महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र असून अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढल्यामुळे येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. २००४ साली नागपुरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडेल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ऍट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे,हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे.
सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट, आणि सर्जेकोट हे होय. सिंधुदुर्ग आणि पद्मगड समोरासमोर आहेत. किनार्यावरुन सिंधुदुर्गाकडे पाहील्यास डावीकडे पद्मगड तर उजव्या किनार्याच्या भूशीरावर राजकोट आहे. सर्जेकोट ४ कि.मी. अंतरावर आहे.
खानदेश म्हणून ओळखल्या जाणार्या आत्ताच्या जळगाव जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या.
घरबांधणीशी संबंधित एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण कुंटुंबांपैकी सुमारे ३६ टक्के लोक मातीने तयार केलेल्या घरामध्ये राहतात. ग्रामीण भागात मातीच्या घरांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय विविध प्रदेशात तेथे तेथे उपलब्ध असलेल्या बांधकाम साहित्याचा वापर केला जातो.
उस्मानाबादेचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचे कायम वसतिस्थान असलेले तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.
देहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत.
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
थोडुपुझा हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. त्रिवेंद्रमपासून२०० किलोमीटरवर असलेले हे शहर ३५.४३ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलरलर आहे.
अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – मराठी विश्वकोशाचे संस्थापक. त्यांची मुख्य ओळख कोशकार, साहित्यिक आणि प्राच्यविद्या पंडित अशी करून देता येईल. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे ते वीस वर्षे अध्यक्ष होते.
Copyright © 2025 | Marathisrushti