महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
औरंगाबाद हा पर्शियन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ शाही गादीने वसवलेले शहर असा आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ – इ.स. १७०७) ह्या मोगल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले असावे, असे मानले जाते. सातवाहन, वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकुटसारख्या राजघराण्यांनी औरंगाबाद वसवले व आर्थिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केले. या राजवटींबरोबरच यादव, मुघल व निजाम यांच्याही राजवटी या भागाने अनुभवल्या.
नांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.
तिवसा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. समुद्रसपाटीपासून ३०६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने या शहरात राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत.
कोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, शिर्डीपासून ते १४ किलोमीटरवर, तर मनमाड रेल्वे जंक्शनपासून ते ४० किलोमीटरवर वसलेले आहे.
पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे.
येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत काही उद्योग या जिल्ह्यात केले जातात. वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत.
श्रीलंका (जूने नाव – सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालची खाडी तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.
किरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्व-राज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुण्यात व्यतीत केला होता.
फार पूर्वी समुद्राचे पाणी वाढून संबंध गुहागर बुडण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी या गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा या मूर्तीने आपले पूर्वेकडील तोंड पश्चिमेकडे केले व समुद्र हटविला. तोंड उफराटे केले म्हणून यास उफराटा गणपती म्हणतात.
Copyright © 2025 | Marathisrushti