(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • आग्यामव्हळाचा तडाखा अन वानरायचा भडका……!!!

    सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! त्याच्या हातून चार शेंगा जास्त सुटायच्या.त्यालं कुठं,कव्हा आण कसे हात मोकळे सोडायचे,ही कला अवगत व्हती.आवळा देऊन कोव्हळा काढण्याच्या बाबतीत तेव लय पटाईत व्हता.सोंडू पाटलाच्या घरी चोवीस घंटे लक्ष्मी पाणी भरायची.घरची गडगंज संपत्ती,दोन चार वेगळाले धंदे,शेतजमीन,चार पाच बैलगाड्या,दहा पंधरा दुभती जनावरं,संगटच शेतात ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,थ्रेशर सारखे आधुनिक यंत्रबी दिमतीलं व्हतेच. दोन पोर्‍ह आणि जीव ववाळणारी पाटलीन हे त्याचं विश्व व्हतं. दिलदार मनाचा हा माणूस नावासारखाच रांगडा व्हता.उंच धिप्पाडं शरीर,तुर्रैबाज फेटा,आकडेदार लांब लांब जाड्या मिश्या अन भेदक नजरं असा पाटलाचा रूबाब व्हता.पाहताच क्षणी कोणालंबी जरब बसावी असा हा सोंडू पाटील…!! पंचक्रोशीत एक वजनदार आसामी म्हणून परसिध्द व्हता.तसं तरुणपणातं पाटीलं पंचक्रोशीतला एक नावाजलेला पैलवानं मनून वळखला जायचा.पाटलांनं लय गावचे आखाडे मारले व्हते.शंकरपट,कबड्डी, कुस्तीसारख्या अस्सलं मातीतल्या खेळायबरोबरचं पाटील तमाशाचाबी लयचं नांदिक व्हता.आजबी कुठंपण शंकरपट,कबड्डी,कुस्ती किंवा तमाशाचा फड पडल्याची जराशी जरी खबर कानावर आली की पाटलाची डमनी जुपलीच मनुन समजायचं….! तर आसा हा सोंडू पाटील जेवढा दिलदार तेवढाच बेरकीबी व्हता.

  • माझे आजोळ – भाग १ – पणजोबांचे घर (आठवणींची मिसळ २९)

    नशिबाची परीक्षा घ्यायला कोल्हापूरांत आले. ते धर्मशाळेत रहात असतांना योगायोगाने त्यांना शाहू महाराजांनी पाहिले. त्यांची चौकशी केली. पणजोबांनी आपण कुठून आलो, काय उद्देश आहे ते सांगितले. शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरांत वकिली करायची परवानगी दिली. त्यांची वकिली उत्तम चालली. कोल्हापूरांत राजकृपा आणि लक्ष्मीकृपा दोन्ही त्यांना लाभली. शाहू महाराजांच्या घरांतील कोणत्याही समारंभासाठी काव्य करण्याचे काम पणजोबांकडे होते. ते शीघ्रकवी होते. नातेवाईक-मित्र यांच्याकडील विवाहासाठी मंगलाष्टकेही ते रचत. शाहू महाराजांचा सुधारणावादी दृष्टीकोन त्यांनी लगेचच स्विकारला आणि अंमलातही आणला. त्यांनी आपल्या घरीच सर्व जातीच्या लोकांसाठी सहभोजनं घालायला सुरूवात केली. भोजनाला दरबाऱ्यांनाही आमंत्रण असे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ही गोष्ट तितकी सोपी नव्हती. पण शाहूमहाराजांच्या कोल्हापूरांत ती शक्य झाली.

  • सोल्यूशन डॉट कॉम (कथा)

    मुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं.

  • “चोचीतले दाणे”

    समीरचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. तो शहरातील एका मोठ्या प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला होता. घरात आई, वडील आणि हे दोघं असं चार जणांचं कुटुंब. त्याच्या पाच वर्षांच्या कामाच्या कौशल्यावर खुष होऊन प्रेसचे मालकांनी त्याला सिनीयर ऑपरेटरची पोस्ट दिली होती.

  • आम्ही लग्न मोडतोय

    आलेल्या पाहुण्यांवर मोठी काकू कडाडली,आता बोलणी बस झाली, उठा आणि निघा, आम्ही लग्न मोडतोय.

  • कुणात जीव रंगला

    एक खेडूत आईची भाबड प्रेमाची गोष्ट.

  • महानगराचे पिकलेपण (कथा)

    कुणीतरी विचारलं, कहां जाना है? वाचता येत असतं तर तुला कशाला विचारलं असतं? असा म्हातारीचा रोखठोक प्रश्न ऐकून प्रश्नकर्ता मागच्या मागे सटकलेला होता

  • कला कशाशी खातात?

    मळकट- कळकट लाकडाच्या एखाद्या तुटलेल्या भागासारखी दिसणारी ती कलिंगडाची फोड एक कलाकृती आहे, हे आम्हाला कस कळणार, हा पवित्रा तिथल्या कर्मचा-यांनी घेतला. त्या कलाकाराला काय बोलाव समजेना.

  • बिनचेहऱ्याची माणसं

    कंडक्टर पाठीमागून एकेकाची तिकीटं काढत माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. टीव्हीचा बाॅक्स मी पायाशी ठेवला होता. मी त्याला नागठाणेचे तिकीट मागितले. त्याने सत्तर रुपये घेऊन तिकीट दिले व विचारले, ‘हा बाॅक्स कुणाचा आहे?’ मी, माझा आहे सांगितल्यावर त्याने त्याचे लगेजचे पस्तीस‌ रुपये मागितले.

  • लावणीची ‘लाट’

    सांगते ऐका’ चित्रपटातील ‘ बुगडी माझी, सांडली गंऽऽ’ ही लावणी गाजल्यानंतर तमाशाप्रधान चित्रपटांची निर्मिती वाढू लागली. हंसा वाडकर, जयश्री गडकर, लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक, जयश्री टी, सुषमा शिरोमणी, रंजना अशा अनेक अभिनेत्रींच्या चित्रपटातील लावण्यांनी रसिकांना वेड लावले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातून संध्या या अभिनेत्रीने सादर केलेल्या लावण्यांना अफाट लोकप्रियता मिळाली.