नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
लहानपणी आई मुलाला खाऊ म्हणून एखादा पदार्थ तोंडात भरवते, इथूनच त्याचा तो पदार्थ आवडीचा होतो. बालवाडीत जाऊ लागल्यावर दप्तरात खाऊचा डबा दिला जातो.
साली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि !

मला थोडेफार संत माहिती होते परंतु डॉ. मामा मोडक यांनी मला संतांचे 100 आयकार्ड साईज फोटो व त्यांची नावे माझ्या घरी आणून दिली होती. 92 वर्षांच्या डॉ. मामा मोडक यांचा हा उत्साह मला संतचित्रे काढण्याची प्रेरणा देवून गेला. तेंव्हा पासून किमान १०० संतांची तैलचित्रे काढण्याचा मी संकल्प केला

“एक वेळ पोलीस होऊन पहा, मग त्याची काय अवस्था असते, त्याचा अनुभव येईल. ” मी जीव तोडून सांगत होतो, पण समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
त्याचा एकच हेका होता, “साहेब तुम्ही मला मुर्ख समजता का? बावळट समजता? आम्ही तुमच्याकडे तक्रार घेउन येतो आणि तुम्ही आम्हालाच ज्ञान शिकवता?
घरी आल्यावर बायकोने कपाळावर हात मारला! “अहो, या दोन किलो जिलब्या मी काय माझ्या डोक्यावर थापून घेऊ का? जा, जा, परत करा त्या मी दोनशे ग्रॅम सांगितल्या तर दोन किलो घेऊन आलात? खाणारे आपण तिघं त्यात मला डायबेटीस. तुम्ही एखादा तुकडा खाणार, मग याचं काय करायचं?’
१९६४ पासून ते आजपर्यंत दिडशेहून अधिक नाटकांमध्ये व दोनशेहून अधिक चित्रपटांतून व हेमामालिनी निर्मित ‘तेरा पन्ने’ व मराठी मालिका ‘महाश्वेता’ मध्ये त्यांनी काम केले आहे.
त्या दिवशी राधा सैरावैरा झाली होती . कोठे भटकतोय कोणास ठावूक ? असाच भटकत असतो डोंगर दऱ्यात ! काय तर म्हणे ट्रेकिंग ! पण इतके दिवस नाही रहात माझ्या पासून दूर !

आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली… आमच्या घरी जातवालीच हवी ना..

राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.
“जवा बघाव तवा जुन्याच गप्पा , जुनेच सिनिमा , जुनीच गाणे , जुन्याच आठवणी ! तुम्ही नुसती भूत झालात ,भूत ! आजच्या काळात का नाही जगत ? अस काय आहे त्या तुमच्या काळात जे आज आमच्या काळात नाही ?” असा खडा सवाल ,एका सो called ‘तरुणा’ने (जो जेष्ठ नागरिक वाटत असलातरी पन्नाशीच्या आसपास लोंबकळतोय ) ,’ अस काय आहे त्या मोहिनीत जे माझ्यात नाही !’ या उषा चव्हाणने दादा कोंडकेना विचारलेल्या प्रश्ना प्रमाणे त्याने मला प्रश्न विचारला .
Copyright © 2025 | Marathisrushti