महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
मुंबईतल्या लॅंडमार्क वास्तूंपैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’.
नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम म्हणजे …सिंधुदुर्ग जिल्हा! अथांग पसरलेला निळाभोर समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार गर्द वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आजही उभा आहे.
मुंबईच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे भारताच्या औद्योगिक, आर्थिक राजधानीचा मान मुंबईस मिळाला आहे. जगातील ‘फॉर्च्यून ४००’ कंपन्यांपैकी चार भारतीय कंपन्यांची कार्यालये मुंबईमधे आहेत. मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात औषधनिर्माण, बांधकाम, अभियांत्रिकी, धातूउद्योग, रेशीमउद्योग, काचसामान, सिनेमा, प्लॅस्टिक, भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम असे उद्योग आहेत.
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर असून,छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात.येथे राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदिर बांधले आहे.
अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे शहर प्राचीन काळात ‘भिल्लठाणा’ म्हणून ओळखले जाई. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे निवासस्थान वा मुक्कामाचे स्थान होय. काळाच्या ओघात या भिल्लठाणाचा अपभ्रंश होत-होत ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले असे म्हटले जाते.
जिल्ह्यात थळ घाट, नाणे घाट व माळशेज घाट हे नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे घाट आहेत. भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली. जिल्ह्यातून जाणारे तीन प्रमुख लोहमार्ग मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता व मुंबई-दिल्ली हे आहेत.
चीनमधील लिजियांग हे विलक्षण प्राचीन शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti