महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.
धार्मिकदृष्ट्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणार्या नाशिक जिल्ह्याने औद्योगिकदृष्ट्याही मोठी प्रगती साधली आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सिंहस्थ पर्वातील कुंभमेळा येथे भरतो. पुराण काळात श्री प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे.
जी ईश्वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे.
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर असून,छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात.येथे राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदिर बांधले आहे.
सेंट किट्स आणि नेव्हिस हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. अमेरिका (खंड)ातील हा सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. सेंट किट्स व नेव्हिस ही ह्या देशातील दोन प्रमुख बेटे आहेत.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ आहे. येथील शिवमंदिर जगप्रसिद्ध आहे. कोकणातील लोक विविध धार्मिक विधीसाठी श्री हरिहरेश्वरला महत्त्व देतात.
परभणी हा शेतीप्रधान जिल्हा आहे. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४ लाख ८९ हजार ५०० हेक्टर्स असून,त्यापैकी जिरायती क्षेत्र ३ लाख ९९ हजार ४०० हेक्टर्स , तर बागायत क्षेत्र ९० हजार १०० हेक्टर्स एवढे आहे.
वाराणसी-कन्याकुमारी (किंवा नागपूर-हैदराबाद) हा राष्ट्रीय महामार्ग क्र ७ यवतमाळ जिल्ह्यातून जातो. वडकी, करंजी, पांढरकवडा व पाटणबोरी ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत.
पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, पुणे-हैद्राबाद,राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ व पुणे-नाशिक,राष्ट्रीय महामार्ग क्र.५० हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातत. महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरील अनेक दळणवळण अधिक सोयीचे बनले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti