महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक (मॅसिडोनियन: Република Македонија) हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत. स्कोप्ये ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.
स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
पुडुकोट्टई हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. वेलार नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून, तिरुचिरापल्लीपासून ५५ किलोमीटरवर आहे.
तुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे.
गयानाचे सहकारी प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनार्यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे.
लाओस (अधिकृत नाव: लाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक) हा आग्नेय आशियातील देश आहे. या देशाच्या वायव्येस म्यानमार व चीन, पूर्वेस व्हियेतनाम, दक्षिणेस कंबोडिया, पश्चिमेस थायलंड हे देश आहेत. व्हियांतियान ही लाओसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत.
ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची सत्ता आहे.
फिलिपाईन्स (अधिकृत नाव: फिलिपिन्साचे प्रजासत्ताक ; अन्य लेखनभेद: फिलिपिन्स, फिलिपाइन्स ; फिलिपिनो: Pilipinas ; स्पॅनिश: Filipinas ; इंग्लिश: Philippines 😉 हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti