(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • महाराष्ट्राच्या पूर्व भागातील नदी वैनगंगा

    महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी वैनगंगा ही एक प्रमुख नदी आहे. राज्यात वैनगंगेचा २९५ कि.मी. लांबीचा प्रवाह आहे.

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकजीवन

    जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • जपानमध्ये इमारतीच्या आतून गेलाय एक्सप्रेसवे

    जपानमध्ये चक्क इमारतीच्या आतून गेलाय एक्सप्रेसवे. फोटोत दिसणारा रस्ता चक्क एका इमारतीतून जातोय. आता हा रस्ता आधी बनला की इमारत?

  • बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्हा

    राज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

  • बेल्जियम

    बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.

  • सोलापूर जिल्ह्यातील अकलूज

    अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. ‘सधन शेतकऱ्यांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ‘अकलूज’ ओळखले जाते.

  • पुडुकोट्टई

    पुडुकोट्टई हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. वेलार नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून, तिरुचिरापल्लीपासून ५५ किलोमीटरवर आहे.

  • पुण्याजवळची उद्योगनगरी – चाकण

    पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द शहर. चाकणजवळच वेगाने विकास होणारी MIDC ची औद्योगिक वसाहत आहे.

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ

    महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.

  • बल्गेरिया

    बल्गेरियाचे प्रजासत्ताक (बल्गेरियन: Република България) हा मध्य युरोपातील एक देश आहे. बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तान व ग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनिया व सर्बिया हे देश आहेत. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.