महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
अर्जेंटिनामधील तलांप्या नैसर्गिक उद्यान येथील खडकांत असणाऱ्या मानव व प्राणी यांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
वि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात के १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले.
चेक रिपब्लिकमधील ब्रुनो शहरातील टूजेंडहाट व्हिला आधुनिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे जर्मन स्थापत्यकार माईस रोहे यांनी १९२० मध्ये याची निर्मिती केली.
औरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली हा एक आदिवासी जिल्हा.
व्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत.
विलुप्पुरम हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, या शहराचा कारभार महापालिकेमार्फत चालतो.
विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.
बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti