नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आज, साठी ओलांडलेल्या पिढीने खूप काही गमावलंय.. आणि जे मिळालंय.. ते तडजोड करुन स्वीकारलंय… काळ बदलला, मात्र मन पुन्हा पुन्हा त्या रम्य भूतकाळातच जातं.

रवींद्र च्या मनात विचार आला की या सूर्याने कित्येक युगांतरे पाहिली असतील तरी याचा स्थितप्रज्ञ पणा अजूनही तसाच आहे. पण आज माझ्या आयुष्यात युगांतर होतंय आणि तरीही मी असा भेदरलेला, दबलेला का आहे, नाही मलाही या सुर्यासारखं स्थितप्रज्ञ, अभेद्य व्हायलाच हवं, व्हायलाच हवं.
दक्षिणेकडील सिनेजगतात चित्रपटातील कलाकारांइतकच तंत्रज्ञांना देखील आपलेपणानं वागवलं जातं.

कथेतील बँक कर्मचारी त्या डीपॉझीटरला हंसतात, म्हणजेच तुच्छ मानतात. आजही खूप मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांना कर्ज घ्यायला येणाऱ्या (नंतर कदाचित बुडवणाऱ्या) उद्योगपतीचं जेवढं महत्त्व वाटतं तितकं सामान्य खातेदाराचं वाटत नाही. ह्या कथेत तो सगळी रक्कम परत काढतो आणि त्याला त्याचे सर्वच्या सर्व म्हणजे छप्पन्न डॉलर्स परत मिळतात. आज जर एखाद्याने ‘छप्पन्न’ डॉलरचे खाते बँकेत उघडून त्याच दिवशी बंद केले तर बहुदा क्लोजरनंतर त्याच्या हातांत सहाच डॉलर परत येतील आणि पन्नास डॉलर्स तीन महिने सरासरी बॅलन्स कमी पडल्याचा चार्ज, कॅश ट्रॅन्झक्शनचा चार्ज, कंपल्सरी डेबिट कार्डाचा चार्ज, अकाऊंट क्लोजर चार्जेस, जीएसटी, वगैरेसाठी कापून घेतले जातील. एकंदरीत बँक ग्राहक लेखकाने दाखवल्याप्रमाणे आजही बँकेचा मिंधाच रहाणार आहे.
कर्ता करविता परमेश्वर आहे !’ या तत्वावर दृढ विश्वास असणारा मी माणूस आहे. माझ्या मनात जी भावना उत्त्पन्न होते ‘ती ‘हि तोच करतो.मग त्याच्या कृतीची संकल्पना आणि अंमलबजावणी योजना माझ्या मेंदूत तयार होते.अशा प्रकारे ती माझ्या कृतीत उतरते. सर्वांच्या बाबतीत अशीच प्रक्रिया असावी. फक्त त्याचे श्रेय मी देवाला देतो ,आणि इतरजण ‘मी केले!’ किवा ‘मी करून दाखवले का नाही ?’म्हणून आपलाच ढोल बडवून घेतात!
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी कर्नाटक एसटीनं पुण्याहून सातारला चाललो होतो. समोरच्या सीटवर एक मध्यमवयीन स्त्री बसलेली होती.

मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो. तो दिवस मला आठवतो. 30 जून ही तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस-‘मंथ एण्ड’ म्हणून शाळेला अर्धा दिवस सुट्टी मिळाली होती. म्हणजे शाळेचं काम चालूंच होतं पण मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली होती. कोंडवाड्यातून सुटल्याप्रमाणे मी धावत घरी आलो.

अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो.

मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो.

राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti