महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जिल्ह्यात थळ घाट, नाणे घाट व माळशेज घाट हे नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे घाट आहेत. भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली. जिल्ह्यातून जाणारे तीन प्रमुख लोहमार्ग मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता व मुंबई-दिल्ली हे आहेत.
व्हानुआतू हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. व्हानुआतू ऑस्ट्रेलियाच्या १,७५० किमी पूर्वेस दक्षिण प्रशांत महासागरामधील अनेक लहान बेटांवर वसला आहे.
संत गुलाबराव महाराज – प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी जुलै, १८८१ मध्ये झाला. रचली. वेदांत, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धांत – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत.
मोटाला हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले छोटे शहर आहे. मलकापूर, नांदुरा विभागाची मोटाला ही एक उपशाखा आहे. अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.
महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला.
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा ठिकाणी कलिंगडाची लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते.
इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते.
आंध्र प्रदेशातील तिसरे मोठे शहर म्हणून विजयवाडा ओळखले जाते. हे शहर रस्ता, हवाई मार्ग आणि रेल्वे अशा तीन मार्गानी जगाशी जोडलेले आहे.
महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
कोलम हे केरळमधील एक महत्त्वाचे शहर असून, येथे देशातील जुने मोठे बंदर आहे. पूर्वी या शहराला ‘देशिंगनाडू’ असे नाव होते. येथून विदेशांतील विविध शहरांशी व्यापार चालत असे.
Copyright © 2025 | Marathisrushti