पाश्चात्य विकृतीचे अंधानुकरण करता,करता आम्ही आमचे स्वत्व विसरलो आहोत. आमचे आचार, विचार, संस्कार या सर्व बाबी इतिहास जमा होत चालल्या आहेत.
December 30, 2011
बाळाच्या आगमनाप्रित्यर्थ लिहीलेली ही कविता सर्वांना नाव टेवण्याच्या दिवशी उपयोगी पडेल
April 19, 2011
सुजाण नागरिक ,उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय मतदारानो २०१४ च्या निवडणुकांत ९०% मतदान होईल ते फक्त तुमच्या जागरूकते मुळे घडेल. सर्व राजनीतिक पार्ट्यामध्ये अप प्रवृतीचे ,गुंड, मतलबी, आणि स्वहित …
May 24, 2012
March 10, 2011
October 30, 2018
बातमी : विठ्ठल-रखुमाईचें दर्शन आतां २४ तास
संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. ७ जुलै २०१६
• हिंदू देव-देवतांची एक गंमत आहे. माणसांप्रमाणेंच मंदिरातली मूर्ती दुपारीं वामकुक्षी करते, आणि रात्रीं शयन करते. (भक्तांनी दर्शनासाठी वाट पाहिती तरी चालेल !) मग, पहाटे काकड-आरती करून देवाला ज़ागवतात! काय गंमत आहे पहा : दैवत्वाचे गुण माणसाला लागण्याऐवजी, माणसाचे गुणच मंदिरातील देवाला लागले ! !
• देव, भक्त, मंदिर आणि पुजारी या व्यवस्थेवर विदारक टीका करणारी कविता कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे ; शीर्षक आहे ‘गाभारा’ . गाभार्यातील देव भक्ताला भेटण्यासाठी मंदिराबाहेर पडतो ; व म्हणून पुजारी ठरवतात की आतां तो परत आला तरी त्याला आंत घ्यायचें नाहीं, जयपूरहून नवी मूर्ती ऑर्डर करायची ; अखेर, ‘गाभारा सलामत तर मूर्ती पचास’ ! . जिज्ञासूंनी ती कविता मुळातूनच वाचावी.
( कुसुमाग्रजांशी स्वत:ची तुलना मला कदापि अभिप्रेत नाहीं. केवळ या विषयावरील एक अन्य ‘टिप्पणी’ म्हणून, मी माझ्या, ‘देव आतां पावणार नाहीं’ या गझलमधील एक शेर देत आहे -
व्यर्थ आक्रंदूं नका, हा बंद दरवाजा पहा
झोपलाहे देव अजुनी , जागणार नाहीं ! )
• या सगळ्या पार्श्वभूमीवर , ही ताजी बातमी नक्कीच welcome news आहे की, आतां पांडुरंगाचें मंदिर दर आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळी,कांहीं दिवस कां होईना, पण, २४ तास उघडें राहील. पंढरपुरला दूरवरून वारी करून येणार्या भक्तांच्या सोयीसाठी असा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल, प्रांताधिकारी, विठ्ठल-मंदिर समिती आणि बडवे यांचे अभिनंदन करावें तेवढें थोडेंच. कारण, मुख्यत्वें , मंदिर उघडें ठेवण्याची बाब, ही धार्मिक नसून, ती सामाजिक प्रश्नाशी निगडित आहे, ‘ह्यूमेऽन अप्रोच’शी संबंधित आहे.
• हरिजनांना ( दलितांना ) मदिर-प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी पंढरपुरला केलें आमरण उपोषण ही घटना साधारणपणें २०व्या शतकाच्या मध्यावरली. म्हणजे, त्यानंतर फार काळ लोटलेला नाहीं. त्या बॅकग्राउंडवर, आतां मंदिर २४ तास खुलें ठेवण्याचा निर्णय , हा अधिकच उठून दिसतो.
• विठ्ठल हें एक लोकदैवत आहे. ( त्यासंबंधीचें रा. चि. ढेरे यांचें संशोधन पहावें). ज्ञानदेव-नामदेव आणि जातीजातींमधील इतर संतांनी, कृतीतून, विठ्ठलाचें लोकदैवतपण दाखवून दिलें. शतकानुशतकें चालत आलेली वारीही हेंच दाखवते.
• अशा या लोकदैवताला ‘बंधनांत’ न ठेवता, भक्तांना मोकळेपणानें तिन्हीत्रिकाळ त्याला भेटायची संधी प्राप्त झाली, ही फारच आनंदाची बातमी आहे. अभिनंदन, अभिनंदन .
-----
टीप :
सध्या मी ‘पंढरीचा राणा’ याअंतर्गत कांहीं काव्य वेबवर पोस्ट करतो आहे. योगायोग असा की, ‘उघडें मंदिर आहे’ हे काव्य मी अगदी पोस्ट करणारच होतो, तेवढ्यात वरील बातमी वाचली. तें काव्य आतां पोस्ट केलें आहे. या काव्यामागील अध्याहृत पार्श्वभूमी म्हणजे, साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी उघडें व्हावें म्हणून, वर उल्लेखलेलें, उपोषण. (काव्यात तसा उल्लेख नाहीं). पण, हें काव्य, ‘२४ तास मंदिर उघडें राहण्याला’ही लागूं होतें, हा एक मजेदार योगायोग .
आतां, प्रस्तुत बातमीनंतर मी लिहिलेलें, ‘विठ्ठलमंदिर राहिल उघडें’ हें काव्यही मी वेबसाईटवर पोस्ट केलें आहे.
वर उल्लेख केलेली ‘देच आतां पावणार नाहीं’ ही गझलही वेबवर पोस्ट होईलच.
हें सारें आपण माझ्या वेबसाईटवर, तसेंच मराठी सृष्टीच्या वेबसाईटवरही वाचूं शकाल.
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 12, 2016
काल दि.15 मे. रोजी धक धक गर्ल माधुरी दिक्षीत (नेने)हीचा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहानं पार पडला. खरचं तिचं 51 व्या वर्षात पदार्पण, रात्री झोप लागेपर्यंत विचार करीत होतो , उत्तर सापडलेच नाही. .
परवा एका whatsup group वर असाच एक message आला. ‘एका नवर्याचे मनोगत- लग्नाआधी नाजूक, सुंदर असलेली बाहुली लग्नानंतर बाहुबली केव्हा होते कळतच नाही’. आणि त्यापाठोपाठ अनेकांना फुटलेलं हसू आणि वाटलेली गम्मत.
विचार केला आणि लक्षात आलं, खरंय अगदी... लग्नात अगदी शेलाटी बांध्याची, नाजुकशी वाटणारी गोड नवरी किती लवकर रूप पालटते. लवकर म्हणजे अगदी ५-१० वर्षातच संपूर्ण कायापालट होतो तिचा. काही जणी वजनाने दुप्पट होतात, तर काही अचानक मोठ्या, वयस्क वाटायला लागतात. ‘एकदा लग्न झालं की दोन वर्षात अश्याच होतात (म्हणजे बाहुबली होतात) सगळ्या मुली’ हे वाक्य तर अगदी ऐकिवातलंचं. नवर्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण सोपं जातं तिला पण मग बाहुली राहणं का जमत नसेल? खरं तर कोणत्याच मुलीला बाहुबली होण्याची हौस नसते. पण लग्नंतर तिच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या, बाळंतपण,आईपण, कामाचा भार आणि अनेक इतर छोट्या मोठ्या गोष्टीत तिचा आवश्यक असणारा सहभाग यातून स्वतःसाठी वेळ काढणं जमतच नाही तिला, मग ती नोकरी करणारी असो किंवा नसो. तिलाही वाटतं, पूर्वीसारखंच चार चौघीत आपण उठून दिसावं. दुकानात लावलेल्या mannequin वरचा ड्रेस आपल्यालाही तसाच शोभून दिसावा. साडी छान दिसण्यासाठी नेसावी, skirt, jeans काहीही मोकळेपणाने घालता यावं आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे नवर्याने आपलं कौतुक करावं.
स्नेहा नावाची माझी एक मैत्रीण आहे. ती तिच्या नवर्याच्या तब्ब्येतीची, खाण्यापिण्याची (डाएट ची) अगदी व्यवस्थित काळजी घेते. नवरा सकाळी उठून मोर्निंग वॉकला जातो तेव्हा ही कमी तेलातली भाजी, पोळी कोशिंबीर, salad असा सगळा डबा तयार करते. दुपारी/मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणून एखादं फळ, सुका मेवा,ताक असं देखील न चुकता पॅक केलेलं असत आणि दररोज असा नेटका डबा घेऊन नवरा कामाला जातो. मुलांच्याही बाबतीत तेच. नेटका आणि संपूर्ण डबा. संध्याकाळी त्यांना ground ला नेणं, dance क्लास किंवा अजून काही असेल तर तिथे नियमाने नेणं-आणणं हे सगळंच ती करते. रात्रीच उरलेलं अन्न ती नवर्याच्या, मुलाबाळांच्या तोंडी लागू देत नाही पण ते टाकवतही नाही म्हणून तिच्या स्वतःच्या वाट्याला breakfastच्या रुपात येतं. अगदी रोज नाही तरी जेव्हा अन्न उरतं तेव्हा नक्कीच. ‘आज सकाळी वॉकला जाणं जमत नाहीये, तर संध्याकाळी जाईल‘ असं म्हणत अनेक आठवडे निघून जातात पण तिच्या नुकत्याच सोडलेल्या व्यायामाच्या संकल्पाला मुहूर्त लागत नाही. नवर्याचा पूर्ण support आहे तिला.. तो नेहमीच सांगतो तिला, शिळं खात जाऊ नकोस, व्यायाम करत जा, वॉकला जात जा. वजन कमी कर. तिने वेळोवेळी beauty parlor ला जावं असंही त्याला वाटत असतं पण तीच कंटाळा करते असं त्याचं ठाम मत आहे.
अश्या अनेक स्नेहा आपल्या ओळखीच्या असतात आणि त्यांचे support करणारे नवरे सुध्दा. पण ज्या , dedication नी ती नवऱ्याच्या आणि मुलांच्या तब्येतीची काळजी घेते, त्याच dedication ने नवराही तिच्यासाठी efforts घेतो का, तिची काळजी घेतो का हे विचारात घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुलींना स्वतःकडे लक्ष देणं जमत नाही ह्याचं खरं कारण म्हणजे नवर्याकडून मिळणारा support हा शाब्दिक असतो. म्हणजे त्यांना खरोखर बायकोने maintained राहावं असं वाटत असलं तरी त्यासाठी घरातल्या छोट्या मोठ्या कृतीत/कामात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची त्यांची तयारी नसते. वीकेंडला ‘आज काहीतरी वेगळ कर breakfast आणि जेवणात’, ‘वीकेंड breakfast वैशालीला आहे माझा मित्रांसोबत’, असं सांगण्याऐवजी ‘मी करत जाईन वीकेंडला breakfast, तू वॉकला जात जा’ असं सांगणारा नवरा म्हणजे खरा supportive. बायको रोज ऑफिसमधून घरी आल्यावर (कितीही थकलेली असली तरीही )काहीही कुरकुर न करता स्वयंपाक करते हे फ़क़्त appreciate करून remote घेऊन TV समोर न बसता तिला थोडी मदत करणारा, अगदी स्वयंपाकात मदत नाही करता आली तरी, आपलं जेवण आपण वाढून घेणारा, मुलांची जेवणं आटोपणारा आणि अभ्यास घेणारा, दुसर्या दिवसाची दोघांच्या ऑफिसच्या आणि मुलांच्या शाळेच्या डब्याची तयारी करणारा नवरा म्हणजे खरा supportive.
बायको जॉब करणारी नसेल तर हिच गोष्ट आणखीनच कठीण होऊन बसते कारण, ‘दिवसभर बायकोला काही काम नसतं, त्यामुळे तिला वेळही मिळतो, आरामही होतो आणि स्वतःची अशी SPACE सुद्धा मिळते’ असं समजणारा एक मोठा वर्ग आहे. पण खरोखर तसं असतं का हे प्रत्यक्ष ते आयुष्य जगल्याशिवाय लक्षात येत नाही. अगदी सहज, सोपी वाटणारी आणि अनेकदा लक्षातही न येणारी अनेक कामं त्या वेळात तिला करायची असतात, त्यातही मुलांना वेळ देण्याचं सर्वात मोठं आणि महत्वाच काम ती करत असते. कधी मैत्रिणींना भेटायचं असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तरी, नवऱ्याचं आणि मुलांचं जेवण तयार केल्याशिवाय तिला बाहेर पडता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. याउलट मित्रांना भेटायचं ठरलं की बायकोला ‘आज मी जेवायला नाहीये घरी’ एवढं सांगून नवरा मोकळा होतो. शिवाय वेळेचंबंधन नसतंच.
वीकेंडला जसा तुम्हाला बदल हवा असतो तसाच तुमच्या बायकोलाही, ती जॉब करणारी नसली तरीही. आणि हे समजून घेऊन तिला स्वतःसाठी वेळ देता यावा म्हणून आपल्या कामात, वेळेत ADJUSTMENT करणारा नवरा म्हणजे खरा SUPPORTIVE. असा नवरा असेल तर खरोखर लग्नाआधी बाहुली असणारी बायको ही लग्नानंतरही बाहुलीच राहू शकते यात शंकाच नाही. म्हणून पुरुषांनी खरोखरच विचार करायला हवा... लग्नानंतर आपल्या घरी आलेल्या बाहुलीला बाहुबली बनवण्यात आपला तर हातभार नाही ना?
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
July 26, 2017
अर्ध्या तासात तिन्ही पित्ज्झे डिलिवर करून तो पुन्हा पित्ज्झा शॉपवर येऊन पोहचला. डोक्यावरचे हेल्मेट काढून बाईकच्या आरश्यात स्वत:चा चेहरा बघितला. चेहर्यावर अनेक सुरकुत्या पसरलेल्या दिसल्या. पुन्हा विचारचक्र सुरु झाले, हेच काम आणिक काही वर्ष केले, तर आपण लवकर म्हातारे दिसणार. जो पर्यंत दुसरी नौकरी मिळत नाही, हे काम करावेच लागेल. पोटाचा गड्डा भरायला. त्याला वाटले पित्ज्झा डिलिवर करता करता तो हि एक पित्ज्झा झाला आहे…… जंगली श्वापदे त्याचे लचके तोडतात आहे…..
June 11, 2018
हळू हळू महंमद बसलेले बास्केट एकदाचे खाली जायला सुरवात झाली. बास्केट खाली जात असताना दोलका प्रमाणे हलत असल्याने जहाजाच्या बाजूवर येऊन आदळते की काय असे वाटत होते पण केवळ अर्ध्या फुटांवरून ते दुसऱ्या बाजूला जात असल्याने अधांतरी लटकलेला महंमद सुमारे साडे तीन तासांनी खाली बोटीत कसाबसा एकदाचा उतरला. मेडिकल साइन ऑफ होऊन घरी जाण्याकरिता जहाजावरुन उतरल्यावर सगळ्यांना हात करून निरोप घेऊन तो बोट मध्ये बाहेर एका बाकड्यावर बसला.
July 22, 2021
समाजाभिमुख कला म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी माझं विचारचक्र चालू झालं आणि त्यातून मला जे काही समजलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
December 17, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti