(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • ताडोबा व्याघ्र अभयारण्य, चंद्रपूर

    ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ५०८.८५ चौ. कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात जिल्हा चंद्रपूर येथे ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे.

    मुळच्या आदिवासी लोकांचा देव तारु आणि अंधारी नदी यामुळे या अभयारण्याला वरील नाव पडले. बांबू ( गवत ), साग, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ, अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असे हे जंगल आहे. १९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले गेले. ताडोबा हे ‘Land of the Tiger’ म्हणून ओळखले जाते.

    ताडोबा अभयारण्यातील मोठ्या प्रमाणात वन्यजीव विविधता आढळते. या अभयारण्यात ४५ प्रकारचे सस्तन प्राणी ( Mammals ); २८० प्रकारचे पक्षी (Birds) ; ९४ प्रकारची फुलपाखरे (Butterflyes) ; २६ प्रकारचे कोळी (Spider) आणि ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptites) आढळतात.

  • अझरबैजान

    अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.

  • मो.ग. रांगणेकरांचे जन्मस्थळ – ठाणे

    ज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

  • बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

    कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश मंदिर असे म्हणतात. खांबाशिवाय उभारलेल्या या गणेश मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपावरून त्याला हे नांव पडले आहे.

  • ओंगोल

    ओंगोल हे शहर आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथे जिल्हा मुख्यालय आहे. आंध्र प्रदेशातील, एक महत्त्वाचे नेते ‘आंध्रकेसरी’ तंगुतुरी प्रकाशम पांथलू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पूर्वीच्या ओंगोल जिल्ह्याचे नाव ‘प्रकाराम’ असे ठेवण्यात आले असले तरी ओंगोल शहराचे नाव बदललेले नाही.

  • झांबिया

    झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला अँगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कित्वे व न्दोला ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत.

  • हैती

    हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे,त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो.

  • मेक्सिको

    मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.

    प्राचीन नगरी ‘देवदिवाकान ‘ हिचे दोन हजार वर्षांपूर्वीच्या या महानगरीतील अवशेष आजही पहायला मिळतात.येथील चंद्रमंदिरात ललोक आणि केल्सल कोल्ला या देवतांची मंदिरे आहेत. केल्सल हा पवित्र पक्षी आणि कोल म्हणजे सर्प.पृथ्वी आणि आकाश यांच्या एकत्वाचे प्रतीक असलेली ही देवता. पुरोहितांचे प्रासाद तसेच नगरवासीयांची घरे याच परिसरात होती.उत्सवप्रसंगी लोक येथे एकत्र जमत असत.

  • रत्नागिरी जिल्हा

    निर्मळ, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे व हापूस आंबे, काजू, नारळी, पोफळीच्या बागा यांनी संपन्न असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी. या जिल्हयाला निसर्गाने जणू काही अप्रतिम सौंदर्यच बहाल केले आहे. म्हणून हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा आहे.