(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • इम्युनिटी अनलिमिटेड

    ” हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव .

  • जैसे ज्याचे कर्म तैसे

    गब्बरच्या नकळत शेवटी दुसरी गोळी मात्र कालियाला लागलीच.. बाटली पुढे आणणारा पांडुरंग समोरच बसलाय हे त्या रखमाबाईना कसं सांगणार? सहन होत नाही आणि सांगताही येत नाही..

  • पाहारेदार

    सातपुड्याच्या पायथ्याशी येळकोटवाडी नावाचं गाव व्हतं. साधारण दीड दोन हजार वस्तीचं गाव.. गाव तसं लहानच… गावाला खंडूबा प्रसन्न व्हता… गावात शिरताच म्होहर च खंडूबाचं देवुळ व्हतं …या खंडूबाच्या देवळाच्या रावळात एक माणूस बशेल असायचा… दिसा तो नसायचा पण रातीला तो तिथंच गवसायचा… त्याचं नाव पांडबा…

  • केशवा

    मी म्हणाले. तसा घाबरत घुबरत सुकेश माझ्याजवळ आला.माझ्या पुढच्या खुर्चीवर पाय उकड ठेऊन बसला.तो फार घाबरलेला दिसत होता.त्याच्या मनात काहीतरी गुंतागुंत चालली होती.त्याचा चेहरा घाबरून पांढराफटक पडलेला दिसत होता.मला त्याचं हे बावळट रूप पाहुण कसतरीच वाटलं.सुकेश माझ्या बाजुलाच रहायचा.विस पंचवीशीचा तरून असावा मात्र जख्ख म्हातारा दिसायचा.शरीरयष्टीने तो एकदम हडकुळा दिसत होता.शरीरात मांस असाव की नाही ईतपत संशय घेण्याजोगे त्याचे शरीर होते.अंगाची चामडी हडांवर घट्ट चिकटलेली वाटायची.तोंडाचं बोळकं झालेलं तर डोळ्याच्या खोबनितुन त्याचे पिवळट पांढरट डोळे लुकलुकत रहायचे.डोळ्यांच्या वर नाममात्र भुवया होत्या.तर असो.

  • ना. नी. गबाळे

    अशातच ना.नी गबाळे मास्तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागला.ना.नी. गबाळे म्हणजे नारायण निवृत्ती गबाळे…! पण सगळेजण तेह्यलं नानी नावानचं वळखायचे.

  • भ्रष्टाचार / काचेचे घर

    आपल्याला भ्रष्टाचाराचा साधा आणि सरळ अर्थ कळला पहिजे. “मोबदला दिल्या बिना कुठला ही फायदा घेणे म्हणजे भ्रष्टाचार”

  • कोलंबस (काल्पनिक कथा)

    गेल्याच आठवड्यात माझा एकसष्ठीचा समारंभ पार पडला. नातेवाईक आणि बरीच मित्रमंडळीं त्या निमित्ताने एकत्र आलेली होती. निमंत्रणामध्ये भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, असं लिहूनही अनेकांनी बुके व प्रेझेंट्स आणलेली होती. प्रत्येकाला मी व्यक्तीशः भेटत होतोच, तरीदेखील काहीजण न भेटताही येऊन गेल्याची शक्यता होती.. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली..

  • रात्र अजून भिजत होती !

    …… तशा हि परिस्थितीत शशांकचे लक्ष गादीजवळच्या लाईटच्या पोलवरील ‘पोल क्रमांक १७’ने खेचून घेतले. जणू ‘आहे ना लक्षात हा क्रमांक?’ हाच प्रश्न तो हि शशांकला विचारत होता! जन्मजात एक पाय विकसित न झालेलं, दोन्ही डोळ्याच्या पापण्या नसलेलं कुरूप मुलं शशांक(आणि शिखातरी) कस सांभाळणार होता? म्हणून त्याने शिखास ‘मृत मुलं’ जन्मले म्हणून सांगितले होते.

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग २

    तिची गाडी गचके खात, थोडी वेडीवाकडी होत थांबली. त्या थंडीतसुद्धा निशाला चांगलाच घाम फुटला. ‘आधीच उल्हास नी त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झाली. तिनं गाडी थोडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मोबाईलच्या उजेडात ती गाडीला काय झालं ते पाहू लागली.

  • तुपाचा दिवा !

    विक्रम आणि वेताळच्या धर्तीवरची ही एक लघुकथा..