(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • पुणे जिल्ह्यातील छोटे शहर नीरा

    नीरा हे पुणे जिल्ह्यातील छोटे शहर आहे. नीरा नदीच्या नावावरून या शहराचे नाव नीरा पडले असून, ते पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे.

  • कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात.

  • सर्वतोभद्र गणेश भंडारा

    महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एका स्तंभावर गणेशपट्ट आहे. येथील भट यांच्या घरासमोरील ओसरीमध्ये असलेल्या ९० से. मी स्तंभावर चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. यापैकी सर्वतोभद्र हा एक गणेश आहे. अतिशय पुरातन मूर्तीमुळे या गणेशाला अनोखे महत्त्व आहे.

  • वर्धा जिल्हा

    बापूजींचा ‘सेवाग्राम’, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील ‘परमधाम’ आश्रम व आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम या तीन गोष्टींमुळे वर्धा या जिल्हयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्हा राष्ट्रीय जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे.

  • नागपूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    हजिरा-धुळे-कोलकता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि हैद्राबाद-दिल्ली, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ हे दोन राष्ट्रीय महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. तसेच मुंबई-कोलकत्ता व चेन्नई-दिल्ली हे दोन महत्त्वाचे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात.

  • कोल्हापूर जिल्ह्यातील लोकजीवन

    कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा, लिंगायत, जैन व धनगर लोक मोठ्या संख्येने राहतात. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे सुमारे ७०% व ३०% आहे. यावरून जिल्ह्याचे ग्रामीण स्वरूप लक्षात येते. हा जिल्हा सधन मानला जातो.

  • नांदेड जिल्ह्याचा इतिहास

    नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले.

  • श्रीकाकुलम

    श्रीकाकुलम हे उत्तरपूर्व आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आहे. निझामाच्या राजवटीत या शहराचे नाव गुलशनाबाद असे होते. पुढे ब्रिटिश काळात या शहराचे नाव चिकाकोल असे करण्यात आले.

  • रायगड जिल्ह्याचा इतिहास

    बाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली.

  • सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील यादवकालीन अर्धनारी नटेश्वर

    महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हर्नेश्वर येथील अर्ध नारी नटेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. या शिवाय जगात कुठेही अर्धनारी नटेश्वराची प्रतिमा नाही.