महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
चाल्कुडी हे नाव यागशाला आणि कुडी या दोन शब्दांपासून तयार झालेले आहे. यागशालाकुडी याचा अर्थ तपासाठी ऋषी जेथे त्याग करतात ती भूमी असा होतो. यागशालाकुडीचा अपभ्रंश होत शाल्कुडी व नंतर सध्याचे चाल्कुडी हे नाव पडले.
नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे.
श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज – भगवान श्री. गुरुदेव दत्तात्रयांचा दुसरा अवतार मनाला जाणार्या श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म कारंजा येथे झाला. त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र पदभ्रमण केले.
खम्मम हे आंध्र प्रदेशमधील तेलंगण प्रांतातील एक महत्त्वाचे शहर आहे. खम्मम जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते हैदराबादपासून पूर्वेला १९३ कि.मी.वर वसलेले आहे.
राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य कार्यालय या शहरात असून तेरा तालुक्यांशी ते राज्य महामार्गाने जोडले गेले आहे. बुलडाणा शहरापासून पुढे मेहकर सोणती येथे दैत्यसूदनाचे हेमाडपंथी मंदिर पहावयास मिळते.
नेदरलँडमधील लिस्से येथे असणारी केवूकनॉफ ही जगातील सर्वांत मोठी फुलांची बाग आहे. या बागेत सुमारे सत्तर लाख फुले आहेत. १९४९ मध्ये ही बाग फुलविण्यास प्रारंभ झाला.
कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते.
शिवकाशी हे तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर राज्यातले एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील फटाके बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आाहे. देशातील एकूण गरजेच्या ७० टक्के फटाके या शहरात तयार होतात.
गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. औरंगाबादमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योजनापूर्वक रीतीने १९३२ मध्ये सुरू झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti