(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • कतार

    प्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुध्दाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.

  • इंडोनेशिया

    इंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..

  • जळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ

    शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.

    जळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे.

    येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर प्रसिध्द आहेत. या शहरात मराठीसोबतच अहिराणी बोलीही बोलली जाते.

  • बर्किना फासो

    बर्किना फासो (फ्रेंच: Burkina Faso) हा पश्चिम आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. बर्किना फासोच्या भोवताली माली, बेनिन, टोगो, नायजर, घाना व आयव्हरी कोस्ट हे सहा देश आहेत. वागाडुगू ही बर्किना फासोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ह्या देशाची लोकसंख्या १.५ कोटी इतकी होती.

  • ओंगोल

    ओंगोल हे शहर आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथे जिल्हा मुख्यालय आहे. आंध्र प्रदेशातील, एक महत्त्वाचे नेते ‘आंध्रकेसरी’ तंगुतुरी प्रकाशम पांथलू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पूर्वीच्या ओंगोल जिल्ह्याचे नाव ‘प्रकाराम’ असे ठेवण्यात आले असले तरी ओंगोल शहराचे नाव बदललेले नाही.

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.

  • उरुग्वे

    उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • फिनलंड

    फिनलंड हा उत्तर युरोपातील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही फिनलंडच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.

  • मायक्रोनेशिया

    मायक्रोनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे.

  • येमेन

    येमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. श्रीकृष्ण हे जेव्हा मथुरेला होते, त्यावेळी येमेनचा अजिंक्य समजला जाणारा राजा कालयवन याने मथुरेवर स्वारी केली होती.