(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे

  • मो.ग. रांगणेकरांचे जन्मस्थळ – ठाणे

    ज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

  • जालना जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    जालना हा कृषिप्रधान जिल्हा असून, दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. करडई उत्पादनाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्त्वपूर्ण ठरतो.

  • एस्टोनिया

    एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.

  • विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

    मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत.

  • लात्व्हिया

    लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातील व बाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लात्व्हिया ला युरोपियन संघामधील सर्वात कमी लोकसंख्येच्या व सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. भूगोल, लोकजीवन, संस्कृती इत्यादींबाबतीत लात्व्हिया एस्टोनिया व लिथुएनिया ह्या इतर बाल्टिक देशांसोबत मिळताजुळता आहे.

  • नंद्याल

    नंघाल हे आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील एक मोठे शहर आणि एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या शहराचे पूर्वीचे नाव नंदलुरु असे होते. भगवान शिवाचे वाहन नंदी याच्या नावावरून हे नाव पडलेले आहे.

  • पैनावू

    पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.

  • डॉमिनिका

    डॉमिनिका हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. हा देश कॅरिबियन समुद्रामध्ये ग्वादेलोपच्या दक्षिणेस व मार्टिनिकच्या उत्तरेस ७५० चौरस किमी क्षेत्रफळाच्या बेटावर वसला असून २००१ साली येथील लोकसंख्या केवळ ७१,२९३ इतकी होती. रुसाउ ही डॉमिनिकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • नांदेड जिल्हा

    नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते.