महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत.
केरळ राज्यातील कोचीन शहराची अरबी समुद्राची राणी म्हणूनच ओळख आहे.
पलाउ हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३,२०० किमी अंतरावर आहे. १९९४ साली संयुक्त राष्ट्रसंघापासुन स्वातंत्र्य मिळालेला पलाउ हा जगातील सर्वात नवीन स्वतंत्र देशांपैकी एक आहे.
जॉर्डन, अधिकृत नाव जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक (किंवा जॉर्डनचे हाशेमाईट राज्य)(अरबी: المملكة الأردنية الهاشمية , अल् मामलका अल् उर्दुन्निया अल् हाशिमिया 😉 हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला असून याच्या आग्नेयेस सौदी अरेबिया, पूर्वेस इराक, उत्तरेस सीरिया व पश्चिमेस मृत समुद्रावर सह-अधिकार असलेले इस्राएल व वेस्ट बँक हे देश आहेत. अम्मान ही जॉर्डनाची राजधानी आहे.
राज्यातील २५ शहरांत शहरांतर्गत वाहतूक सेवा आहे. यासाठी म.रा.प.म. दररोज सरासरी ५२० बसगाड्यांचा वापर करते.
कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही.
आयर्लडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे.
गॅबनचे प्रजासत्ताक हा पश्चिम मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. गॅबनच्या पूर्व व दक्षिणेला काँगोचे प्रजासत्ताक, ईशान्येला इक्वेटोरियल गिनी व उत्तरेला कामेरून हे देश, तर पश्चिमेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. लिब्रेव्हिल ही गॅबनची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
गुंटूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून, हैदराबादपासून २६६ कि.मी.वर वसलेले आहे. गुंटूर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, येथील अमरावती, उडवल्ली गुहा, कोंडावीड किल्ला आदी स्थळे प्रेक्षणीय आहेत.
या जिल्ह्यातील प्रमुख पिके संत्री व कापूस ही नगदी पिके आहेत. खरीप हंगामात मुख्यतः तांदूळ, ज्वारी, भूईमुग, कापूस, मूग, तूर, सोयाबीन ,तर रब्बी हंगामात ज्वारी व ऊस, डाळी, ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गव्हाच्या क्षेत्रात नागपूर जिल्हा पहिल्या ५ जिल्ह्यांमधे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti