(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • कन्याकुमारी

    कन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते.

  • हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर श्रीरामपूर

    श्रीरामपूर हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यातल्या इतर शहरांशी तुलना करता हे शहर अगदी नवे म्हणजे फक्त ७५ वर्षांपूर्वी तयार झालेले आहे.

  • केनिया

    केनिया वन्यजीव संपत्तीने समृद्ध देश आहे केनिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. केनियाच्या उत्तरेला इथियोपिया, आग्नेयेला सोमालिया, पश्चिमेला युगांडा तर दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत.

  • जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड

    अंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दित झाले आहे.

  • नंदुरबार जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    नंदुरबार जिल्ह्यात तांदूळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, गहू, हरभरा हे पिके प्रामुख्याने घेतली जातात. प्रामुख्याने ज्वारी हे पीक हे दोन्ही हंगामात व सर्व तालुक्यांत घेतले जाते.

  • नाशिक जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    सिन्नर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत हे नाशिकचे सचे औद्योगिक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी सुमारे २७०० हेक्टरच्या परिसरात १७५ मध्यम व मोठे औद्योगिक प्रकल्प कार्यरत आहेत.

  • तुर्कमेनिस्तान

    तुर्कमेनिस्तान (रशियन Туркмения, तुर्कमेन Türkmenistan ) मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचा एक घटक होता.. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • मुंबई शहरात इ.स १८५८ साली बांधलेले भाऊ दाजी लाड संग्रहालय

    मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले.

  • कुर्डुवाडी – पंढरपूर रेल्वेगाडीच्या आठवणी

    कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे. हे शहर नॅरोगेज रेल्वेच्या वर्कशॉपसाठी प्रसिध्द होते.

    उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर आणि मिरज या शहरांशी कुर्डुवाडी जोडलेले आहे. येथील नॅरोगेज रेल्वे ट्रॅक आता ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित करण्यात आलेला असला तरी जुन्या पंढरपूर गाडीच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या आहेत.