महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, येथे अजूनही ग्रामपंचायत आहे. माळशिरस तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने पंचायत समितीसह अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत.
मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात.
चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते.
श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील.
मार्शल द्वीपसमूह हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे.
पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात.
आशिया खंडातील हिमालय, उत्तर अमेरिकेतील रॉकी, युरोप खंडातील आल्प्स हे पर्वत वली पर्वत म्हणून ओळखले जातात.
महबूबनगर हे आंध्र प्रदेशातील एक मोठे शहर आहे. स्थानिक भाषेत या शहराला ‘पालमुरु’ व ‘रुकमम्मापेटा’ अशी नावे होती.
Copyright © 2025 | Marathisrushti