात्री दीक्षितांना वाटेना! विशेषतः डॉ. रेड्डीच्या साक्षीने त्यांना काळजीत टाकले होते. तरी ते आज शेवटचा प्रयत्न करणार होते.
समोरचा माणूस गप्प असताना त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, तो बोलू लागला की, ‘कळू’ लागतो ते त्याच्या बोलण्यातून. सवयीनुसार प्रत्येकाचे बोलणे बदलत जाते. काहींना शिवीचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही. त्याउलट संस्कारी माणूस कितीही चिडला तरी अपशब्द बोलूच शकत नाही, त्याऐवजी तो गप्प राहणेच पसंत करतो.
Copyright © 2025 | Marathisrushti